जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जाडरबोबलाद शालेय केंद्रस्तरीय
क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. जाडरबोबलाद
येथे झालेल्या या स्पर्धा केंद्रप्रमुख बी.बी.बडीगेर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडल्या. स्पर्धेचे उदघाटन सोन्याळ हायस्कूलचे मुख्याध्यापक टी.एस. बिरादार यांच्या हस्ते व क्रीडाशिक्षक पंडित कांबळे,
एच.के. मुचंडी, जकाण्णा बिरादार यांच्या उपस्थितीत झाले.याला शाळांनी
उत्फुर्त परिसाद दिला.
खो खो,कबड्डी आणि मैदानी स्पर्धा पार पडल्या. खो खो लहान गट ( 1 ली ते 4 थी)
मुलेमध्ये जाडरबोबलाद मराठी जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक,
जाडरबोबलाद कन्नड द्वितीय तर तृतीय क्रमांक सोन्याळवस्ती मराठी शाळेने
पटकावला. मुलीच्या गटात अनुक्रमे याच शाळांनी पहिले तीन क्रमांक
पटकावले आहेत. मोठ्या गटात ( 5 वी ते
8वी) मुलेमध्ये लकडेवाडी, जाडरबोबलाद मराठी शाळांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकावले. मुलीच्या गटात पहिला क्रमांक जाडरबोबलाद तर दुसरा क्रमांक लकडेवाडी शाळेने
पटकावला.
कबड्डी लहान मुले गटात जाडरबोबलाद मराठी, जाडरबोबलाद कन्नड आणि लकडेवाडी शाळांनी अनुक्रमे पहिले
क्रमांक पटकावले. मुलींच्या गटात जाडरबोबलाद कन्नड, माडग्याळवस्ती कन्नड आणि जाडरबोबलाद मराठी शाळांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक
पटकावले. पाचवी ते आठवी या मुलांच्या मोठ्या गटात जाडरबोबलाद
मराठी आणि लकडेवाडी शाळांनी पहिले दोन क्रमांक पटकावले. मुलींच्या
गटात लकडेवाडी आणि जाडरबोबलाद मराठी शाळेने पहिले तीन क्रमांक मिळवले.
100 मीटर धावणे लहान गटात पहिले तीन
क्रमांक-संतोष हिंचगेरी (उमराणीवस्ती),
मल्लिकार्जुन जमखंडी (रविमाडग्याळवस्ती),
सिद्धनाथ सरगर (लकडेवाडी) मुलींमध्ये रक्षिता बिराजदार (उमराणीवस्ती), पल्लवी लोहार (जाडरबोबलाद कन्नड), पायल पाटील (जाडरबोबलाद मराठी) मोठ्या गटात अजित बंडगर (लकडेवाडी), राकेश ऐवाळे (जाडरबोबलाद मराठी) मुलींमध्ये अश्विनी कलगुंडे (लकडेवाडी),
मालाश्री बिरादार (जाडरबोबलाद मराठी) गोळा फेक लहान गट मुली- सागर बिरादार (सरगर-होनमोरे वस्ती), सुदर्शन गारळे
(गारळेवाडी-2), निखिल बसर्गी(गारळेवाडी-1) मुलींमध्ये अंकिता कांबळे (सोन्याळ मराठी), पृथ्वी शिंदे (जाडरबोबलाद मराठी), अंबिका पुजारी (कुलाळवाडी)
गोळा फेक मोठा गट मुले- अजित बंडगर (लकडेवाडी),
मयूर लकडे (लकडे वाडी), विशाल
कदम (जाडरबोबलाद मराठी) मुलींमध्ये वैभवी
लोखंडे (लकडेवाडी),मीना वाघमोडे
(लकडेवाडी), अश्विनी बिज्जरगी
(जाड्रबोबलाद मराठी) लांब उडी लहान गट-
हेमंत गेजगे (जाडरबोबलाद मराठी), सुदर्शन गारळे (गारळेवाडी-2), संतोष
हिंचगेरी (उमराणीवस्ती) मुलींमध्ये रक्षिता
बिरादार (उमराणीवस्ती),वर्षा कलगुंडे
(लकडेवाडी), पृथ्वी शिंदे (जाडरबोबलाद मराठी) मोठ्या गटात मनोहर वाघमोडे
(लकडेवाडी), सतीश हिट्टनळी (जाडरबोबलाद मराठी), अजिंक्य लोखंडे (लकडेवाडी), मुलींमध्ये अश्विनी
कलगुंडे (लकडेवाडी), प्रियांका लोखंडे
(लकडेवाडी), अश्विनी बिज्जरगी
(जाडरबोबलाद मराठी)
रिले लहान गट मुले पहिले तीन क्रमांक-जाडरबोबलाद मराठी, उमराणीवस्ती व
आवटीवस्ती. मुलींमध्ये रविमाडग्याळवस्ती, जाडरबोबलाद कन्नड, उमराणीवस्ती. मोठा गट रिले मुले लकडेवाडी, जाडरबोबलाद मराठी मुलींमध्ये
लकडेवाडी, जाडरबोबलाद मराठी. लहान गट
50 मीटर धावणे मुले- संतोष हिंचगेरी (उमराणीवस्ती), सूरज मुलाणी (जाडरबोबलाद
मराठी), सोमनाथ लवंगी ( आवटीवस्ती)मुलींमध्ये रक्षिता बिरादार (उमराणीवस्ती), विजयालक्ष्मी चनगोंड (जाडरबोबलाद मराठी),पल्लवी लोहार (जाडरबोबलाद कन्नड) 200 मीटर धावणे मोठा गट मुले- सतीश हिट्टनळी (जाडरबोबलाद मराठी), विजय पाटील (लकडेवाडी) मुली- शुभांगी सरगर
(लकडेवाडी), राजश्री पुजारी (जाडरबोबलाद मराठी)
गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने, विस्ताराधिकारी आर.डी. शिंदे, तानाजी गवारी,
केंद्रप्रमुख बसवराज बडीगेर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर कोरे, रमेश राऊत, लखन होनमोरे,
सिदराया चिकलगी, दादासाहेब कोडलकर,, रामचंद्र पांढरे, चेतन क्षीरसागर, प्रशांत सातपुते, सिकंदर शेख, गोविंद
कोरे, शंकर हंजगी यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीरित्या पार
पडल्या.
अति छान
ReplyDelete