Wednesday, December 26, 2018

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ


सभापती सुशिला तावंशी यांच्या हस्ते उदघाटन
जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना जत येथे मोठ्या उत्साहात प्ररंभ झाला. तीन दिवस चालणार्या या क्रीडा स्पर्धेचे  उदघाटन जत पंचायत समितीच्या सभापती सौ. सुशिला तावंशी यांच्याहस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने, पंचायत समिती सदस्या श्रीदेवी जावीर, विनायक शिंदे, के.एम.हायस्कूलचे मुख्याध्यापक रियाज सय्यद उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. 26,27 आणि 28 डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा जत येथे होत आहेत. कबड्डी, खोखो, 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, रिले इत्यादी स्पर्धा होत आहेत. जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे मुलींच्या कबड्डीच्या स्पर्धांना प्रारंभ झाला तर के.एम.हायस्कूलच्या मैदानावर खो खो च्या स्पर्धांना सुरुवात झाली.  
      जत तालुक्यात 28 केंद्र आहेत. सुमारे आठशे विद्यार्थी जत नगरीत दाखल झाले आहेत. कबड्डीच्या स्पर्धेसाठी केंद्रप्रमुख व शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक संभाजी कोडग, दिलीप पवार, केंद्रप्रमुख जयवंत वळवी,विद्याधर गायकवाड इत्यादींनी काम पाहिले.पंच म्हणून नंदकुमार कुट्टे, श्री. सोनवणे, श्री. गवंडी, श्री. कांबळे काम पाहात आहेत. खो खोच्या स्पर्धा के.एम. हायस्कूलच्या मैदानावर होत असून या ठिकाणी के.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक रियाज सय्यद, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांच्याहस्ते झाले. क्रीडा शिक्षक सिद्धू कोरे, अझर शेख, बसूमामा चौगुले, प्रकाश माळी, भाऊसाहेब म्हारनूर, प्रमोद कोडग, अमजद नाईक यांनी नियोजन आणि पंच म्हनून काम पाहिले.
     उदघाटनाच्या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष रामराव मोहिते, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष देवाप्पा करांडे,मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष काटे, सुभाष हुवाळे, एम.बी. चव्हाण, मच्छिंद्र ऐनापुरे, सौ. वर्षा जगताप,इरसिद्धाप्पा किट्टद, बाबासाहेब पांढरे, ज्ञानोबा टोणे, अमोल खरात,फत्तू नदाफ आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment