Monday, December 24, 2018

अप्पर तहसीलदारांची सही करणारा लिपिक कार्यमुक्त


जत,(प्रतिनिधी)-
 संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील लिपिकाने वाटणीपत्र व जमीन विक्री चुकला दुरुस्ती नियंत्रित सत्ताप्रकार आदेश जमीन इतर ह्क्कातील शेर्याबाबत आदेशावर स्वतःच अप्पर तहसीलदारांची सही केल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेत अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी त्या लिपिकाचे कागदपत्राचे कपाट सीलबंद केले. कार्यालयातून त्यांना कार्यमुक्त केले आहे.

महसूल विभागाने याबाबत गुप्तता पाळली आहे. अजून काहीमहसूलचे कर्मचारी सामील असल्याची चर्चा सुरु आहे. त्याम ुळे यांची जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संख येथे 10 ऑगस्ट 2017 रोजी अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले. 26 जानेवारी 2018 ला कार्यालयाचे उद्घाटन करण्यात झाले. पाटबंधारे कार्यालयाच्या इमारतीत सुरु झाले. यामध्ये 63 गावांचा समावेश करण्यात आला. उमदी, माडग्याळ, मुचंडी, संख या चार मंडल विभागाचा समावेश करण्यात आला. हातकणंगले येथील नायब तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना पदोन्नतीने संख येथे अप्पर तहसीलदार पदी नियुक्ती मिळाली. अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांची बदली कवठेमहांकाळ येथे झाल्यानंतर संख अप्पर तहसीलदार कार्यालयातील लिपिक सदाशिव बिरादार यांनी वाटणी पत्र आदेश व रस्त्यांच्या आदेशावर अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांची बनावट सही करून दिले होते. त्याच्याकडे वारसा नोंदी वाटणीपत्र विभागाचा कारभार होता.
 याबाबतची माहिती तत्कालीन अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे चौकशी करण्याची लेखी तक्रार केली होती. चौकशी केली असता एका लिपिकाने बनावट सही केल्याचे निदर्शनास आले. अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी त्याचा पदभार काढून कागदपत्राचे कपाट सील केले. आतापर्यंत पाच ते सहा वाटणी पत्र आदेश व रस्त्यांच्या आदेशावर बनावट सही केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.

No comments:

Post a Comment