शिक्षक संघाचे शिष्टमंडळ
जत,(प्रतिनिधी)-
प्राथमिक शिक्षकांना बारा वर्षानंतर मिळणाऱ्या वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी (चटोपाध्याय) दि. 23 ऑक्टोबर 2017 च्या शासन आदेशान्वये विद्या प्राधिकरणाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले आहे.त्यामुळे अनेक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र असूनही केवळ प्रशासनाने प्रशिक्षण दिले नसल्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित आहेत.
त्याबाबत शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद स्तरावर सातत्याने आवाज उठवण्यात आला, परंतु शासन आदेश असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले असुन अद्याप मार्गदर्शन प्राप्त झाले नाही. म्हणून शिक्षक संघाने थेट शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक सुनील चौहान, विद्याप्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांची भेट घेतली. यावेळी विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.
शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत व वरिष्ठ वेतन श्रेणीच्या बाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल.अशी माहिती त्यायावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, सुधाकर पाटील, बसवराज एल्गार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment