Wednesday, October 31, 2018

Time please:निर्भेळ आनंद लुटा, हसा.


एकदा का चाळीशी पार केली कीजास्त शिकलेलाआणिकमी शिकलेलादोघेही सारखेच ... (कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल) पन्नाशीनंतर तरसुंदरआणिकुरूपहा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच (कोण किती का सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही ) साठीनंतर तरमोठी पोस्टआणिलहान पोस्टअसेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच (निवृत्तीनंतर तर ऑफिसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.) सत्तरी पार केल्यानंतरमोठे घरआणिलहान घरअसा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच (सांधेदुखी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले की बसण्यापुरती जागा असली तरी पुरे.) ऐंशीनंतर गाठीशीभरपूर पैसाअसला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच (जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न उरतोच) नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तरझोपणेआणिउठणेयांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच (कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच) अजून शंभरी पार करायची इच्छा आहे का? जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका. लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.
 *****
जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात.... लोकांच्या दृष्टिने ती धड नसतात, कारण ती पड़त असतात. पण, खर म्हणजे ती पड़त नसतात. तर, पड़ता पड़ता घडत असतात.. - स्वामी विवेकानंद. *****
ॅडमिनला पोलीस अडवतो.
पोलीस : गाडी गॅसवर आहे?
ॅडमिन : नाही. पोलीस : मग डिझेलवर आहे?
ॅडमिन : नाही हो साहेब.
 पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
ॅडमिन : नाही.
पोलीस : अरे मग कशावर आहे?
ॅडमिन : हप्त्यावर आहे.



येळवीतून दोन लाख पळविले



जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील दरिकोणूर येथील सदाशिव म्हाळाप्पा व्हनमाने यांची येळवी येथून दुचाकी वाहनाला लावलेली बॅग लंपास केली. त्यात असलेले रोख दोन लाख आणि अन्य कागदपत्रेही चोरट्यांनी नेली. ही घटना काल दुपारी अडीच-तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सदाशिव व्हनमाने यांनी जतमधील बँक ऑफ इंडियाच्या जत शाखेतून दोन लाख रुपये काढून मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूरला देवदर्शनासाठी येळवी मार्गे दुचाकीने (एमएच 03-एएस 1841) दरिकोणूरला निघाले होते. येळवी येथे बसस्थानक चौकात आल्यावर तहान लागली म्हणून आपली दुचाकी थांबवून ते हॉटेलात गेले. पैशांची बॅग मात्र गाडीलाच होती. ते पाणी पिऊन माघारी येईपर्यंत अज्ञातांनी बॅग लांबवली होती. यात रोख दोन लाख रुपये, बँकेचे पासबूक,चेकबूक होते.

5 तालुके गंभीर स्वरुपाचे दुष्काळी जाहीर


उपाययोजना करण्याच्या सूचना
जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळ, पाणी टंचाईने होरपळत असलेल्या राज्यातील 26 जिह्यांमधील 151 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिह्यााrल तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी तसेच जत तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर कण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या सर्व त्या उपाययोजना लागू करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रीत विचार करुन राज्यातील 151 तालुक्यांमध्ये राज्य शासनाने गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये जिह्यातील पाच तालुक्यांचा गंभीर स्वरुपाच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, जत व आटपाडी हे तालुके गंभीर स्वरुपाचे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
सर्व उपायोजना राबविण्याचे आदेश
बुधवार 31 ऑक्टोंबरपासूनच या तालुक्यांमध्ये दुष्काळाचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ते पुढील सहा महिन्यापर्यंल लागू राहणार आहेत. याशिवाय दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक संबधित सर्व त्या उपाययोजना लागू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले आहेत. यामध्ये जमिन महसूलामध्ये सूट, कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात सूट, परीक्षा शुल्क माफ, टँकर, तसेच चाऱयाची सोय व वीज जोडणी खंडीत न करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार रुजतात: दिनराज वाघमारे


जत,(प्रतिनिधी)-
विद्यार्थी जागृत अवस्थेत सर्वाधिक काळ हा शिक्षकांजवळ असतो. शाळेतील संस्कारच त्याला पुढच्या आयुष्यात उपयोगाला येतात. त्यामुळे संस्कारशील पिढी बनवण्याची खरी जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन पत्रकार व लेखक दिनराज वाघमारे यांनी जत येथील जि.. शाळा क्रमांक येथे बोलताना केले.
पत्रकार दिनराज यांच्या वैभवशाली जत या पुस्तकाचे प्रकाशन आणि मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या धड्याचे आठवी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाबाहेर जाणार्या जत कन्या केंद्रातील शिक्षकांना निरोप आणि सत्कार असा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना श्री. वाघमारे म्हणाले,मुलगा घरी असला तरी तो एक तर टीव्ही पाहण्यात, खेळण्यात किंवा झोपण्यात आपला वेळ घालवतो. त्यामुळे पालकांच्या संपर्कात कमी येतो. शाळेत मात्र तो सर्वाधिक वेळ शिक्षकांसोबत असतो. त्यामुळे शिक्षक जे संस्कार त्याच्यावर करतील, तेच त्याच्या आयुष्यात उपयोगाचे ठरतील. त्यामुळे संस्कारशील, अभ्यासशील पिढी घडवण्याची जबाबदारी खर्या अर्थाने शिक्षकांची आहे. जत शहरातील शाळा क्र.1 ही शाळा मुख्याध्यापक संभाजी कोडग यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील टॉप वन बनली आहे. त्याला साथ अन्य शिक्षकांची मिळाली आहे. टीम वर्क उत्तम असेल तर ती शाळा कधीच मागे पडत नाही.
यावेळी बोलताना लेखक मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले,शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांचे छंद जोपासण्याचे काम करायला हवे. कला जोपासल्याने विद्यार्थी अपसूक उत्तम नागरिक घडतो.
भालशंकर म्हणाल्या की, आम्हाला ही शाळा सोडून जाताना खूप वाईट वाटते. मात्र या शाळेने भरभरून दिले. खूप शिकता आले. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात गेल्यावर आम्ही कुठेच कमी पडणार नाही. यावेळी जिल्ह्याबाहेर बदली झालेले कंठीचे मुख्याध्यापक कामडे, गावीत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी कोडग यांनी केले. यावेळी शिक्षक समितीचे बलभीम घाटे, सावळा माने, वर्षा जगताप,सौ.हावळे, सौ.माने,विशाखा सावंत,सौ. आंबी आदी उपस्थित होते. आभार विद्याधर गायकवाड यांनी मानले.

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांसाठी मार्ग मोकळा


जत,(प्रतिनिधी)-
नवीन विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांची तरतूद होती. या महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने नुकतेच जाहीर केले. त्यानुसार येत्या 30 जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यायलीन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन विद्यापीठ कायदा अर्थात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 1 मार्च 2017 लागू झाला. यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निर्णयात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली. मात्र या निवडणुकाविषयी काहीच स्पष्टता नव्हती. कोणत्या आधारावर व निकषावर निवडणुका घ्यायचा, असा प्रश्न प्राचार्यांनी उपस्थित केला होता. त्यासाठी आवश्यक असणारे परिनियमच राज्य शासनाने प्रसिद्ध न केल्याने यंदाच्या वर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परिनियम विद्यापीठ व महाविद्यालयांना प्राप्त न झाल्याने विद्यार्थी निवडणुकांविषयी सर्वत्र साशंकता निर्माण होती. त्या पार्श्वभूमीवर आता उच्च शिक्षण विभागाने परिनियम जाहीर केले आहेत. त्यात निवडणुका घेण्याविषयीचे नियम, आचारसंहिता, पात्रता या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. परिनियमात विद्यार्थी निवडणुकांच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संस्थेचे संचालक हे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी प्राधिकारी असतील. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे होईल. कुलगुरूंशी विचारविनिमय विद्यार्थी निवडणुकीचा कार्यक्रम तयार करतील. यात निवडणुका घेणे, अधिसूचना काढणे, प्रसिद्धी आणि निवेदने यासंबंधीचा वेळापत्रक 31 जुलैपूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणुका प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीानुसार आता शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी निवडणुका घेणे सहज शक्य होणार आहे. विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने ह्या निवडणुकांचा परिनियम प्रसिद्ध होणे ही बाब स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर येत्या वर्षात महाविद्यालय निवडणुका होतील या दृष्टिकोनातून आवश्यक असणार्या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात निवडणुकांमधून खर्या अर्थाने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व पुढे येईल,अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांकडून मिळाली.

दिनकर पतंगे जत विधानसभा लढविणार


जत,(प्रतिनिधी)-
शिवसेनेचे नेते आणि लायन्स क्लबचे तालुकाध्यक्ष दिनकर पंतगे यांनी जत विधान सभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची का अपक्ष निवडणूक लढवायची, हा निर्णय अद्याप झाला नाही.
जत तालुक्यातील येळवी गावचे सुपुत्र, शेती विषयातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व दिनकर श्रीधर पतंगे हे आगामी 2019 ची विधानसभा निवडणूक जत मतदारसंघातून लढविण्यास इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी नियोजनही सुरू केले आहे. दिनकर पतंगे यांचे वडील श्रीधर पतंगे हे शिक्षक होते व येळवी गावचे सरपंच म्हणून त्यांनी 10 वर्षे काम पाहिले होते. दिनकर पतंगे हे कृषी विभागात सरकारी नोकरीत होते. नोकरी करीत असताना त्यांनी जत तालुक्यात शेतीविषयक विविध उपक्रम राबविले आहेत. शेतकर्यांना अनुदान व मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. 2013 साली त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी जत शेतकरी सेने व शिवसेना कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या दिनकर पतंगे हे जत तालुका लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष असून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

शेतमाल बाजार नियंत्रणमुक्तीचे सांगलीत स्वागत


सांगली,(प्रतिनिधी)-
काँग्रेस, समाजवादी व डाव्या विचारसरणीच्या तत्कालिन सरकारनी शेती व शेतकरी विरोधी धोरण घेत शेतमाल बाजारावर नियंत्रणे लादली होती. मात्र विद्यमान सरकारने राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशाने काढलेल्या अध्यादेशाद्वारे हे शेतमाल बाजार नियंत्रण मुक्त केला आहे. बाजार समिती तीच्या सीमांकीत बाजार क्षेत्रात कृषी उत्पन्नाच्या आणि पशूधनाच्या पणनाचे विनियमन करणार नाही. बाजार समिती प्रमुख बाजारतळ, उपबाजार तळ व बाजारउपतळ यातील कृषी उत्पन्नाच्या व पशूधनाच्या पणनाचे विनियमन करील अशी तरतूद केली आहे. त्यामुळे शेतमाल बाजारपेठ नियंत्रण मुक्त झाली असुन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या अनेक दिवसांच्या लढ्याला यश आले आहे असा दावा करीत संघटनेच्यावतीने साखर वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
या निर्णयाचे स्वागत करीत विद्यमान भाजप सरकारचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेच्या गणपती मंदिर कार्यालयासमोर साखर वाटप करण्यात आली. यावेळी संजय कोले यांनी सांगितले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना अनेक दिवसांपासुन शेतमाल बाजार नियंत्रणमुक्त करावा अशी मागणी करीत होती. मागील सरकारने शेतमाल बाजार पूर्णपणे बाजारसमित्या, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व राजकारणी यांच्या हातात ठेवला. शेतकर्यांना त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारच ठेवला नाही. त्याचा फटका शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसला. शेतकर्यांचे मोठे शोषण झाले व शेतकरी आत्महत्या करू लागले. उत्पादन खर्च निघेल अशीही दराची हमी नव्हती. शेतमाल हव्या त्या दराने लुटला जात होता. त्यामुळे शेतमाल बाजार नियंत्रणमुक्त करावा अशी मागणी लावुन धरली व त्यासाठी अनेक आंदोलने केली. या आदेशाने आता शेतकरी सीमांकीत क्षेत्रात शेतमालाचे पणन करू शकतील. तसे स्वातंत्र त्यांना मिळाले आहे. हे संघटनेच्या दिर्घकालीन लढ्याचे यश आहे. शेतकर्यांना धान्य,कापूस, तेलबिया, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, पशूधनाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे तर व्यापार्यांना खरेदी विक्रीचा अधिकार मिळाला आहे. इंदिरा गांधींनी 1972 साली केलेल्या गरीबी हटावच्या घोषणेत शेकतरी शोषला गेला. संघटनेने याबाबत आवाज उठवला. संघटनेमुळेच 2015 पासुन अडत, हमाली व तोलाई, लेव्ही खरेदीदाराकडुन वसुल करण्याचा निर्णय झाला आहे.

शंभर टक्के अनुदानावर वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण


जत,(प्रतिनिधी)-
 सन 2018-19 या वर्षात राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर व पलूस या 6 तालुक्यांमध्ये चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये संबंधित तालुक्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन खार्यामार्फत 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 12 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त संजय धकाते यांनी दिली.

जिल्ह्यात 8 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य


जत,(प्रतिनिधी)-
 भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रूबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी टप्प्या-टप्प्याने गोवर रूबेला ही लस विविध राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ठ करण्यात येत आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रूबेला लसीकरण मोहीम आयोजित केली आहे.
या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षापर्यंत वयोगटातील जवळपास 8 लाख 24 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. यापैकी काही लाभार्थ्यांना जरी अगोदर गोवर रूबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे. समाजामध्ये या मोहिमे- बाबत जनजागृती व सुरक्षितता निर्माण करण्यासाठी तसेच मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.


मराठा आरक्षण न दिल्यास 18 नोव्हेंबरनंतर ठोक मोर्चा: विजयसिंह राजे महाडिक


सांगली,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र सरकारने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर 18 नंतर महाराष्ट्रात मराठ्यांसोबत धनगर, रामोशी, लिंगायत, जैन व मुस्लिम समाज बांधवांना एकत्र करून ठोक मोर्चाला सुरवात करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह राजे महाडिक यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष बाबा पाटील व राज्य समन्वयक विनायकगायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयसिंह राजे महाडिक म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाल्यानंतर सरकारने तत्काळ मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर मात्र आम्ही मराठे इतर समाज बांधवांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा म्हणून स्वतंत्र 25 टक्के आरक्षण द्यावे. आरक्षणासाठी हा शेवटचा आणि निकराचा निर्णायक लढा असणार आहे. ठोक मोर्चाच्या लढ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. जे समाज बांधव सरकारकडे आरक्षण मागत आहेत, त्यांना देखील यापुढे आरक्षणाच्या लढ्यात सोबत घेऊन ठोक मोर्चात सहभागी करून घेणार आहे, असेही महाडीक म्हणाले.
 राज्य सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. महाराष्ट्रातील 391 गड किल्यांचे संवर्धन करून त्यांचे स्वतंत्र सातबारा व खाते उतारे निघतील, अशी व्यवस्था करावी. विनायक मेटेंनी शिवस्मारक बांधकाम विलंबप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच स्मारकाच्या उंचीबाबत लवकर प्रतिक्रिया द्यावी. भूमिपूजन कार्यक्रमात पुढे पुढे करणार्या पुरषोत्तम खेडेकर शिवस्मारकाची जागा बदला म्हणताहेत, याचा अर्थ ते मराठा विरोधक आहेत. त्यांना हे स्मारक होऊ द्यायचे नाही का, असा सवाल उपस्थित करत सरकारने अखिल भारतीय मराठा सेवा संघ व समन्वय समितीच्या सर्व मागण्या त्यावरती सुचवलेल्या उपायानुसार लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिका मांडली. त्याचबरोबर ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व मराठा आमदार, खासदार व महत्त्वाच्या पदावर असणार्या लोकांनी राजीनामे द्यावेत. ज्या मराठा बांधवांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्यांनी देखील या लढ्याला पाठिंबा द्यावा. अन्यथा 18 नोव्हेंबर नंतर निघणारे बोलके ठोक मोर्चे कोणालाही परवडणारे नसतील, असेही ते शेवटी म्हणाले.

एसटीच्या तिकीट दरात दहा टक्के हंगामी दरवाढ


16 नोव्हेंबरपर्यंत दरवाढ लागू राहणार
जत,(प्रतिनिधी)-
दिवाळीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने तिकीट दरात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज (गुरुवार) पासून लागू होणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत राहील. याआधी एसटीने जारी केलेल्या पत्रकात 20 नोव्हेंबरपर्यंत हंगामी दरवाढ लागू असेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, 19 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने भाविकांना वाढीव दरात प्रवास करावा लागू नये यासाठी ही भाडेवाढ 1 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऐन सणाच्या काळात हंगामी भाडेवाढ करण्यात आल्याने वाढत्या महागाईत आणखी भर पडली आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. दिवाळीसाठी शहरातून राज्याच्या कानाकोपर्यात जाणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. आधीच खासगी गाड्यांनी अव्वाच्या सव्वा दरवाढ केली आहे, आता त्यात महामंडळाच्या गाड्यांची भर पडली आहे.

Tuesday, October 30, 2018

टँकरचे अधिकार तहसीलदारांना द्या


जत,(प्रतिनिधी)-
गेल्या महिन्याभरापासून जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. 28 गावांनी गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करा, अशी लेखी मागणी महसूल विभागाला दिले आहेत. पण तरीही प्रशासन चालढकल करीत आहे. साहजिकच लोकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. टँकर देण्याचे आधिकार पूर्वीप्रमाणे तहसीलदारांना देण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. त्यामुळे संबंधित गाव-वाडी-वस्त्यांची पाहणी करून तहसीलदार टँकर सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करीत होते. मात्र सध्या हे अधिकार शासनाने जिल्हाधिकार्यांना प्रदान केले आहेत. यामुळे टँकर सुरू करण्याच्या प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे साहजिकच लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. सध्या तालुक्यातील 55 गावांमधल्या लोकांच्या दिवसांची सुरुवात फक्त म्हणजे फक्त पाणी भरण्याने होते. सकाळचे दोन ते तीन तास पाणी भरण्यासाठी जातात.
जत तालुक्याला मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. वास्तविक तीव्र दुष्काळ जाहीर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता होती.पण ती हालचाल अद्याप सुरू झालेली नाही. जतच्या उजाड माळरानावर आता फक्त कुसळेच दिसत आहेत. त्यामुळे जनावरांची चार्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शेतकर्यांची चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली आहे. काही राजकेय पक्षांनी यासाठी मोर्चेदेखील काढले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चार्याचा वापर शेतकर्यांनी काटकसरीने करावा यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. पाणी जपून वापरले तरच हा उन्हाळा सरणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घ्यावे लागणार  आहेत. मात्र प्रशासन अजून वरच्या आदेशाचीच प्रतीक्षा करत आहेत. पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी तहसीलदारांना अधिकार दिल्यास लवकर कार्यवाही होऊन लोकांचे हाल कमी होण्यास मदत होनार आहे.

दिवाळीसाठी बाजारपेठ सजली


विविध प्रकारच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी
जत,(प्रतिनिधी)-
हिंदू धर्मियांचा सर्वात उत्साहाचा सण अशी दिवाळीची ओळख आहे. घरोघरी विविध प्रकारचे फराळाचे जिन्नस बनविले जाऊ लागले आहेत. रांगोळ्या व रंगांची खरेदी सुरू झाली आहे. तोरणे आणि आकाशदिवे बाजारात आले आहेत. विविध प्रकारच्या व विविध आकारातील पणत्या घेऊन विक्रेते आले आहेत. लहान मुले किल्ले करण्याच्या तयारीला लागले आहेत. साड्या, ड्रेस मटेरियल, रेडिमेड ड्रेसेस आणि कॉस्मेटिक्स खरेदीसाठी महिला व तरुणींची गर्दी बाजारात दिसू लागली आहे; तर दुचाकीचारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बुकिंग सुरू झाले आहे.
 दिवाळीच्या निमित्ताने दारात तोरणे लावण्याची परंपरा आहे. पूर्वी झेंडूच्या फुलांच्या माळा घरी बनविल्या जात व मोठी तोरणे आंब्याच्या पानांसह लावली जात. मात्र आता काळ बदलला आहे. तयार फराळाचे जिन्नस ज्याप्रमाणे उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे कृत्रिम तोरणे बाजारात दाखल झाली आहेत. वेगवेगळ्या आकाराची तोरणे घेऊन परराज्यातील विक्रेते गल्लीबोळातून फिरत आहेत. तसेच सांगली-मिरज रस्त्यावर देखील जागोजागी तोरणे लावून हे विक्रेते मुक्काम ठोकून बसले आहेत. या कृत्रिम तोरणांना चांगली असल्याचे दिसत आहे. असली फुलांच्या मनमानी किमती विक्रेते सांगत असल्याने कृत्रिम फुलांकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात वळला आहे.
जतमध्ये अशी तोरणे बनवून विकणारा एक समाज सातारा रोडलगत वसती करून आहे. गेल्या महिनाभरापासून या गल्लीत घरोघरी तोरणे बनवण्याचे काम सुरू होते. एका विक्रेत्याची दररोज पन्नास-साठ तोरणे विकली जातात. शाळांना सुट्ट्या पडल्या नसल्या तरी सकाळ-संध्याकाळ बच्चे कंपनीची गर्दी मावळे विक्रेत्यांकडे होत आहे, तर फटाके विक्रीची दुकाने अद्याप लागलेली नाहीत. सध्या बर्यापैकी गर्दी रेडिमेड कपड्यांच्या दुकानातच दिसत आहे. मात्र अद्याप नोकरदारांचे पगार  झाले नसल्याने दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आलेली नाही. एक-दोन दिवसात हे चित्र पालटेल अशी आशा आहे. सध्या फराळाचे जिन्नस रेडिमेड घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असल्याने या विक्रेत्यांकडे देखील मोठी ऑर्डर नोंद झाली आहे. मेवामिठाईची दुकाने सजली आहेत.

पोलादी पुरुष - सरदार वल्लभभाई पटेल


आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. पोलादी पुरुष म्हणून त्यांची भारतीय राजकारणात प्रतिमा आहे. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. कणखर बाण्याचे व्यक्तिमत्त्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर धोरणांचा अवलंब करून 565 संस्थानांचे विलिनीकरण करून एकसंध भारत उभा केला.
अशा या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नाडियाड इथे 31 ऑक्टोबर 1875 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. आनंद हे त्यांचे गाव. जवळच असलेल्या करमसाद या गावी त्यांची वडिलार्जित शेती होती. झव्हेरीभाई हे त्यांचे वडील. या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. वडिलांनी 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतला होता. त्यामुळे वल्लभभाई यांच्यावर घरीच राजकीय संस्कार झाले होते. त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि बोरसाड येथे वकिली सुरू केली. एक निष्णात वकील म्हणून त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. वकिलीबरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढविली. तिथूनच त्यांचा राजकारण प्रवेश झाला.
महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतकर्यांच्या शेतसारा वसुलीविरोधात हजारो शेतकर्यांची सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व सरदार पटेल यांच्याकडे सोपविले.सरदार पटेलांनी गुजरातच्या खेडा, बोरसद, बारडोली अशा 600 गावांतील हजारो सत्याग्रही शेतकरी बांधवांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुध्द अत्यंत निर्धाराने आंदोलन यशस्वी केले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले आणि महात्मा गांधींच्या सहवासात ते वाढले, फुलले आणि एक कणखर, धाडसी नेता म्हणून लौकिकप्राप्त झाले. असहकार चळवळीत पंडित मोतीलाल नेहरू, सी. आर. दास, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, राज गोपालचार्य आणि चिंतामणी केळकर यांनी वकिलीचा त्याग केला. न्यायालयातील कामकाजावर  बहिष्कार टाकला. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी सन 1942च्या चलेजाव आंदोलनात भाग घेतला. भारताचा राज्यकारभार पाहण्यासाठी काँग्रेस, मुस्लिम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर 1946 साली नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत-पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर हिंदू-मुस्लिम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकीविरुध्द जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लिम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिर्पेक्षता होती.
दरम्यान 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. सरदार पटेल यांनी तत्कालीन 565 संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. त्यांच्या या कामगिरीने सरदार पटेल खर्या अर्थाने पोलादी पुरुष आहेत, हे इतिहाससिद्ध झाले. सरदार पटेल मनाने कणखर आणि विचारांचे पक्के होते, सच्चे होते. त्यामुळेच नेहरूंबरोबरच काय; पण गांधीबरोबरचे मतभेद व्यक्त करायलाही कचरत नसत. सरदार पटेलांचे स्वराज्यनिर्मितीबाबतचे स्वप्न असे होते की, स्वतंत्र भारतात कोणीही उपाशी राहणार नाही. राज्यकारभार आपल्या भाषेतच चालेल. काटकसरीने राज्य कारभार केल्यामुळे जनतेवर भीक मागण्याची वेळ येणार नाही. सैन्याचा वापर देशाचे रक्षण करण्यासाठीच केला जाईल. सर्वांना न्यायाने वागविले जाईल.

भाजपा सरकारला चार वर्षे झाली,विकास मात्र कुठे दिसला नाही


जत,(प्रतिनिधी)-
राज्यात भाजपा सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकार या निमित्ताने आपला लेखाजोखा मांडत असताना आपण विकास कामांचा डोंगर रचला हेच ठासून सांगत आहे.पण खरोखरच राज्याचा किती विकास झाला, याची कल्पना जनतेला आहे. या चार वर्षात महागाई मात्र वाढली, हे नक्की. वीज बील, एसटी भाडेवाढ, गॅस- रॉकेलच्या दरात वाढ दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत तर बोलायची सोयच राहिलेली नाही. अशा या महागाईने जनता मात्र मेटाकुटीला आली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला विकास कुठे तरी हरवल्याचेच दिसते. दुष्काळी तालुक्यांची परिस्थिती बदलेली नाही. भाजपाने एक मात्र कमावले. चार आमदार आणि एक खासदार यांच्या मदतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र आपला झेंडा रोवला आहे. जिल्हा परिषद, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्यासह अनेक पंचायत समित्या त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणल्या आहेत. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण त्यांनी तो नेस्तनाबूत करून आपला झेंडा रोवला आहे. पण याचा लाभ इथल्या लोकांना किती झाला, हा संशोधनाचा प्रश्न आहे.
सांगली जिल्ह्याने भरभरून दिले असताना एक साधे मंत्रिपद भाजपाला जिल्ह्याला देता आले नाही. याची सल इथल्या लोकांना आहे. सांगली, विटा-खानापूर, जत, शिराळा असे चार मतदारसंघातून भाजपचे आमदार निवडून आले. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप,आमदार शिवाजीराव नाईक आणि खासदार संजयकाका पाटील निवडून आले. खरे तर हे यश काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उरात धडकी भरणारे ठरले. त्यानंतरही जिल्हा परिषद, सांगली महापालिका त्यांना मिळवता आली, तरीही चार वर्षांनंतरही जिल्हयातील अनेक प्रश्न सोडवता आले नाहीत. योजना कागदावरच सुंदर दिसून आल्या, राबवणारी नोकरशाही आहे तशीच राहिल्याने प्रश्न तसेच रखडले.
 भाजप सरकारने जिल्ह्यातील टेंभू, म्हैशाळसह सिंचन योजनांसाठी निधी मंजूर करुन योजना मार्गी लावल्या, हे यश असले तरी यावर्षी जाणवणारा दुष्काळ कमी होऊ शकला नाही. सांगलीत पासपोर्ट कार्यालय सुरु झाले ही जमेची बाजू ठरली. ड्रायपोर्ट रांजणी या ठिकाणी मंजूर झाला असला तरी याची अंमलबजावणीबाबत अद्याप संभ्रम आहे.सांगलीमध्ये काही कामे दिसत असली तरी त्याच्याने समाधान होणारे नाही. 2014च्या लोकसभा, विधानसभा, निवडणुकीतील भाजपाच्या यशानंतर भाजपाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या. बाजार समिती आणि जिल्हा बँक भाजपाने टार्गेट केले असले तरी भाजपाला अद्याप यश आलेले नाही. सांगली महापालिकेत भाजपाची सत्ता आली. शंभर कोटीचे अनुदानही मंजूर झाला. मंजूर आराखड्याप्रमाणे कामे मंजूर झाली तर चार वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलण्यास निश्चित मदत होईल.
 सांगली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना भाजप सरकारने राबवली. जलयुक्त शिवाराची कामे दिसली, पण प्रभाव दिसला नाही. जलयुक्त शिवार या योजनेची चर्चा झाली, मात्र यावर्षी भूजल पातळीचा अहवाल धक्कादायक आल्याने विरोधकांनी टीका केली. एक फुटाने भूजलपातळी कमी झाल्याचा अहवाल आला. जिल्ह्यात म राठा आरक्षणे, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षणासाठी मोर्चे निघाले. भाजप सरकारला ही सर्व आरक्षणाची आंदोलने हाताळण्यात यश आले असले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. मराठा समाजासाठी आणासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध विकासाच्या योजना, मराठा समाजातील मुलांसाठी वसतीगृह असे काही प्रश्न मार्गी लावले. मुद्रा योजनेअतंर्गत कर्ज पुरवठा करताना नेत्यांच्या शिफारसीनुसार केल्याचा आरोप झाला, सामान्य नागरिक या योजनेवर नाराज आहे. यामुळे ही योजना वादात सापडली. जिल्हा प्रशासनात फारसा फरक दिसत नाही. पोीलस प्रशासनाचा कारभार सुधारला नाही. गुन्हेगारीचा धाक वाढला आहे.  अवैध धंदे थांबलेले नाहीत. पंचायत समिती, जिल्हा परिषदांना निधीच्या रुपाने पैसाच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात विकास दिसून आला नाही. जि.. आणि पं..चे पदाधिकारी नामधारी राहिले आहेत. भाजपाने खूप काही करायला हवे होते,पण करता आले नाही.
सांगली जिल्ह्यात भाजपाच्या परड्यात भरभरून पडले असले तरी उलटपक्षी मात्र काही मिळाले नाही. याची संधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेता आली नाही. एकमेकांची जिरवाजिरवी काही काँग्रेसमधील संपलेली नाही. चार वर्षात काँग्रेस स्ट्रॉन्ग होऊ शकली नाही. भाजपच्या सत्तेची चार वर्षे पूर्ण होत असताना भाजपामधील अंतर्गत संघर्षाचा राजकीय फायदा ही काँग्रेस आघाडीला मिळवता आला नाही. खासदार संजय पाटील यांची भाजपामधील नेत्यापेक्षा आजही काँग्रेस आघाडीमधील नेत्यांशी सलगी राहिली. आता वर्षच राहिले आहे. त्यातच मध्यावधी निवडणुकीची चर्चा रंगली आहे. असे झाले तर राज्य सरकारला काहीच करता येणार नाही.याचा नक्कीच फटका बसू शकतो,पण हा लाभ उठवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कमालीचा प्रयत्न करायला हवा,पण तो कुठे दिसत नाही.

गारपीटग्रस्तांना मदत मिळवून देणार: आमदार जगताप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील रामपूर, घाटगेवाडी,कंठी, वाषाण व परिसरातील काही गावांमध्ये नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, पपई व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असून या सर्व शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले. रामपूर येथे आमदार विलासराव जगताप यांनी दोन दिवसापूर्वी भेट देऊन गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्ष बाग व भाजीपाला पिकाची पाहणी केली. यावेळी जत पंचायत समितीच्या सभापती सुशीला तांवशी, माजी सभापती प्रकाश जमदाडे, माजी सरपंच मारुती पवार, शिवाप्पा तांवशी आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, रामपूर परिसरात अचानक झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बाग, भाजीपाला, ढबू मिरची, पपई, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करण्याची सूचना तहसीलदार व कृषी विभागाच्या कर्मचारी असून त्यांनी गेल्या दोन दिवस झाले पंचनामे सुरू केले आहेत. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शासनाला अहवाल गेल्यानंतर या शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितल

11 लाखांच्या सुगंधी तंबाखूसह गुटखा जप्त


सांगली,(प्रतिनिधी)-
 मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानातून अकरा लाखांची सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न-औषध प्रशासनाने संयुक्त ही कारवाई करण्यात आली. लाजम सिकंदर मुजावर याच्या नावावर हा परवानाधारक अन्न प्रशासनाने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकाना सुगंधी तंबाखूसह गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू, गुटखा मिळून आला. त्यानंतर तातडीने अन्न प्रशासनाच्या विभागास कळविण्यात आले. अन्न प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केले. तेथून सुगंधी तंबाखू, विविध प्रकारचा गुटखा असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या मालाची मोजणी सुरू होती. कारवाईत एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, राजुक कदम, विजयकुमार पुजारी, जगु पवार, विद्यासागर पाटील, अमित परीट, युवराज पाटील, निलेश कदम, संतोष कुडचे, सुनील लोखंडे, महादेव धुमाळ, शशिकांत जाधव, अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, डी. एच. कोळी, अनिल पवार, रोहन शहा, स्मिता हिरेमठ यांचा कारवाईत सहभाग होता. या कारवाईच्या निमित्ताने धक्कादायक माहीती पुढे आली. गेल्या दोन वर्षांत याच नानवाणीच्या दुकानात वारंवार छापे टाकून गुटखा जप्त करण्यात आला. गेल्यावेळी कोट्यवधींचा गुटखा या दुकानातून जप्त करण्यात आला होता. त्यानंतरही पुन्हा राजरोजपणे जिल्हाभर विक्री केली जात होती. दुकानाचा परवाना एकाच्या नावाने चालवणारा वेगळाच असे हे मोठे कनेक्शन यानिमित्ताने पुढे आले आह.

जत तहसील कार्यालयासमोर उपोषण


दुय्यम निबंधकांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक वाय. आर. रोकडे हे गेल्या अनेक महिन्यांपासून खरेदी दस्ताची नोंद करत असताना अडवणूक करत असून त्यांच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई करावी, या मागणीसाठी जत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकांना निवेदन दिले असून या निवेदनावर बादशहा निपाणी, शहाजी वाघमोडे, कृष्णा कोळी, नितीन पोतदार, शंकरराव बिचुकले, हनुमंत कोळी, श्रीशैल हिप्परगी, प्रमोद सावंत, प्रवीण जाधव, समीर मुल्ला, रमेश कोळेकर, नागेश पांढरे, विवेक चव्हाण, बसवराज पाटील, रामचंद्र खांडेकर, रमेश तंगडी आदींच्या सह्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, जत येथील दुय्यम निबंधक वाय. आर. रोकडे हे शासन नियमाप्रमाणे काम न करता नागरिकांची अडवणूक करीत आहेत. दस्तनोंदणी करताना आवश्यक नसताना व पत्राचे कलर झेरॉक्स; तसेच तारीख असलेल्या फोटोची सक्ती करण्यात येते. पक्षकारांना प्रत्येक दस्तामागे चारशे ते पाचशे रुपयांचा नाहक भुर्दंड बसत आहे. तालुक्यात सर्व गावात सातबारा ऑनलाईन झाले असताना ऑनलाईन सातबारा सोबत हस्तलिखित सातबारा जोडण्याची सक्ती केली जाते. शासन नियमाप्रमाणे गुंठेवारीची जागा सक्षम अधिकार्यांच्या ना हरकत दाखला घेऊन सर्वत्र केले जातात. परंतु हे रजेवर गेल्यानंतर मात्र पर्यायी आलेले दुय्यम निबंधक अशी दस्त नोंदणी करतात. त्यामुळे निबंधक बदलले की नियम बदलतात का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दस्त नोंदणीसाठी मुद्रांक नोंदणी फी; तसेच दस्त हाताळणी फी ऑनलाईन असताना दस्त नोंदणीनंतर पक्षकाराकडून वेगळे शंभर रुपये व इतर फी घेत असून वरील सर्व गैरव्यवहाराची चौकशी व्हावी व दुय्यम निबंधक रोकडे यांची बदली करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

विविध मागण्यांसाठी ’रिपाइं’चा जत तहसील कार्यालयावर मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
   जत तालुका दुष्काळ जाहीर करा. बालगाव,बोगीॅ आदी गावांमध्ये  मागासवर्गीय  समाजावर झालेल्या अन्यायाची  चौकशी करा. दलितांच्या   जमिनी ज्यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्या, त्यांची चौकशी करा. उमदी व माडग्याळ तालुके  करा. आणि जत पंचायत समितीमधील शाखा अभियंत्याची बदली करा,  अशा मागण्या घेऊन  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाजत शाखेच्या वतीने तहसील कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सकाळी बारा वाजता मार्केट यार्ड येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मंगळवार पेठ, लोखंडी पूल, संभाजी चौक, शिवाजी पेठ या मार्गे  दुपारी दीड वाजता हा मोर्चा तहसिल कार्यालयाच्या आवारात आला.या  ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चात सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे,  रिपाईचे नेते संजय कांबळे,  जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, अशोक कांबळे, रुपेश शिंदे, बाळासाहेब उमाप ,  नारायण कामत, संजय पाटील, प्रशांत ऐदाळे, अरुण भाऊ, आठवले, धोंडीराम चंदनशिवे, सुभाष कांबळे, प्रभाकर नाईक, नीलेश वाघमारे, अरविंद कांबळे आदी नेते उपस्थित होते.
या मोर्चासमोर बोलताना सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे म्हणाले की,  जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे या तालुक्याला गेल्या वर्षभरापासून पावसाचा पत्ता नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर व ज्या ठिकाणी जनावरांना चारा छावण्यांची मागणी आहे,  त्या ठिकाणी चारा छावणी देण्याची गरज आहे तसेच जत तालुक्यातील दलितावर ती मोठ्या प्रमाणात अन्याय  होत असून तो अन्याय दूर करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे अन्यथा या मोर्चाद्वारे सूचक इशारा आम्ही देत असून यापुढे जर दलितांवर अन्याय होत असतील तर रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रिपाई नेते  संजय कांबळे म्हणाले की, जत तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मागासवर्गीय योजनांच्या अनेक फायली जाणून-बुजून जिल्हा परिषदेला पाठवल्या जात नाहीत. याचा अन्याय तालुक्यातील दलितावर होत असून पंचायत समिती मधील बांधकाम विभागातीलशाखा अभियंता ए. एम. शेख यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांची बदली करावी अशी आमची मागणी आहे. जत तालुका हा विस्ताराने मोठा असून या तालुक्याचे विभाजन करून उमदी व माडग्याळ असे दोन तालुके करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. जत तालुक्यातील मागासवर्गीयांच्या जमिनी ज्यांनी बेकायदेशीरपणे खरेदी घेतलेला आहेत,  त्या मूळ मालकाला परत मिळाव्यात. तालुका हा गेले वर्षभर दुष्काळाच्या खाईत सापडला असून प्रशासन मात्र टँकर व चारा छावणी द्यायला तयार नाही याची दखल घेऊन येत्या आठ दिवसात मागेल त्याला टँकर व मागेल त्याला काम मिळाले पाहिजे रासप चे  माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील म्हणाले की,  रिपाईने काढलेला हा मोर्चा जनतेसाठी महत्त्वाचा असून तालुक्यात अनेक गावे दुष्काळाने होरपळून निघत आहेत 50 ते 60 टक्के लोक आता ऊसतोडीला गेले असून या तालुक्याला तातडीने दुष्काळाच्या उपाय योजना कराव्यात रिपाईने काढलेल्या मोर्चाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


चांगल्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण वधारेल : खासदार संजयकाका पाटील


जत,(प्रतिनिधी)-
चार वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांचा बॅकलॉग  पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे. ग्रामीण भागातील रस्त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कोट्यावधीचा निधी दिल्याने  शेतीपूरक व्यवसायाची चलती होणार आहे. यामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण वधरणार आहे, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. अर्थसंकल्पीय व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील 32 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ खासदार संजयकाका पाटील व  आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार पाटील म्हणाले, आमदार जगताप सारखा अभ्यासू माणूस निवडून आल्याने तालुक्याचा विकास गतीने होत आहे. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने विकासाची दारे खुली झाली आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा तालुका मोठया विश्वासाने आमच्या पाठीशी राहिला. निवडणुकीच्या वेळी लोक पाण्याचा समस्यांचा पाढा वाचत होते. त्यामुळे आमदार जगताप आणि मी अथक प्रयन्त करून म्हैसाळची योजना पंतप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करायला लावले. त्यामुळे या योजनेला निधी मिळाला आहे. त्यामुळे लवकरच तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येणार आहे.
आमदार जगताप म्हणले, रस्त्याचा बॅकलॉग भरून काढताना तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणले. त्याची कामे सुरू आहेत. कोण काय टीका करताय याकडे लक्ष न देता केवळ विकासाचे धोरण समोर ठेवले आहे. भाजप सरकारने शहराबरोबरच ग्रामीण  रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याचा बॅगलॉग भरून काढता आला.  येणार्या काळात आणखीन विकासाला गती देणार आहोत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले,
दरम्यान, तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 42 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात जत ते उमराणी (128 लक्ष), बसर्गी ते गुगवाड (79 लक्ष), जिरगयाळ ते वज्रवाड (29.25 लक्ष), डफळापूर ते अनंतपुर (21.50 लक्ष), अंकले ते डफळापूर (246 लक्ष), प्रतापूर ते खांडेकर वस्ती (147.98 लक्ष), कुंभारी ते चौगुले वस्ती (276.79 लक्ष), कुंभारी ते बेळूखी (89  लक्ष), कंठी ते बाज (138 लक्ष), कुंभारी ते कोसारी रस्त्यावर पूल बांधणे (87 लक्ष), शेगाव ते कोसारी रस्त्यावर पूल बांधणे (128 लक्ष), शिंगनहळळी ते वाळेखिंडी (138 लक्ष), जवळा जिल्हा हद्द ते डिसकळ (57 लक्ष), सावंतवाडी फाटा ते निगडी खुर्द (87 लक्ष), येळवी ते निगडी (85 लक्ष), नराळे ते घोलेश्वर (187 लक्ष), जिल्हा हद्द ते खैराव (105 लक्ष), येळवी ते चौगुले वस्ती (पारे रोड) (134 लक्ष), येळवी ते हंगीरगे (20 लक्ष).वळसंग ते कोळगिरी (173 लक्ष), कोळगिरी ते सोरडी (137 लक्ष), आसंगी ते ललमाणतांडा (.) (343 लक्ष), गोंधळेवाडी ते कुलाळवाडी (326.61 लक्ष), अंकलगी ते संख (103 लक्ष), उटगी ते अंकलगी (210 लक्ष), सोन्याळ ते बगली वस्ती (134 लक्ष), उमदी ते सोनलगी (191 लक्ष), उमदी ते सुसलाद (73 लक्ष), बोर्गी ते आक्कळवाडी (105 लक्ष), आक्कळवाडी ते गिरगाव (106 लक्ष), मोरबगी ते माणिकनाळ (90.75 लक्ष), संख ते तिकोंडी (75.50 लक्ष) या रस्ता कामाचा समावेश आहे, यासाठी एकूण 42.70 लक्ष निधी खर्च होणार आहे.
यावेळी सभापती सुशीला तांवशी, उपसभापती शिवाजी शिंदे,  जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सौ मंगल नामद, सौ स्नेहलता जाधव, महादेव पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, आप्पासाहेब नामद, शिवाप्पा तांवशी, दिग्विजय चव्हाण, अप्पा मासाळ, अर्चना पाटील, मन्सूर खतीब, अभिजित चव्हाण,  प्रभाकर जाधव, लक्ष्मण बोराडे,  राजू चौगुले, सज्जन चव्हाण, महादेव पाटील, कुंडलिक दुधाळ, माणिक वाघमोडे, नाथा पाटील आदी उपस्थितीत होते.


                            जत: अर्थसंकल्पीय व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 32 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करताना
खासदार संजय काका पाटील व मा. आमदार विलासराव जगताप आदी

बनावट दाखल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोघांवर गुन्हे


जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पासाहेब सिध्दू माळी व न्यू इंग्लिश स्कूल कोसारीचे मुख्यध्यापक सुरेश लक्ष्मण सावंत यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी जत पोलिसात कुंभारी गावचे ग्रामस्थ काकासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला ही अटक करण्यात आली नाही.
अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब माळी हे कुंभारी ग्रामपंचायत सदस्य आहेत. प्रभाग 4 मधून त्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. सदर निवडणूकीसाठी त्यांनी हिंदू-माळी असल्याचे जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र, आप्पासाहेब माळी यांच्या शाळा सोडल्याच्या दाखलावर हिंदू-लिंगायत अशी नोंद आहे. यासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्यध्यापक सुरेश सावंत यांच्याशी संगनमत करून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू-लिंगायत ऐवजी हिंदू-माळी अशी नोंद केली होती. माळी व सावंत यांनी संगनमत करून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्यावर जत पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास गजानन कांबळे आहे.

कर्नाटक पोलिसांकडून जतमधील एकास अटक


जत,(प्रतिनिधी)-

कर्नाटक पोलीसाना अनेक गुन्ह्यात हवा असलेला अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी आलेल्या कर्नाटक पोलीसावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र यावेळी कर्नाटक पोलीसानी हवेत गोळीबार केल्याची अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतची माहिती अशी की,कर्नाटकातील रायचूर पोलीस ठाण्यात अमर शंकर चव्हाण (रा.सातारा रोड,पारंवधी तांडा) यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.त्यांच्या शोधासाठी रायचूरचे पोलीस पथक शुक्रवारी सांयकाळी जत येथे आले होते.पोलीस निरिक्षक हणमंत रेड्डी यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मोबाईल वरून दिली होती.
पोलीस पथकाने शोधाशोध करून संशयितास ताब्यात घेतले.त्याला घेऊन जात असताना तांड्यावरील त्यांच्या नातेवाईकांनी पोलीसाचा पाटलाग केला.पोलीस पथकावर दगडफेक सुरू केली.दगडफेकीत पोलीसांनी आणलेल्या खाजगी गाडीचे नुकसान झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे मार्शल पथक घटनास्थंळी दाखल झाले.त्यामुळे हल्लेखोर पसार झाले.कर्नाटक पोलीसाचे पथकही जत पोलीस ठाण्यात आले.मात्र त्यांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिली नाही.
दरम्यान कर्नाटक पोलीसानी हवेत गोळीबार केल्याची अफवा जत तालुक्यात फसरली होती.त्यामुळे जत पोलीसांनी परिसरात असलेल्या अनेक सीसीटीव्ही कँमेराचे फुटेज तपासून पाहिले.सदर घटनेवेळी हवेत गोळीबार झाला नसल्याची सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.जत पोलिसांनीही गोळीबारांच्या घटनेचा इन्कार केला आहे.


Monday, October 29, 2018

जतमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण


जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजारांमुळे नागरिक अक्षरश: बेजार झाले आहेत. इतके असतानादेखील याकडे आरोग्य खाते व नगर परिषद यांचे  दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त होताना दिसत आहे. सत्ताधार्यांना नागरिकांची फिकीरच नाही, असा आरोप होत आहे.
 गेल्या सहा महिन्यांपासून शहरात अनेक नागरिकांना चिकनगुनिया, मलेरिया,डेंग्यूचा या आजारांनी थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छते- मुळे या साथीच्या आजारांचे प्रमाण प्रचंड वाढले असून आरोग्य यंत्रणा मात्रव्हेंटिलेटरवर असून जिल्हाधिकार्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. जत नगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्याचे टेंडर दिले आहे. मात्र सत्ताधारी व नगरसेवक यांच्यात वारंवार होणार्या जुगलबंदीमुळे या टेंडरची नक्की काय अवस्था आहे, हे नागरिकांनाही कळायला मार्ग नाही. महिन्यातून आठ ते दहा दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे अनेक नागरिक वैतागून कचरा रस्त्याच्या बाजूला टाकतात. तो कचरा पुन्हा गटारीत गेल्यानंतर गटार तुंबून या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत विविध भागातील अनेक नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र मुख्याधिकार्यांसह पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नगरपरिषदेचे शहरातील आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक प्रभागात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा या शहरात काम करत नाही. त्यामुळे चिकनगुनिया व डेंग्यूचे रुग्ण वाढले असून खासगी दवाखान्यांत रुग्णांची रीघ लागली आहे. याची दखल घेऊन मुख्याधिकारी व सत्ताधार्यांनी वेळीच लक्ष देऊन जत शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जत शहरात गेल्या सहा महिन्यांपासून चिकन गुनियाची साथ सुरू झाली आहे. शहरातील काही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व काही पत्रकारांनाही चिकनगुनिया झाला असून जत नगरपरिषदेने चिकुन गुनियाचा निपटारा होण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे. जत शहरातील अस्वच्छता पाहता नगरपरिषदेने स्वतंत्र कक्ष स्थापन करून गटारी स्वच्छ करणे, रस्ते स्वच्छ करणे, स्वच्छतागृह स्वच्छ करणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.