शुक्रवार दि.21 डिसेंबर 2018
दहा रुपयांचे नाणे चलनात राहणार
नवी दिल्ली: दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाली
नसल्याचे गुरुवारी संसदेत स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात राष्ट्रीय
जनता दलाचे खासदार जयप्रकाश यादव यांनी लोकसभेत शून्य प्रहरात प्रश्न विचारला होता. बाजारात दहा रुपयांची खोटी नाणी आल्याने
अनेक ठिकाणी दुकानदारांकडून ती स्वीकारली जात नाहीत. ही नाणी
एकूण 14 प्रकारात आहेत.
मुंबई: इतर
मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षण
मर्यादेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या अर्जावर 9 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ओबीसीमधील जातींचे
आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर हा
अर्ज सादर करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा
आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना आता ओबीसी आरक्षणालाही
न्यायालयात आव्हान मिळाल्याने फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
मुंबई: कांद्याचे
भाव कोसळल्याने संकटात सापडलेल्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल
200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
घेण्यात आला. मात्र, 1 नोव्हेंबर ते
15 डिसेंबर 2018 या कालावधीत मुंबई वगळता राज्यातील
कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्या शेतकर्यांनी कांद्याची विक्री
केली त्याच शेतकर्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
यासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment