Monday, December 24, 2018

विनाअनुदानित शाळातील शिक्षक संतप्त


जत,(प्रतिनिधी)-
 राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न अधिवेशन संपल्यानंतर येणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकित विषय लावून मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनी दिले. मात्र विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. त्यामुळे शिक्षक संतप्त बनला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळाकृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी दिली.

 प्रदीर्घ आंदोलनानंतर राज्यातील वीस टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्र च ि ल त नियमानुसार 100 टक्के अनुदान मि ळणे गरजेचे असतानाही 2 0 1 6 साली 20 टक्के अनुदान दिले. अत्यंत कमी पगारामुळे राज्यातील शिक्षकांची दयनिय अवस्था झाली आहे. शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. आंदोलनाची तीव्रता पाहून नामदार तावडे यांना विधानसभेत घोषणा करावी लागली. अनुदान देणार पण ते कधी देणार याचे स्पष्टीकरण केले नाही. पुन्हा शिक्षक आक्रमक बनल्याने मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिक्षणमंत्री, अर्थमंत्री व शिक्षक आमदार यांच्यात बैठक झाली. यावेळी अधिवेशन संपल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राज्यातील 20 टक्के अनुदान प्राप्त शाळेतील शिक्षक तसेच अघोषित शाळांतील शिक्षकांचेलक्ष मंत्रीमंडळाच्या बैठकिकडे होते. मात्र हा विषय घेण्यात आला नाही. दुसर्या बैठकितही ही अपेक्षा फोल ठरल्याने शिक्षकांच्यामध्ये शासनाविषयी नाराजी निर्माण होत आहे, अशी माहिती जगदाळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment