Tuesday, December 25, 2018

प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने चुलत बहीण-भावाची आत्महत्या


सांगली,(प्रतिनिधी)-
 बोरगाव (ता. तासगाव) येथील एकाच भावकीतील युवक-युवतीने एकाच ठिकाणी विषप्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, ही आत्महत्या दोघांचे असलेले प्रेमसंबंध आणि त्याला घरच्यांचा असणारा विरोध यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या घटनेमुळे बोरगावसह तालुक्यात खळबळ माजली आहे. गणेश बाळासो पाटील (वय 34), सारिका संभाजी पाटील (वय 20, दोघेही रा. बोरगाव) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बोरगाव येथे सारिका व गणेश हे दोघे शेजारीशेजारी राहतात. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यापूर्वी 22 ऑक्टोबर 2018 रोजी सारिका घरातून गेल्याची फिर्याद मुलीच्या घरच्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दहा दिवसांच्या कालावधीनंतर हे परत आले. पण घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले की, ‘आपण एकाच भावकीतले आहोत, हे सर्व चुकीचे आहे’, अशी समजूत त्या दोघांचीही काढण्यात आली होती. यानंतर गणेश कोल्हापूर येथे नोकरीसाठी गेला, तर सारिका घरीच होती.
सोमवारी रात्री घरापाठीमागे असणार्या द्राक्षबागेमध्ये गणेश आणि सारिका हे दोघेही भेटले व त्याच ठिकाणी घरच्यांचा विषप्राषन करुन आत्महत्या केली. 24 डिसेंबर 2018 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धनाजी रघुनाथ पाटील यांनी तासगाव पोलीस स्टेशनला फोन केला व बोरगाव राजापूर रोडवरील पाटील मळा येथे द्राक्ष बागेत विषारी औषध पिऊन सारिका व गणेश हे मृतावस्थेत आढ़ळले असल्याचे कळवले लगेच तासगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, हवालदार प्रशांत पठाणे, डामसे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.
रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळावर मृतदेहाजवळ बागेवर औषध फवारणीची बाटलीमेक्वा सीसीया कंपनीची आढळली आहे. अधिक तपास तासगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डामसे व प्रशांत पठाणे हे करत आहेत. या प्रकरणामुळे गावात खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment