Thursday, December 27, 2018

जुगार अड्ड्यावर छापा ;42 हजारांचा मुद्देमाल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील  गिरगाव येथे पत्त्याच्या पानांचा जुगार खेळत असताना उमदी पोलिसांच्या पथकाने चार  जणांना ताब्यात घेतले तर आणखी दोघे पसार झाले. या प्रकरणी रोख रक्कम आणि वस्तूंच्या रुपात पोलिसांनी सुमारे 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गिरगाव गावच्या पुर्वेस असलेल्या हनुमान मंदीरात काही इसम पत्त्याच्या पानावर पैसे लावुन जुगाराचा खेळ खेळत असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, पोलीस नाईक श्री. खरात, पोलीस शिपाई श्री.कुंभारे,श्री.सगर यांनी छापा टाकून गुलाब हसन मणेर, यशवंत शिवाजी यादव, मनोहर कॄष्णा शिंदे, गोजाप्पा कल्लाप्पा कांबळे या चार जणांना ताब्यात घेतले. परंतु यातील आणखी दोघे बसु सिता मांग व कॄष्णा महादेव मांग हे फरारी झालेले आहेत.  या ठिकाणाहून तीस हजार रुपयांची 1 मोटर सायकल, 1200 रुपये रोख  व 4 मोबाईल किंमत अंदाजे 10 हजार असा एकूण  42 हजार 200 रुपयांचा  मुद्देमाल जप्त  करण्यात आला असुन उमदी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. खरात  करीत आहेत.

No comments:

Post a Comment