जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
लांब उडी लहान गटात दादासो गायकवाड या विद्यार्थ्याने 100 मी धावणे स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.पृथ्वीराज रणदिवे याने 50 मी. धावणे तिसरा क्रमांक मिळवला. या शाळेतील लहान गटातील मुला-मुलींच्या संघाने 50×4 रिले स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रिले स्पर्धेत मुलांच्या गटात दादासो गायकवाड ,पृथ्वी राज रणदिवे,ओंकार मोगली,प्रज्वल कल्लीमनी,विठोबा करांडे यांचा तर रिले लहान गटात मुलींमध्ये श्रेया येळदारी, आरोही सूर्यवंशी, साक्षी हिप्परकर ,रुपाली कलगुंडे,वर्षा जोरवर या मुलींचा समावेश होता.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष हुवाळे, बी. पी. मनं कलगी,अण्णाप्पा कबाडगे,मल्लिकार्जुन कोळी, शशी कुलकर्णी ,नागप्पा होर्तिकार ,स्वाती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर केंद्रप्रमुख रतन जगताप ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ कोळी यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment