जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मोठ्या गटात मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
तालुकास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा जत येथील जिल्हा परिषद शाळा नं १ च्या पटांगणावर पार पडल्या. या सामन्यात आसंगी तुर्कच्या जि.प.प्राथमिक मराठी शाळेच्या मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला मुख्याध्यापक मनोज खोकले, संतोष राठोड, सुनील साळवे, सुधाकर संग्रामे, नामदेव जानकर, विलास मेंडके, विलास चिकुर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी बी. एन.जगधने,विस्तार अधिकारी आर. डी.शिंदे, तानाजी गवारी,श्री.राठोड, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment