Wednesday, July 31, 2019

वाहन पार्किंग व्यवस्थेअभावी रहदारीची मोठी समस्या

जत,(प्रतिनिधी)-
 वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढती वाहनसंख्या शहरासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. बाजारपेठांनी गजबजलेल्या रस्त्यांना आता वाहनतळाचे रूप येऊ लागले आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जत शहरात वाहन पार्किंग व्यवस्था उभी राहण्याची आवश्यकता आहे.

मुलाच्या खून प्रकरणी जत येथील एकाला जन्मठेप

जत,(प्रतिनिधी)-
सिध्दनाथ (ता. जत) येथील उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रुपनर (वय १५) या मुलाच्या खूनप्रकरणी
विजय शिवाजी  माने (३५, रा. मंगळवार पेठ, जत) याला जन्मठेपेची शिक्षा काल सत्रन्यायाधीश विजय पाटील यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. ही घटना २५ मे २०१५ रोजी घडली होती.

Monday, July 29, 2019

युवा पिढीला शिस्त,संस्काराचे ओझे होईना सहन


जत,(प्रतिनिधी)-
सध्याच्या स्पर्धेच्या आणि मनोरंजनाचा विस्फोट
झालेल्या युगात पालकांच्या शिस्तीचे व संस्कारांचे ओझे युवा पिढीला अजिबात सहन होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी मुले घरातून निघून गेल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पालक धास्तावले असल्याचे दिसून येते.

शिक्षणाचा मूळ उद्देश हरवत चाललाय

जत,(प्रतिनिधी)-
आजची शिक्षण पद्धती गुणांवरच अडकली आहे. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीचा आजच्या पिढीला उपयोगच होत नाही. शिक्षणाचा मूळ उद्देश आम्ही समजून घ्यायला हवा. खरंच शिक्षण नेमकं कशासाठी हा प्रश्न विचारला की नोकरीसाठी, काम मिळण्यासाठी, व्यवसाय कला शिकण्यासाठी, समाजात कसं वागावं हे कळण्यासाठी,वाचन, लेखन यावं यासाठी. अशी अनेक उत्तरे व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असू शकतात.

सलीम गवंडी यांची अल्पसंख्याक कल्याण समितीच्या जिल्हा सदस्यपदी निवड

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका मुस्लिम समाज संघटना व कॉन्ट्रॅक्टर असोशिअनचे अध्यक्ष सलीम गवंडी यांची महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक कल्याण समितीच्या जिल्हा सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे.

Sunday, July 28, 2019

बिले न मिळाल्याने चारा छावण्या संकटात

जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यात चारा छावण्या सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. मात्र अद्याप बिले मिळालेली नाहीत, यामुळे बहुसंख्य  छावणीचालक आर्थिक अडचणीत आले आहेत.
दुष्काळात छावण्या सुरू झाल्याने पशुपालकांना  दिलासा मिळाला. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे छावणीचालकांना दैनंदिन चारा, पशुखाद्य खर्च भागवणे मुश्कील झाले आहे.

जत तालुक्यात खरीप पेरण्या खोळंबल्या

जत,(प्रतिनिधी)-
 मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा असा दोन्ही पाऊस जिल्ह्यात बरसलाच नसल्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तलाव आणि विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. ऐन पावसाळ्यात दुष्काळी भागामध्ये सध्या २५० च्यावर टँकर चालू आहेत. खरीप पेरणीच्या पिकांनी मात्र माना टाकल्याचे दुष्काळी तालुक्यातील चित्र आहे.

Friday, July 19, 2019

पॉस्कोअंतर्गत जत येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा

जत,(प्रतिनिधी)-
बाललैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) अंतर्गत जत येथील गोब्बी हायस्कूलमध्ये तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली. यावेळी मुलींच्या लैगिक हिंसाचारावर आणि त्यांवरील कायद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Thursday, July 18, 2019

सांगली जिल्ह्यात पावसाने दिली उघडीप

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप तर दिली आहेच पण काही ठिकाणी शेतकरी अन्य कारणाने संकटात सापडला आहे. जतसह पाच तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही ठिकाणी  मक्यावर लष्करी अळी  आणि सोयाबीनवर गोगलगायचा हल्ला झाल्याने येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

जत तहसील, पंचायत समिती कार्यालय परिसरातील शौचालय,मुताऱ्यांची दुरवस्था

जत,(प्रतिनिधी)-
जत तहसिल कार्यालय परिसरातील शौचालय व जत पंचायत समिती कार्यालय आवारातील मुतारीची दुरावस्था झाल्याने  कामानिमित्त आलेल्या लोकांना उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे.  शौचालये तर वापर करण्यायोग्यतेचे नाहीत. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.

Saturday, July 6, 2019

पावसाळा आला,तब्येत सांभाळा

जत,(प्रतिनिधी)-
पावसाळ्यात होणार्‍या अनेक आजारांपासून बचाव करणे प्रत्येकाला फार आवश्यक असते. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. हात स्वच्छ धुवावेत. घर आणि परिसरात घाण साचू देऊ नये. बाहेर जाताना छत्री, रेनकोटचा वापर करावा. असे काही खबरदारीचे उपाय करता येतील, असे डॉक्टर सांगतात.

Wednesday, July 3, 2019

वक्तृत्व स्पर्धेत सृष्टी सुर्यवंशी हिचा प्रथम क्रमांक

जत,(प्रतिनिधी)-
राजर्षी शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य बहुद्देशिय संस्था घरनिकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 5 वी ते 8 वी या गटात कु. सृष्टी सुनिल सुर्यवंशी हिने 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य' या विषयी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविले.

वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा बाबासाहेब काटे हिचे यश

जत,(प्रतिनिधी)-
राजर्षी शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य बहुद्देशिय संस्था घरनिकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 9 वी ते 12 वी या गटात कु.  प्रज्ञा बाबासाहेब काटे हिचा 'लोकशाही पुढील आव्हाने' या विषयीच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याने कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे हिस प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन तिचा सत्कार करण्यात आला.

पावसाळ्यात वीज उपकरणांपासून सावध राहा

पावसाळयात वादळीवारा व अतिवृष्टीमुळे वीजखांब पडल्याने तारा तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जि. प. कर्मचार्‍यांची माहिती 'एका क्लिक'वर

सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झाल्यापासून नवृत्तीपयर्ंतची सगळी माहिती देणारी गोष्ट म्हणजे 'सर्व्हिस बुक' आहे. अनेकवर्षे त्यात नोंदी होत राहतात आणि अनेकदा सर्व्हिस बुकची परिस्थिती जुन्या पोथ्यांसारखी होते. त्यामुळे हे 'सर्व्हिस बुक' आता ऑनलाइन केले जात आहे. नागपूर जि. प. तून हा पथदश्री प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पात नागपूर जि. प. ने आगेकूच केली असून, पडताळणीची तब्बल ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आता हवेवर चालू शकणार बाईक

दुचाकी वाहनात मध्यमवर्गीयांची सर्वाधिक पसंती मोटार बाईक हेच असून तरुणाईला तर बाईकचे वेडच असते. दररोज बदलत्या पेट्रोल किमतींचा परिणाम वाहन ग्राहकांवर होत असतोच आणि मग वेगवान, नवीन तंत्रज्ञान आणि कमी इंधनात जास्त मायलेज देणार्‍या वाहनांना साहजिकच पसंती मिळू लागते. देशातील अनेक दुचाकी निर्मात्या कंपन्या जादा मायलेज देणार्‍या बाईक्स बाजारात आणत आहेत तसेच इलेक्ट्रिक बाईकही लाँच होऊ लागल्या आहेत.

पळून गेलेला नवरा टिकटॉकमुळे सापडला

तामिळनाडूत आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून पळून गेलेला नवरा तीन वर्षांनी सापडला आहे. विशेष म्हणजे टिकटॉकवर टाकलेल्या व्हिडीओमुळे त्याचा पत्ता लागला. विल्लूपूरम जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पुन्हा आपल्या कुटुंबासोबत घरी पाठवले आहे.
सुरेश याचं जयाप्रदासोबत लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही होती.

राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक

देशांतर्गत स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा सर्वाधिक राखण्यात महाराष्ट्राला यश मिळाले असून ही टक्केवारी १५ टक्के इतकी आहे. सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे. २0१३-१४ सालचे १६.५0 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न २0१८-१९ मध्ये २६.६0 लाख कोटी इतके झाले आहे. राज्याचे दरदोई उत्पन्न २0१७-१८ मध्ये १ लाख ७६ हजार १0२ रुपये होते ते वाढून २0१८-१९ मध्ये १ लाख ९१ हजार ८२७ रुपये इतके झाले.

ओळखा आरोग्याचे संकेत

vकॉम्प्युटरवर काम करत असताना, काही विचारात असताना बोटे चाटण्याची सवय आपल्यापैकी कोणाला असेल, तर ही सवय ताबडतोब सोडवा. कारण, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. काही लोकांना रिकामे बसले असले किंवा विचारात असले, की तोंडात बोटे घालून बसल्याचे पाहिले असेल. ही सवय अर्थातच चांगली नाही. सर्वसाधारणपणे लोक म्हणतात त्यामुळे आळस, थकवा दूर होतो; पण संशोधनानुसार या सवयीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

Monday, July 1, 2019

प्रियकरासाठी मुलीने स्वत:च्याच घरी केली चोरी!

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्हय़ात एका मुलीने प्रियकरासाठी स्वत:च्याच घरी चोरी करून २0 तोळे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. हे घरातून चोरलेले सोने तिने प्रियकराला दिले. त्याने या पैश्यांतून कार खरेदी केली. या मुलीची इंस्टाग्रामवरून मुलाशी ओळख झाली होती. त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. मुलाने तिच्याकडे कार घेण्यासाठी पैश्यांची मागणी केली. त्यासाठी तिने स्वत:च्याच घरी चोरी करून प्रियकराला सोन्याचे दागिने दिले आहेत. मात्र, पोलिस तपासात तिची चोरी पकडण्यात आली.तिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर मुलीच्या कटुंबीयांना धक्का बसला असून आपली मुलगी असे करेल यावर त्यांचा विश्‍वासच बसत नाही.

पारधी जमातीचा आदिम जमातीमध्ये समावेश करावा

मुख्यमंत्र्यांना निवेदन
जत,(प्रतिनिधी)-
पारधी जमातीचा आदिम जमातीमध्ये समावेश करावा , विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी व क्रांतिवीर समशेरसिंग पारधी विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर विविध सत्तावीस मागण्याचे निवेदन आदिवासी पारधी विकास  परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना देण्यात आले आहे.

उमदी येथील अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ववत करावे

तालुका पाणी संघर्ष समितीची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
 उमदी येथे आठवड्यातून दोन दिवस अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज चालावे असा आदेश शासनाचा असला तरी  संख अप्पर तहसीलदारांकडून तसा आदेश नसल्याचे कारण देत आदेशाला वाटाण्याचे अक्षता दाखविल्या आहेत. सध्या उमदी येथे कामकाज बंद असून शासनाने उमदीला अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी तालुका पाणी संघर्ष समितीने मुख्यमंत्रयांकडे केली आहे.