पंढरपूर,(प्रतिनिधी)-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार, 9 जानेवारी
2019 रोजी सोलापूर आणि पंढरपूरच्या दौर्यावर येत
असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांची उद्घाटने आयोजित करण्यात आली आहेत.
मोदी यांचा अधिकृत दौरा अद्याप आला नसला तरी तसे संकेत मिळाले आहेत,
अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि भाजपचे प्रा. अशोक
निंबर्गी यांनी दिली.
तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणार्या देहू, आळंदी पालखी मार्गाबरोबरच तुळजापूर, अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरात साकारत असलेल्या रे नगरमधील 30 हजार घरकुलांचा पायाभरणी समारंभ, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात करण्यात आलेली विविध विकासकामे तसेच 180 कोटींची ड्रेेनेज योजना आदी विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. याशिवाय मोदी हे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार असून त्यानंतर त्यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे देशभर दौरा करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते सोलापुरात येत आहेत. गेल्या साडेचार वर्षाच्या काळात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा ते मांडणार आहेत.
No comments:
Post a Comment