मकरंद देशपांडे
जत,(प्रतिनिधी)-
भाजपने
गेल्या साडेचार वर्षांत जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावली आहेत. तालुक्यातील राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग व म्हैसाळ
योजना पूर्णत्वास निघाली. त्याच धर्तीवर विकास कामांचा लोकार्पण
सोहळा नागज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन
गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने
उपस्थित राहा, असे आवाहन भाजप जिल्हा समन्वयक मकरंद देशपांडे
यांनी पत्रकार बैठकीत केले.
नागज येथील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या
नियोजनाची बैठक जत येथील उमा नर्सिंग कॉलेज येथे झाली. अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप हे होते. यावेळी
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी-पाटील,
शिवाजी ताड, माजी सभापती प्रकाशराव जमदाडे,
आप्पासाहेब नामद, पंचायत समिती सभापती सुशीला तावंशी,
सरदार पाटील, अॅड.
प्रभाकर जाधव, सुनील पवार, श्रीपाद आष्टेकर, संजय सावंत, उमेश
सावंत, प्रकाश माने आदीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
ते म्हणाले, रविवार,
दि.23 रोजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व म्हैसाळ योजनेला
पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. ती 2019 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे
या विकासकामांचा लोकार्पण सोहळा नागज येथे होणार आहे. राज्यातील
मंत्री, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment