Wednesday, December 26, 2018

शिधापत्रिकेस आधार जोडले नसल्यास धान्य नाही!


सांगली,(प्रतिनिधी)-
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकांची पडताळणी आणि सदस्य पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या शिधापत्रिकाधारकांचा आधार क्रमांक जोडला नसेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त अन्न धान्य विक्री केंद्रावर जाऊन आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी. तसेच कुटुंबातील सदस्यांची देखील आधार क्रमांकाची जोडणी करून घ्यावी, अन्यथा नवीन वर्षापासून धान्य मिळणार नसल्याचे पुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

 शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार रास्तभाव दुकानात एईपीडीएस प्रणाली देखील लागू करण्यात आली आहे. शिधावाटप करतांना पीओएस मशिन्सवर शिधापत्रिकाधारकाचा अंगठा पडताळणी करून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार डिसेंबर 2018 हा शिधापत्रिका व त्यातील सदस्य पडताळणी महिना घोषित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment