Friday, December 28, 2018

पाणी फौंडेशनच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन


 जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील बिकट झालेला पाणीप्रश्न सोडवण्याची ताकद लोकांमध्येच आहे. लोकांच्या ताकदीला जागृत करून या विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी आमीर खान आणि किरण राव यांनी 2016 साली पाणी फौंडेशनची स्थापना केली. त्यातून झालेल्या कामाचे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सभापती सुशीला तांवशी, श्रीदेवी जावीर, मंङल अधिकारी नंदकुमार बुकटे, पाणी फौंङेशनचे जिल्हा समन्वयक हीना मुजावर, तालुका समन्वयक तुकाराम पाटील, मीरा कांबळे आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत प्रदर्शन सुरू आहे. चित्र प्रदर्शन पाणी फौंडेशनने तयार केले आहे. हे प्रदर्शन आपल्या तालुक्यात आपल्यासाठी तीन दिवस खुले राहणार आहे. या चित्र प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी.

No comments:

Post a Comment