कंगना राणावत
एक गुणी अभिनेत्री आहे, हे तिने अनेक चित्रपटांमधून सिद्ध केलेले आहेच;
पण तिच्यामध्ये दिग्दर्शनाचेही कौशल्य आहे, हे
तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये यथेच्छ ढवळाढवळ करून सिद्ध केलेले होते!
आता तिच्यामधील दिग्दर्शिकेला खर्या अर्थाने संधी
मिळाली ती ‘मणिकर्णिका ः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने. चित्रपटाचा मूळ दिग्दर्शक होता क्रिश.
त्याने चित्रपटाचा बहुतांश भाग पूर्ण झाल्यावर अचानक दक्षिणेतील
‘एनटीआर’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी
‘मणिकर्णिका’ सोडला. त्यानंतर
या चित्रपटाचे उर्वरित काम कंगनानेच पूर्ण केले. आता तिने एका
मुलाखतीत म्हटले आहे की, अभिनयापेक्षाही आपल्याला दिग्दर्शनात
अधिक रस आहे. क्रिशने अचानक चित्रपट सोडल्यानंतर दिग्दर्शनाची
जबाबदारी कंगनाने स्वतःकडे घेतली.
त्यानंतर तिला अनेक समस्यांचा
सामना करावा लागला. सोनू सुदसारखे काही कलाकार चित्रपट सोडून
गेले. मात्र, तरीही न डगमगता कंगनाने धैर्याने
चित्रपट पूर्ण केला. अनेक दृश्ये तिने पुन्हा चित्रित केली.
सोनूच्या भूमिकेचे नव्या कलाकारासह पुन्हा चित्रीकरण केले. चित्रपटातील काही पॅचवर्कही तिने पूर्ण केले. त्यामुळे
आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या टीझर
आणि ट्रेलरला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाने तिचा उत्साह आणखी वाढला आहे. या चित्रपटात तिच्यासमवेत अंकिता लोखंडे, जिसू सेनगुप्ता,
जीशान अयुब, अतुल कुलकर्णी आदी कलाकार आहेत.
एका मुलाखतीत कंगनाने सांगितले, केवळ अभिनय करीत
असताना मला सातत्याने असे वाटत होते की, माझा एक भाग सडत चालला
आहे. दिग्दर्शिका म्हणून मी स्वतःला व्यक्त करू शकत नव्हते,
ही घुसमट होती. त्यामुळे ज्यावेळी ‘मणिकर्णिका’चे दिग्दर्शन माझ्याकडे आले त्यावेळी माझ्यावर
कोणताही दबाव नव्हता व केवळ लक्ष्य गाठणे हेच काम होते.
No comments:
Post a Comment