Tuesday, December 25, 2018

दलित वस्ती योजनेंतर्गत जत शहरात पावणे दोन कोटी रुपयांच्या कामास प्रारंभ


जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरातील तीन प्रभागांम ध्ये दलितवस्ती योजनेंतर्गत 1 कोटी 80 लाख रुपयाच्या नवीन कामास काँग्रेस नेते, जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. समारंभास नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नाना शिंदे, इकबाल गवंडी, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, लक्ष्मण एडके, नामदेव काळे, प्रवीण जाधव, आदी उपस्थित होते.

विक्रम सावंत म्हणाले, जत नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी अनेक विकास कामे राहिलेली आहेत. प्रभाग 1 मध्ये विठ्ठलनगर प्रभागांतर्गत काँक्रीट गटारासाठी 60 लाख 66 हजार रुपयांचा निधी दिला आहे. तसेच प्रभाग चारमध्ये पतंगे हॉस्पिटल ते सांगली रस्ता गटार काँक्रिटीकरण करण्यासाठी साठ लाख रुपयांचा निधी दिला आहे. प्रभाग 6 साठी होंडा शोरूम ते रोहिदासनगर मध्ये 60 लाख रुपये कॅनालवर कॅनॉल टाईप गटार बनण्यासाठी निधी देण्यात आला आहे.
या प्रभागाचा चांगला विकास होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनावर म्हणाल्या की, जत नगरपरिषदेकडे नवीन नगरपरिषद सहाय्य अनुदानातून दोन कोटी रुपये आले आहेत; पूर्वीचे एक कोटी रुपये आहेत, असे तीन कोटी रुपये शिल्लक असून त्यातून दोन कोटी रुपयाची प्रशासकीय इमारत व सर्व सोयींनीयुक्त असलेली भाजीमंडई, सांगली रोड येथे बागबगीचाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष आप्पा पवार म्हणाले, नगरपालिकेच्या माध्यम ातून शहरातील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जुनी झाली आहे.
योजनेतून 47 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला असून थोड्या दिवसांत त्याला मंजुरी मिळणार असल्याचे सांगून यातूनच शहराला स्वच्छ व चांगला पाणीपुरवठा मिळणार आहे. तसेच भविष्यात शहरातील सर्व गटारे अंडरग्राउंड करून ड्रेनेज लिक होणार नाही, असे यावेळी काळजी घेण्यात येणार आहे. स्वच्छता सभापती लक्ष्मण एङके म्हणाले, जत शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू असून यामध्ये जत नगरपालिका भाग घेतली असून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment