मिरज,(प्रतिनिधी)-
मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे राहणारा सनी गौतम
जकाते
(वय 24) याने महाविद्यालयीन युवतीला चाकूचा धाक
दाखवून बलात्कार केला. पीडित युवतीने मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद
दिली असून जकाते याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पीडित युवती ही मिरजेतील एका महाविद्यालयात बारावी शिक्षणासाठी येत होती.
महाविद्यालयातून पीडित युवती ही घरी जाण्यासाठी निघाली होती.
त्याचवेळी सनी जकाते हा महाविद्यालयाजवळ आला. युवतीला
चाकूचा धाक दाखवून तिला आपल्या गाडीवर बसवून भोसे रोडवरील आडरानात घेऊन जाऊन तिला चाकूचा
धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. परत तिला गाडीवरून आणून सोडले.
परंतु पीडित युवती ही अतिशय घाबरलेली होती. महाविद्यालयातून
ती घरी आल्यानंतर घाबरलेल्या स्थितीत होती. घरात कोणाशीही बोलत
नव्हती. तेव्हा घरातील नातेवाईकांनी विश्वासात घेऊनविचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित युवतीने मिरज ग्रामीण पोलिसात सनी गौतम जकाते याच्याविरोधात फिर्याद
दिली असून जकाते याच्यावर रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
No comments:
Post a Comment