सात मुलींनंतर आठव्या बाळंतपणावेळी महिलेचा
मृत्यू
वंशाच्या दिव्याचा हव्यास अजून सुटलेला
नाही. जग अंतराळात घर करायला निघाले असताना आणि यात मुली आघाडीवर
असताना अद्यापही मुलींच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेले लोक वंशाला
दिवा हवाच, असा अट्टाहास ठेवतात,तेव्हा
आपण गेल्या सत्तर वर्षात काही मिळवलंच नाही, असा अर्थ होतो.
बीडमधल्या एका महिलेला सात मुली झाल्या तरी तिच्या घरच्यांना मुलगा हवाच
होता. या लोकांनी या सात मुली कशा जगवायच्या याचा विचारसुद्धा
केला नाही. त्यांना फक्त वंशाचा दिवा हवा होता. अलिकडच्या काही वर्षात अन्नभेसळ, हायब्रीडपणा यामुळे
अन्नात सकसपणा राहिलेला नाही. पूर्वीप्रमाणे कष्टाची कामे राहिलेली
नाहीत.

