जत,(प्रतिनिधी)-
कुंभरी (ता. जत) गावाखालील जाधववस्ती येथील जि.प.मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश मिळवले आहे.
कु.मोहिनी पांडुरंग चव्हाण (इ.३री) हिने इ. १ ली ते ४ थी मुलींच्या लहान गटात गोळा फेक स्पर्धेत कुंभारी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला असून तिची तालुका स्तरावर निवड झाली आहे.
याच मुलीने ५०मी. धावणे स्पर्धेत (लहान गटात)द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच अथर्व अनिल जाधव (इ.४थी) याने मुलांच्या( इ.१लीते४थी) लहान गटात गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.वरील दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक भगवान नाईक व सहाय्यक शिक्षक नानासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी आणि पालकांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment