परदेश दौरा :55 महिने, 92 देश, खर्च 2 हजार 21 कोटी
नवी दिल्ली: गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या आहेत. या
भेटीसाठी मोदींच्या विदेश दौर्यावर सरकारचे 2021 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यापैकी यंदाच्या वर्षात
म्हणजे 2018 मध्ये मोदींनी 14 विदेश दौरे
केले आहेत. तर मोदी हे विदेश दौर्यांसाठी
सर्वात महागडे पंतप्रधान ठरले आहेत.
आगामी चार महिन्यात मोदींनी फक्त दोनवेळा परदेश दौर्यावर जाऊन आल्यास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा 10 वर्षातील 93 परदेश दौर्यांचा विक्रम मोडीत काढून दुसर्या स्थानावर विराजमान होणार आहेत. प्रथम स्थानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत. त्यांनी 15 वर्षाच्या कार्यकाळात 113 देशांना भेटी दिल्या होत्या.
मोदी यांनी परदेश दौर्यावर खर्च करण्यातही आघाडी घेतली आहे. मोदी यांच्या साडेचार वर्षातील 92 देशांच्या दौर्यावर तब्बल 2 हजार 21 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्या दुसर्या टर्ममध्ये 50 दौर्यांवर 1 हजार 350 कोटी रुपये खर्च झाले.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी परदेश दौर्यावरील खर्चाची माहिती दिली. त्यांनी गेल्या 10 वर्षातील पंतप्रधानांच्या दौर्यावर झालेल्या खर्चाची माहिती दिली. मोदी यांच्या 92 दौर्यांवर 2 हजार 21 कोटी रुपये खर्च करण्यात आले म्हणजेच एका दौर्यासाठी 22 कोटी खर्च झाले. मनमोहन सिंग यांनी 50 दौर्यांवर दौर्यांवर 1 हजार 350 कोटी रुपये खर्च झाले, म्हणजेच एका दौर्यासाठी 27 कोटी खर्च झाले.
यामध्ये पंतप्रधानांच्या हॉटेलचा खर्च
आणि अन्य बाबींवर झालेल्या खर्चाचा समावेश नाही. देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कुठलाच
परदेश दौरा केला नाही. चरणसिंग 28 जुलै
1979 पासून 14 जानेवारी 1980 पर्यंत पंतप्रधान होते.
No comments:
Post a Comment