Friday, May 31, 2019

उच्च रक्तदाबामुळे मृत्यू व अपंगत्वाचा धोका!

जत,(प्रतिनिधी)-
उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा 'सायलेंट किलर' समजला जातो, कारण, या आजाराची निश्‍चित अशी लक्षणे नसतात. पण, त्यामुळे कार्डिओव्हस्क्युलर तसेच अन्य गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात आणि मृत्यूही येऊ शकतो. भारतात 4 पैकी एका पुरुषाला, तर 5 पैकी एका स्त्रीला उच्च रक्तदाबाने ग्रासल्याची माहिती एका सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे.

यंदाच्या अकरावीच्या परीक्षेत होणार बदल

जत,(प्रतिनिधी)-
अकराव्या वर्गाच्या परीक्षेच्या पद्धतीत यंदापासून बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षा पद्धतीप्रमाणेच आता अकरावीची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावीचा अभ्यासक्रम आणि त्यानुसार पाठय़पुस्तके बदलली आहेत.

शनी कथा आणि इतिहास

शनी ग्रह मंदगतीने फिरणारा म्हणून त्याला शनैश्‍वर हे एक नाव मिळाले. शनी ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास साधारण ३0 वर्षे घेतो. या कालावधीत तो १२ राशींतून पार होतो. म्हणजे एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो. फलज्योतिषानुसार तो तुमच्या आधीच्या राशीत आला की, तुमच्यावर अडीच वर्षे, मग तुमच्या राशीत आल्यावर आणखी अडीच वर्षे व पुढच्या राशीत गेल्यावर तिसरी अडीच वर्षे अशी एकूण साडेसात वर्षे प्रभाव गाजवतो. हीच साडेसाती होय. ती नशिबी आल्यावर शनिदेव रावाचा रंक बनवू शकतो, पण तो जसा मारक आहे तसा तारकही आहे. सदाचारी, कर्ममार्गी माणसांचे कल्याण करतो, पण त्याला उपेक्षा केलेली अजिबात सहन होत नाही. टिंगलटवाळी करणारा माणूस एरवी कितीही थोर असला तरी हा देव त्याचे हालहाल करून सोडतो. म्हणून त्याची आराधना केली जाते. शनिदेवाची प्रतिमा, लीला, कौटुंबिक पार्श्‍वभूमी वगैरेंची माहिती पुराणे, फलज्योतिष व शनिमाहात्म्यासारख्या पोथ्या व र्शावणी शनिवारच्या कहाण्या यातून मिळते.

Thursday, May 30, 2019

एसटी झाली ७१ वर्षांची

एसटीने कात टाकली;पण समस्यांए कायम
जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील खेड्यापाड्यातून, गावांगावांतून लीलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी, १ जून रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सगळ्या ५६८ बसस्थानकावर मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे.

बसवराज पाटील यांना तालुका आदर्श सरपंच पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्यातील सर्व  सरपंचांचे अधिवेशन नुकतेच शिर्डी  येथील शांतीकमल हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी  राज्यस्तरीय आदर्श सरपंच व  उद्योजक पुरस्कार वितरण व  सन्मान सोहळा संपन्न झाला. या अधिवेशनात  सांगली जिल्ह्यातील  एकुंडी (ता. जत) येथील सरपंच बसवराज पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जत पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन

चार आरोपींना अटक 
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील पोलिसांवर हल्ला प्रकरण झाल्या नंतर जत पोलिस ठाण्याने अचानक कोबिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांना अटक केली.
 जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे आदेशान्वये व सूचनेप्रमाणे मा उपविभागीय पोलीस  अधिकारी दिलीप जगदाळे यांचे
मार्गदर्शनाखाली जत शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीसांनी जत शहरातील गुन्हेगार राहत असलेल्या वस्त्यावर स्टाफसह कोंबिंग ऑपरेशन राबवले.

Wednesday, May 29, 2019

मान्सूनची वाटचाल संथ; पेरणीला घाई नको!

जत,(प्रतिनिधी)-
मे संपत आला तरी अद्याप अंदमानात दाखल न झालेल्या मान्सूनची वाटचाल यंदा संथ राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यात तो उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर उन्हाचा ताप आणि पाणी टंचाईचे चटके यात रोजचीच भर पडत आहे.

जत शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध विक्रम सावंत,सुरेश शिंदे यांची ग्वाही


जत,(प्रतिनिधी)-
जत शहराचा विकास हेच आमचे ध्येय असून शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक,काँग्रेसचे नेते विक्रम सावंत आणि राष्ट्रवादी चे नेते सुरेश शिंदे यांनी दिली.

वॉटर कप स्पर्धेत यश मिळवलेल्या गावांना जिल्हा बँकेमार्फत 25 हजारांचे बक्षीस

जत,(प्रतिनिधी)-
 गतवर्षाच्या 'सत्यमेव जयते वाटर कप' स्पर्धेत  यश मिळवलेल्या जत तालुक्यातील पाच गावांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस  जत येथे समारंभपूर्वक देण्यात आले.

शेळ्या-मेंढ्यांना चारा,आसरा मिळणार

शासनाच्या निर्णयाने दिलासा
जत,(प्रतिनिधी)-
शिवारात चारा नाही, पाणी नाही, बागायती भागात  बसण्यास शेते नाहीत. यामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे 5 ते   6 लाख शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरांचे हाल-हाल सुरू आहेत. आक्रोश करून थकलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला आहे.पण प्रत्यक्षात शेळ्या, मेंढ्या साठी छावण्या सुरू झाल्यावरच त्याचा लाभ मिळणार आहे. दूरवर गेलेल्या  मेंढपाळांना आता जिथे कुठे आहेत,तिथेच आसरा मिळाला तर बरे होईल,अशी अपेक्षा केली जात आहे. 

Tuesday, May 28, 2019

जतमध्ये पोलिसांवर हल्ला

जत,(प्रतिनिधी )-
शहरातील सातारा रस्त्यानजीक पारधी तांडा येथील अटक वॉरंट असलेल्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या  दोघा समर्थकांनी  हल्ला केला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. प्रवीण शहाजी पाटील असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

बळीराजाला प्रतीक्षा वळीवाच्या पावसाची

पूर्व मोसमी सरींचा दुष्काळ;मशागतीची कामे खोळंबली
जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळाने होरपळणाऱ्या बळीराजाचा वळीवाच्या पावसानेही अपेक्षाभंग केला असून पूर्व मोसमी सरींच्या दुष्काळाने खरीप पूर्व मशागतीची कामे सध्या खोळंबली आहेत.
24 मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले असून या नक्षत्रात वळीवाचा पाऊस अपेक्षित असतो.या  पावसाने खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग येतो.पूर्व मोसमी सरींनी हजेरी लावली असती तर दुष्काळी जनतेला दिलासा मिळाला असता. पावसाअभावी जळून जात  असलेल्या उन्हाळी पिकांनाही जीवदान मिळाले असते.

बिळूरमध्ये उत्पादन शुल्कची कारवाई;तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जत-बिळूर मार्गावर बिळूर गावाच्या हद्दीत सात हजार मेट्रिक टन मळी आणि दोन वाहने असा सुमारे 12 लाख 67 हजार 800 इतका मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा रोखीने पगार मिळणार

जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अर्जित रजा भोगल्या नसतील तर त्यांना आता सेवानिवृत्त समयी किंवा मृत्यूनंतर त्याचा पगार मिळणार आहे.नव्या सातव्या वेतन आयोगानुसार हा लाभ मिळणार आहे.

Sunday, May 26, 2019

(वाचकांचे पत्र ) नव्या सरकारपुढील आव्हाने


भारताला आर्थिक मजबुतीकडे नेण्याची गरज आहे.याशिवाय रोजगार निर्मिती, गुंतवणूक, अर्थ व्यवस्थेतील मंदगती दूर करण्यासाठी उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. देशातल्या कृषी क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष देताना शेतकरी त्याची संपन्नता कशी वाढवू शकेल,याचा प्राधान्यक्रमाने विचार करावा लागणार आहे. वित्तीय आघाडीवर वाढती वित्तीय तूट चिंतेची बाब बनली आहे. जवळपास 3.9 ते 4 टक्क्यांपर्यंत वित्तीय किंवा राजकोशीय तूट पोहचली आहे.

रावळगुंडवाडीला 2 जूनला मोफत त्वचारोग शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे रविवार दिनांक 2 जून रोजी  मोफत त्वचारोग शिबिर आयोजित करण्यात आले असून पंचक्रोशीतील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन सत्यम आणि माळी फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

घोंगडी खरेदीकडे ग्राहकांची पाठ


जत,(प्रतिनिधी)-
जतसह कवठेमहांकाळ, सांगोला, खानापूर, आटपाडी भागात मोठ्या प्रमाणात मेंढीपालनाचा व्यवसाय केला जातो. मोठ्या प्रमाणात पुर्वीपासून शेळ्यामेढ्यांचे कळप आढळतात. काहीजणांच्या तर पूर्ण चरीतार्थच या व्यवसायावर चालत असतो. मेषपालनाबरोबर त्याठिकाणी लोकर कताईचाही दुय्यम व्यवसाय केला जातो. लोकरीपासुन उत्कृष्टरीत्या घोंगडी व जेनची निर्मिती होत असते. परंतू सध्याच्या आधुनिक जमान्यात तयार धाटणीतील रग, चादर व ब्लँकेट चा सर्रास वापर होत असल्याने घोंगडी व जीनची मागणी कमी आहे. ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

दुष्काळाने विद्यार्थ्यांचे बालपण होरपळे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील दुष्काळाने लोकांचं जगणेही मुश्किल झाले आहे. शेतात पिक नाही, काम धंदा नाही, जवळपास रोजगार नाही. अशा भीषण परिस्थितीत लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यात शालेय मुलांनाही दिवसभर पाण्याच्या मागे लागावे लागत आहे. खांद्यावर, सायकलीवर पाण्याच्या घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण चालली आहे. खेळण्याच्या-बागडण्याच्या या वयात त्यांना जनावरे आणि घरच्यांसाठी पाणी आणण्याच्या मागे लागावे लागले आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादी आता तरी काही बोध घेणार का?


जत,(प्रतिनिधी)-
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा सांगली जिल्हा झिरो असणारा भाजप आज हिरो ठरला आहे. वर्षानुवर्षे पाडापाडीचे, जिरवाजिरवीचे राजकारण करण्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धन्यता मानली. दोन्ही काँग्रेसच्या संघर्षात भाजपची मशागत चांगली झाली ती 2014 मध्ये. मोदीलाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला. या लाटेत संजय पाटील 2014 मध्ये अडीच लाखांच्या फरकाने निवडून आलेही. 2019 ची निवडणूक ही अनेक अर्थाने गाजली. या निवडणुकीच्यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणताच बोध घेतला नाही. आता काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशाचप्रकारचे दुर्लक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केल्यास त्यांना पुन्हा अस्तित्वहीन व्हावे लागणार आहे. सांगली महापालिकापासून जिल्हा परिषद,पंचायत समिती भाजपाने बळकावली आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील ही त्यांची अवस्था फारच लाजिरवाणी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत यावरून काही बोध न घेतल्यास काँग्रेसची आवस्था आणखीनची केविलवाणी होणार आहे.

बच्चे कंपनीला मोबाईलचे वेड; पालकांमध्ये चिंता

जत,(प्रतिनिधी)-
मोबाईलमुळे जगात क्रांती झाली हे खरे आहे. तस बघितलं तर मोबाईल वरदानच ठरावा. कुठेही, कधीही आपल्याला आपल्या माणसांना, मित्रपरिवार, आणीबाणीच्या वेळी, महत्त्वाच्या कामासाठी मोबाईलमुळे संपर्क साधता येतो. परंतु, शाळा, महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्याने जत शहरासह तालुक्यातील बच्चेकंपनी या मोबाईलमध्ये खेळणी म्हणून गुंतल्याने ही बाब पालकांच्या चिंतेत भर घालणारी ठरू पाहते आहे.

गर्मीपुढे एसी, कूलर काम करेना

जत,(प्रतिनिधी)-
मागील तीन दिवसापासून तापमान 42 अंशावर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. त्यात एसी व कुलर काम करेना असेच झाले आहेत. शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा 45 डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

यंदा शिक्षक बदल्यात, पतिपत्नी पुन्हा विस्थापित होणार?

जत,(प्रतिनिधी)-
     गेल्यावर्षी जि.प. अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने शासनाने बदल्या केल्या. यात सुमारे 95 टक्के शिक्षकांच्या बदल्या सोयीस्कर झाल्या. त्यामुळे या बदल्यांना शिक्षकांचा पाठींबा राहिला आहे,मात्र आता याच बदल्याने शिक्षक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक पती-पत्नी पुन्हा विस्थापित होणार असल्याचे बोलले जात आहे.

शमशुद्दीन खतीब यांचे निधन

जत,(प्रतिनिधी)-
 डफळापूर (ता. जत ) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते शमशूद्दीन रूकमूद्दीन खतीब वय- ६० यांचे अल्पशा आजाराने रवीवारी सकाळी रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य दोन मुले व सुना , नातवंडे असा परिवार आहे. माजी सभापती मन्सूर खतीब यांचे ते मोठे बंन्धू होते.मन्सूर खतीब  यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी मोठी साथ दिली होती. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता जियारत (रक्षाविसर्जन) चा कार्यक्रम आहे.

Friday, May 24, 2019

जत शहराला बेशिस्त वाहनचालकांचे ग्रहण

जत,(प्रतिनिधी)-
जत शहराचा विस्तार  झपाट्याने होतो आहे. परंतु अनेक समस्यांनी शहराला ग्रासले आहे. पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका संशयास्पद आहे.  शहरातील वाहतुकीचा  प्रश्‍न मार्गी लावून रहदारी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. जत ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रुपांतर झाले असले तरी वाहतुकीचा प्रश्‍न जैसे थे आहे.  पोलिसांच्या उदासिनतेमुळे शहराला बेशिस्त वाहनचालकांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

उमराणी येथे कर्जास कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या

 
जत,(प्रतिनिधी)-
उमराणी (ता. जत) येथील बाबु लक्ष्मण यादव (वय 44) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख 80 हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. 

Thursday, May 23, 2019

माडग्याळचा रस्त्यावरचा आठवडी बाजार पोलिसांनी हटवला

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील माडग्याळ येथील जत-चडचण या आंतरराज्य मार्गावर  भरवला जात असलेला आठवडी भाजीपाला बाजार उमदी पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने अन्यत्र भरवण्यात आल्याने वाहन चालकांची वाहतूक कोंडीपासून सुटका झाली आहे. याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

खासदार पाटील यांना त्यांच्या मतदारसंघाच्याबरोबरीने मताधिक्य देऊन टाकला विश्वास

जत,(प्रतिनिधी)-
जतच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले असल्याने तालुक्याच्या पूर्व भागातही पाण्याची आशा वाढल्याने जतच्या मतदारांनी खासदार संजय पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. खासदार पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या बरोबरीने सुमारे 46 हजारांचे मताधिक्य दिले आहे. जतच्या लोकांना पाणी आणि विकासकामे हा महत्त्वाचा मुद्दा वाटू लागला आहे.

Monday, May 20, 2019

ज्वारी महागल्याने भाकरी झाली दुर्मिळ


जत,(प्रतिनिधी)-
गेल्या दोन वर्षांपासून जत,सांगोला,मंगळवेढा, बार्शी या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ज्वारीचे आगार असलेल्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. याचा परिणाम ज्वारीच्या दराच्या वाढीत झाले आहे. 20-22 रुपये प्रतिकिलो मिळणारी ज्वारी 32 ते 35 रुपये किलो दराने विकली जात आहे. यामुळे लोकांनी ज्वारीपेक्षा गव्हाला पसंदी दिल्याने ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी दुर्मिळ झाली असल्याचे चित्र आहे.

गोधन वाचविण्यासाठी बळीराजाची कसरत!


जत,(प्रतिनिधी)-
 गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पाण्याची भीषण पाणीटंचाई ग्रामीण भागात जाणवत आहे. जिथे मनुष्यप्राण्यावर पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली तिथे मुक्या जनावरांची काय अवस्थ असेल याची कल्पना न केलेली बरी ! मात्र अशा परिस्थितीतही गोधन वाचविण्यासाठी बळीराजा मुक्या प्राण्यांसाठी मोठी कसरत करत चारा, पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहे. जणू निसर्ग बळीराजाची सत्वपरीक्षाच पाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

थेट जनावरांच्या दावणीला चारा देण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
कर्नाटक सरकार दुष्काळ अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत असताना महाराष्ट्र सरकारला मात्र दुष्काळाशी काहीही देणेघेणे नाही. सरकारला केवळ पैसे वाचवायचे आहेत. जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. चारा छावण्यांच्या जाचक अटींमुळे त्या सुरू करण्यास कोणी तयार होत नाही, त्यामुळे जनावरांना छावणी नको; दावणीला चारा देण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सरकारला जागे करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ


जत,(प्रतिनिधी)-
 पतंगराव कदम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मागील दुष्काळात जनतेला लागेल ती मदत केली. असे असताना आताचे शासन मात्र शेतकर्याकडे दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या सरकारला येत्या अधिवेशनात धारेवर धरून जागे करून उपाययोजना करण्यास भाग पाडू. शिवाय आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी; प्रसंगी स्वतः चारा छावणी काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

रोजगार हमीची कामे बंद; मजुरांचे स्थलांतर


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली असून प्रशासन मात्र लालफितीच्या कारभारात दंग आहे. शेतकर्यांची व शेतमजुरामधील दरी दुष्काळाने संपली आहे. दुष्काळामुळे शेतमजुरांची काम शोधत कर्नाटकात विटव्यवसायासाठी भटकंती सुरू आहे. मोठ्या तालुक्यातील मजुरांचे स्थलांतर झाले असून वृद्ध मजुरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

डफळापूर शाळा क्र.2 च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता-पाचवी ) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इयत्ता-आठवी ) शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून त्यात डफळापूर येथील जि.प.मुलींची शाळा नं 2, या शाळेतील विद्यार्थीनी परीक्षेत सलग चौथ्यावर्षी उज्ज्वल यश संपादन केले.

शिक्षक बँक म्हणजे शिक्षकांना समृद्ध करणारी बँक : दीपक कोळी

जत, (प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे कामकाज विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे व पारदर्शी सुरू आहे सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय समितीच्या नेतृत्वाखालच्या संचालक मंडळाने घेतली असून व्याजदर कमी करून शिक्षकांना न्याय दिला आहे अशी महाराष्ट्रातील 100% वसुली असणारी आणि शिक्षकांना समृद्ध करणारी एकमेव बँक आहे . बँकेची प्रगती पाहूनच जिल्ह्यातील सभासदांनी दुसऱ्यांदा समितीच्या ताब्यात बँकेच्या चाव्या दिल्या आहेत विरोधकांनी किमान पुढची वीस वर्षे तरी बँकेच्या सत्तेची स्वप्ने पाहू नयेत. तालुका शिक्षण समितीचे नेते दीपक कोळी यांनी लगावला आहे.

Sunday, May 19, 2019

पबजी गेमचे तरुणांना वेड; मनोरूग्ण होण्याचा धोका


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील आणि तालुक्यातील तरुण ऑनलाइन पबजी मोबाइल गेमच्या आहारी जात असल्याने तासंतास मोबाइल घेऊन बसत असून याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईलचा अधिक वापर आणि पबजी गेमचे वेड यामुळे युवा वर्ग मनोरुग्ण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पशुधनाला चारा छावण्यांचा आधार; चारा छावण्या वाढवण्याची गरज

जत,(प्रतिनिधी)
यंदाचा दुष्काळ हा तीव्र स्वरुपाचा असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरे जगविणे अवघड बनले असतानाच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शासनाने सुरु केलेल्या चारा छावण्या या पशुधनासाठी आधार ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. छावण्यांमुळे जनावरांच्या चारा, पाण्याची सोय झाल्याने छावणी परिसरातील गावांमधील पशुपालकांमध्ये समाधान दिसून येत आहेमात्र छावणी सुरु केल्यापासून प्रशासकीय यंत्रणेकडील वेगवेगळ्या अटींची पूर्तता बंधनकारक झाल्याने छावणीचालक त्रस्त असल्याचेही स्पष्टपणे लक्षात येत आहे.

ऊस क्षेत्र घटल्याने येत्या हंगामात साखर उत्पादनाचा फटका

जत,(प्रतिनिधी)-
गेल्या मोसमी पावसाळ्यात पर्जन्यराजाने समाधानकारक हजेरी न लावल्याने राज्यात ऊस लागवड थंडावली असल्याने तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी ऊस पिकाचा चारा झाल्याने 2019-20 च्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार असल्याचे चित्र असून सुमारे पंचवीस  टक्क्यांपर्यंत साखर उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि हा अंदाज साखर उद्योगावर दुरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

जत तालुक्यात आणखी सहा चारा छावण्यांना मंजुरी : तहसीलदार पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुष्काळ निवारण्यासाठी जत तालुक्यात यापूर्वी पाच चारा छावण्यांना मंजुरी दिली होती त्या चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. अजून सहा चारा छावण्यांना मंजुरी दिलेली आहे. आतापर्यंत 11 चारा छावण्यांना मान्यता दिली आहे. अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले नवीन मंजुरी दिलेल्या सहा चारा छावण्या मध्ये कुडणूर, बनाळी, वायफळ, कोसारी , अचकनहळी, आवंढी या गावातील संस्थांना मंजुरी देण्यात आलेले आहे. सदरच्या चारा छावण्या तत्काळ सुरू करणे बाबतचा देखील सूचना संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत. तसेच जत पूर्व भागामध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त असल्यामुळे पाणी टंचाई असलेल्या ठिकाणी शासन निर्णयानुसार सहकारी साखर कारखाने सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध खरेदी विक्री संघ, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी स्वयंसेवी संस्था या संस्थेनी जनावरांसाठी चारा छावण्या चालू करण्याकरिता प्रस्ताव या कार्यालयात तात्काळ सादर करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केलेले आहे.

माडग्याळमध्ये बसस्थानक परिसरात होतेय वारंवार वाहतूक कोंडी


जत,(प्रतिनिधी)-
जत-उमदी या राज्यमार्गावर असलेल्या माडग्याळ (ता. जत) येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी फोडण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. त्यामुळे वाहनधारकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.
माडग्याळ येथे ही वाहतूक कोंडी सततची डोकेदुखी झाली आहे. दर शुक्रवारी माडग्याळ येथे भाजीपाला आणि जनावरांचा मोठा बाजार भरतो. या आठवडा बाजारदिवशी होणार्या वाहतूक कोंडीने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दिवसंदिवस वाढणारे अतिक्रमण याला कारणीभूत असून ग्रामपंचायत आणि प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे. नेहमी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे,पण पोलिस नेहमी गायबच असतात. माडग्याळ (ता.जत) येते शुक्रवारी आठवडी भाजीपाला आणि जनावरांचा बाजार भरतो. गेल्या शुक्रवारी सुमारे दीड किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले होते. दुचाकी विस्कळीतपणे लावल्या होत्या. त्यातच मध्येच दुचाकी घुसत असल्याने मोठ्या वाहनांना बसस्थानकाचे ठिकाण पार करायला सुमारे दोन तास प्रतीक्षा करावी लागली.अर्थात हे इथले नेहमीचे चित्र आहे. वाहतूक हाताळायला कोणतीच पोलीस अथवा इथली ग्रामपंचायतीची यंत्रणा उपस्थित नव्हती. वाहतूक कोंडी त्यातून लोकांना होणारा विलंब चीड आणणारा होता, त्यातच रस्त्याच्या एका बाजूला गटारीचे काम सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली होती.
 मध्यंतरी येथील अतिक्रमणे काढण्यात आली होती,पण पुन्हा ही अतिक्रमणे झाली आहेत. हा जत-उमदी- चडचणला जायला हा एकच राज्य मार्ग आहे. या मार्गावरून सोलापूर, मंगळवेढा, चडचण वाहने जातात.त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. मोटारसायकली कशाही रस्त्यावर अडव्या-तिडव्या लावणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. बाजाराच्यादिवशी पोलिस दुसर्याच जुळणीला लागत असल्याने या बाजारातल्या कोंडीकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय या वाहतूक कोंडीकडे लोकप्रतिनिधीपासून प्रशासनापर्यंत सगळ्यांचीच उदासीनता संताप आणणारी आहे.
(माडग्याळ येथे गटारीचे काम आणि दुचाकी वाहने अस्ताव्यस्त रस्त्यावर लावल्याने सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.)

Friday, May 17, 2019

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर


जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 16 मे 2019 रोजी दुपारी 3 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आला आहे.

माडग्याळ कृषी मंडल कार्यालयाचा भोंगळ कारभार


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील माडग्याळ येथील कृषी कार्यालय हे सतत बंदच असते. मंडलाधिकारी हुवाळे हे फिरकतच नसल्याने इतर कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांचेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे मात्र शेतकर्यांची अडचण होत आहे.

दुष्काळी परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्री व उद्योगमंत्री यांनी नुसत्याच भेटी दिल्या उपाययोजना कोणत्या झाल्या नाहीत; तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही, मजुरांच्या हाताला काम नाही यामुळे म ाणसांसह जनावरांची होरपळ होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने अद्यापही अपेक्षित प्रमाणात उपाययोजना झाल्या नाहीत. आणखी एक महिना तरी जत तालुक्यातील देशांत दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. शंभरच्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे चारा टंचाई निर्माण झाली असून आता कुठेतरी एखादी दुसरी चारा छावणी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांची होरपळ होत आहे.

जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना मिळणार मानधन


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषद व समाज कल्याण यांच्यावतीने या वर्षी 60 कलावंतांची मानधनासाठी निवड करण्यात आली आहे. 9 तालुक्यातुन 60 जणांची निवड झाली आहे. ही योजना सन 1954-55 पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये वृद्ध कलावंत, साहित्यिक यांनी मोलाची भर घातली आहे अशा व्यक्तीचा समावेश शासकीय कलाकार मानधनासाठी केला जातो.

23 मेच्या निकालाची आता एकच उत्सुकता


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणुकीत मोजणीची तारीख अवघ्या आठवड्यावर आली असताना सांगली लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सार्वजनिक ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. गावाच्या पारावर, पानटपरीवर, हॉटेल व बीअरबार, सार्वजनिक ठिकाणी; तसेच बस थांब्यावर लोकसभेच्या निकालाबाबत चर्चा ऐकावयास मिळत आहे. आता लोकांना निकलाची उत्सुकता लागून राहिली आहे.

धान्याची उचल न करणार्‍या कुटुंबांचे रेशनकार्ड होणार रद्द


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. हाताला काम नाही, गावात पाणी नाही अशी विदारक परिस्थिती असताना अनेक कुटुंबात कुटुंबे शहराकडे स्थलांतरित होत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली आहे. शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य उचल करणे अशक्य होऊ लागले आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीने काढला आहे यामध्ये ज्या शिधापत्रिकेवर सतत तीन महिने धान्याचा उचल झाला नाही. अशा शिधापत्रिका प्रथम निलंबित व नंतर रद्द करण्याचा घाट घातला आहे.

नव्या शासन परिपत्रकावरून शिक्षकांच्या वेतनास विलंब नको


 शिक्षक संघाची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांची एप्रिलची वेतन बिले ही सर्व तालुक्यांकडून सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 या तारखेवर वेतन निश्चिती करून दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहेत. परंतु 14 मे रोजी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती संदर्भात शासनाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाले आहे. या स्पष्टीकरणाचा विचार करता काही शिक्षकांच्या पगारात सध्याच्या बिलानुसार तफावत निर्माण होते. ही तफावत दूर करून पुन्हा नव्याने पगार बिले तयार करून सर्व तालुक्यांकडुन जिल्हा परिषदेला प्राप्त होण्यासाठी पुन्हा विलंब होऊ शकतो.त्यामुळे पगार अगोदर करावा, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रवादीचा सोमवारी जनावरांसह मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्नांवर सोमवार, दि. 20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील व सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.

दरीबडची चारा छावणीत 449 जनावरे दाखल


जत,(प्रतिनिधी)-
 दरीबडची (ता जत) येथे जोतिर्लिंग दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वत्तीने चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. या चारा छावणीत 449 जनावरे दाखल झाले आहेत. चारा छावणीचे उदघाटन संख येथील अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
 पूर्व भागातील दरीबडची परिसरात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गैरसोय झालेल्या शिक्षक बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे : अभिजित राऊत


जत,(प्रतिनिधी)-
 रँडम राऊंडमध्ये गैरसोयीच्या ठिकाणी बदली झालेल्या शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे सोयीनुसार होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्य नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी दिली.

मंजूर खेपेनुसार टँकरचे पाणी नाहीच


  जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात 92 गावांना आणि 671 वाड्यावस्त्यांना 109 टँकरच्या खेपेद्वारा 255 खेपा मंजूर आहेत.मात्र प्रत्यक्षात 223 खेपाच होत असून त्यामुळे पाणी टंचाई कायम असून वादावादीचे प्रकार घडत आहेत. जत तालुक्यात पाण्याचे स्त्रोत नसल्याने टँकरद्वारा अपुरा पाणी पुरवठा होत आहे. जत तालुक्यातील तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून घेण्याची मागणी होत आहे.

Thursday, May 16, 2019

खरीपपूर्व मशागतीला जत तालुक्यात वेग


जत,(प्रतिनिधी)-
 पावसाळ्याला एक महिन्याचा अवकाश असला तरी देखील जत तालुक्यातील शेतकरी आता खरिपाचे नियोजन करीत असून खरीप पूर्वमशागतीला आता सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टर व बैलजोडीने खरीप पूर्वमशागतीची कामे सुरू झाली आहेत.

खतांच्या दरवाढीमुळे बळीराजा पुन्हा संकटात


जत,(प्रतिनिधी)-
 निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असला तरी दरवर्षी तो मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागत असतो. यावर्षी तरी चांगला पाऊस पडून उत्पादनात वाढ होईल, या आशेने शेतकरी यंदादेखील खरीप हंगामाच्या तयारीसाठी जमिनी कसण्यासाठी तयार झाला आहे.

पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा


जूनमध्ये विस्तार; सांगलीला संधी मिळणार का?
जत,(प्रतिनिधी)-
होणार... होणार... मंत्रिमंडळाचा विस्तार होणार... असे म्हणत साडेचार वर्षे कशी गेली कुणालाच कळले नाही. मात्र मंत्रीपदाची आस लागून राहिलेल्या लोकप्रतिनिधींची निराशा झाली. आता त्यांनी आशा सोडली असतानाच पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होऊ लागली असून जूनमध्ये या विस्ताराला मुहूर्त लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या विस्तारात तरी सांगली जिल्ह्याला स्थान मिळणार का, असा सवाल अपसूकच आल्याशिवाय राहत नाही.

जत तहसील कार्यालयावर 20 रोजी शेतकर्‍यांचा जनावरांसह मोर्चा

लक्ष्मण जखगोंड यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. 1972 पासून या तालुक्यात दुष्काळाची परंपरा कायम आहे. चारा डेपो, पाण्याचे टँकर तालुक्यात वेळेवर मिळत नाहीत. जत तालुक्याच्या गावागावांमध्ये वाडी-वस्तीवर पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. जत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये चारा छावणी सुरू करावी आदी मागण्यांसह सोमवार, दि. 20 रोजी सकाळी अकरा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जत तहसील कार्यालयावर शेळ्या-मेंढ्या व जनावरांसह मोर्चा काढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण जखगोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सागर चव्हाण


जत,(प्रतिनिधी)-
 डफळापूर (ता. जत) येथील सागर चव्हाण यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश देशमुख यांनी दिले आहे. बळीराजा शेतकरी संघटना ही शेतकरी, कष्टकर्यांच्या समस्या सोडविणे, शेतकर्यांना दिलासा देणे, कष्टकर्यांच्या सर्वसामान्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत आहे.

Wednesday, May 15, 2019

विश्वबंधुत्व निर्माण करण्यात बाबा हरदेव सिंह यांचा मोलाचा वाटा - अशोक आहुजा

जत,(प्रतिनिधी)-
ज्यावेळी पृथ्वीवर धर्माच्या नावाखाली अनेक समाज विघाटक घटना घडत आहेत.माणूसच माणसापासुन दुर जाऊ लागला आहे.मानवाचे इतर मानवाबरोबर असलेले प्रेम कमी होत चालले आहे माणूस जातीपातीच्या भिंतीमध्ये आडकुण पडलेला आहे यातुन, त्यामुळे त्याला जिवनामध्ये सुख मिळत नाही यातुन मानवाला मुक्त करण्यासाठी मानवातील माणूसकी जागी करून विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे  कार्य सदगुरु बाबा हरदेव सिंह  यांनी केले, असे प्रतीपादन संत निरंकारी मंडळाचे अशोक आहुजा (प्रचारक कोल्हापुर) यांनी केले.

Tuesday, May 14, 2019

डफळापूर येथे चारा छावणी व पाण्याच्या टँकरसाठी रास्ता रोको

 (डफळापूर येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर नायब तहसीलदार श्री. माळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.)
जत,(प्रतिनिधी)-
      पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या डफळापूर गावात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर या मूळे पाण्याचा धंदा करणाऱ्याचे फावले आहे. पाण्याचे टँकर सुरू करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी काल (मंगळवारी) डफळापूर बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Monday, May 13, 2019

पश्‍चिम महाराष्ट्रात बायोमेट्रिक अनिवार्य करा

  जत,(प्रतिनिधी)-
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी अकरावी-बारावीला नाममात्र प्रवेश घेतात आणि लातूर परिसरातील खासगी क्लासला हजेरी लावतात.यामुळे या भागातील महाविद्यालये ओस पडत असल्याचे चित्र आहे. प्राध्यापकांनाही फार काम नसल्याने या भागातील शैक्षणिक दर्जा खालावला आहे. या भागातील महाविद्यालयांची पाहणी करावी व बायोमेट्रिक विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे

दुष्काळी भागातील केशरी कार्डधारकांना मोफत धान्य द्या


 सुशिला होनमोरे यांची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत तत्काळ चारा छावणी तसेच दुष्काळी भागातील केशरी कार्डधारकांना मोफत धान्यपुरवठा करावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशिला होनमोरे यांनी केली आहे.

पत्नीच्या घरी नांदणार्‍या शिक्षकासह चौघांची निर्दोष मुक्तता


  जत,(प्रतिनिधी)-
 मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला कर्मचारी असलेल्या पत्नीचा छळ केला व तिच्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ टाकल्याच्या आरोपातून शिक्षक पतीसह चौघांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.के. शेख यांनी दिला.

‘वंचित’ला एकही जागा मिळणार नाही


केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे मत
 जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रात सत्तेत केवळ सेना-भाजप अथवा काँग्रेस-राष्ट्रवादीच चालू शकते. इथे तिसरी आघाडी चालत नाही याचा अनुभव आपण घेतला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

Sunday, May 12, 2019

मार्गावरील मैलाच्या दगडाचे अस्तित्व संपुष्टात


जत,(प्रतिनिधी) -
खेडेगावातील रस्त्यापासून ते राष्ट्रीय महामार्गावर दिमाखात उभ्या असलेल्या मैलाच्या दगडाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. काळाबरोबर अनेक बदल झाले, त्यातील हा एक मोठा बदल म्हणावा लागेल. मैलाचा दगड म्हणजे एक गावाची ओळख होती. मैलाच्या दगडाच्या ठिकाणाला तसेच नाव पडले आहे. आज ते दगड अस्तित्वात नसले तरी त्या नावावरून अनेक ठिकाणांना आजही ओळखले जाते. आज मैलाच्या दगडाची जागा किलोमीटरने घेतली आहे.

गाडीचे हेडलाईट देतात अपघाताला निमंत्रण


अप्पर-डिप्पर प्रणालीचा वापर बंधनकारक असावा
जत,(प्रतिनिधी)-
 रात्र होताच गाड्यांच्या लाईटचा चकचकाट डोळ्यांना भिडू लागतो. डोळ्यावर पडणार्या या तीव्र प्रकाशामुळे अपघात होण्याचे प्रमाण अनेक पटीने वाढू लागले आहे. गाडी चालविताना अचानक डोळ्यावर तीव्र प्रकाश पडल्यामुळे डोळे दीपून जातात. त्यामुळे काही क्षण चालकाला काहीही सुचत नाही. नेमके याच स्थितीमुळे अपघात होतात.

दंड फक्त नागरिकांनाच का?


रस्त्यांवरील खड्डे, गतिरोधक, अतिक्रमणासाठी प्रशासनाला दंड का नाही?
जत,(प्रतिनिधी)-
वाहन चालविताना आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. जसे हेल्मेट घालणे, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क न करणे, पीयूसी, नंबर प्लेट आपल्या पसंतीची न लावता नियमानुसार असणारी लावणे, ट्रीपल सीट गाडी न चालविणे, चारचाकी चालविताना सीट बेल्ट बांधणे, अशा अनेक गोष्टींची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणाला गाडी चालविताना ठेवावी लागते. काही चूक झाल्यास लगेच दंडही भरावा लागतो. मात्र रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण,स्पीड ब्रेकर यामुळे होणारे नागरिकांचे नुकसान याला कोण जबाबदार? याबाबतीत कोणाला दंड मागायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गुड्डापूरमध्ये पुण्यकर्म चारादान केंद्राची सुरूवात


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात तीव्र चार्याची टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व पाहून येथील दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट मार्फत गुड्डापूर येथे या पुण्यकर्म चारादान केंद्राची सुरवात करून जनावरांना चार्याचे वितरण करण्यात आले. चारा वाटपाचा शुभारंभ कोल्हापूरचे धर्मादाय सहआयुक्त शशीकांत हेरलेकर, सांगलीच्या धर्मादाय उपआयुक्त सुवर्णा खंडेलवाल -जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

दरीबडची येथील अवैध धंदे बंद करा; ग्रामस्थांनी दिले निवेदन


जत,(प्रतिनिधी)-
दरीबडची (ता. जत) येथे गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले असून याचा ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असून हे बंद करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जत पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर आनंद पाटील, हरिबा कांबळे, सुभाष माने, कृष्णा चव्हाण, जोतिबा जाधव, संतोष कांबळे, सुरेश घागरे, तानाजी गेजगे यांच्या सह्या आहेत.

सामान्य उद्योजगता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम लाभार्थींसाठी सामान्य उद्योजकता विकास या प्रशिक्षण सत्राचा निरोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे के.व्ही.आय.सी.चे असिस्टंट डायरेक्टर पी. एस. वेद यांनी प्रशिक्षणर्थीशी संवाद साधताना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

जत पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ


संबंधितांवर कारवाईची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. गेली वर्षभर जत तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. खरिपाचे दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेल्या आहेत. त्यात 85 गावे व 585 वाड्या-वस्त्यांना 103 टँकरद्वारे पाणी सुरू आहे. या टँकरची संपूर्ण जबाबदारी पंचायत समितीमधील कार्यालय असलेले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे. मात्र या कार्यालयातील कर्मचारी वारंवार बेपत्ता असतात. याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व जिल्हा परिषदेमध्ये तक्रारी केल्या आहेत. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक या कर्मचार्यांना नाही. या विभागात अधिकार्यांपासून शिपायापर्यंत कोणीच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. शिपायांसह सर्वच कर्मचारी बेपत्ता होते. याची वरिष्ठांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी तालुक्यातील अनेक पदाधिकार्यांनी केली आहे.

जनता दुष्काळात; नेते सुकाळात


लोकप्रतिनिधी दुष्काळाबाबत आक्रमक नाहीत
जत,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्ह्याला कोणी वाली राहिलेले दिसत नाही. पालकमंत्र्यांनी केवळ एक दिवस मोजक्या ठिकाणी भेटी देऊन दौर्याचा फार्स केला. प्रशासन कायद्याला धरून व नियमांवर बोट ठेऊन बसल्याचे चित्र आहे. अशावेळी जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधींनी याबाबत आक्रमक होत शासनाच्या कामास गती न देता मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या भेटी झाल्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील भेटी दिल्या, आढावा बैठका घेतल्या. प्रत्यक्षात फक्त जुजबी कारवाई होताना दिसत आहे.

शिक्षकांचे पद कार्यात्मक घेऊन श्रेणीवाढ द्या


 जुनी हक्क पेन्शन संघटनेची मागणी; वित्त मंत्री व शिक्षण मंत्र्यांची घेणार भेट
जत,(प्रतिनिधी)-
ज्या शिक्षकांना 1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झाली आहे, अशा शिक्षकांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगामध्ये होणारी वाढ ही इतरांच्या तुलनेने कमी होत असून ही तफावत दूर करण्यासाठी शिक्षकाचे पद कार्यात्मकमध्ये घेऊन श्रेणी वाढ होताना एक वेतनवाढ द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे शिष्टमंडळ राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री व शिक्षण मंत्री यांची भेट घेणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.

दुष्काळाच्या भयाण अवस्थेने मेंढपाळांची ससेहोलपट


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून गेले वर्षभर पावसाचा पत्ता नाही. दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेले. तालुक्यातील 99 टक्के तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. कूपनलिकेला, विहिरीला पाणी नाही. त्यामुळे तालुक्यातल्या मेंढपाळ आणि त्यांच्या मेंढ्या यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला राहिला आहे. त्यांची भटकंती अद्याप संपलेली नाही.

Saturday, May 11, 2019

टँकरच्या तीन खेपा,मग पाणी जाते कुठे?

ग्रामस्थांमध्ये संताप; ग्रामपंचायतीसमोर आंदोलन
जत,(प्रतिनिधी)-
दरिकोणूर ( ता.जत) येथील गावकऱयांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत असून वैतागून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आज घागर मोर्चा काढून आंदोलन केले. गावाला पाण्याच्या टँकरने तीन खेपा केल्या जातात,असे सांगितले जाते तर मग पाणी कुठे जाते, असा सवाल संतप्त ग्रामस्थ करत आहेत.पाण्याच्या टँकरची चौकशी करावी,अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

महाराष्ट्रातील ५ हजार गावे ‘नॉट रिचेबल

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील 5 हजारांवर गावांमध्ये अद्याप मोबाईल सेवा पोहोचली नसल्याची धक्कादायक माहिती दूरसंचार विभागानेच केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोकणातील दुर्गम भाग आणि नक्षलग्रस्त भागातील गावांचा यामध्ये समावेश आहे.

जलसंधारणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील  दुष्काळी भागाला नवसंजीवनी देण्यासाठी  जलसंधारणाची कामे सुरू आहेत. सदरची कामे निकृष्ठ पध्दतीने सुरू असून या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.

शासनाने दुष्काळग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी:प्रकाश जमदाडे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात १९७२  पेक्षाही भयावह दुष्काळ पडला असून नागरिक  हवालदिल झाले आहेत. हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा नाही अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. शासनाने  दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.

Friday, May 10, 2019

चारा छावण्या ग्रामपंचायतींना चालवायला द्या: बसवराज पाटील

जत,(प्रतिनिधी)-
 सध्या जत तालुक्यात 1972 सालच्या दुष्काळापेक्षा भयंकर दुष्काळ पडला असून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. शासनाने चारा छावण्या संस्थांना चालवायला देण्यापेक्षा ग्रामपंचायतींना चालवायला द्याव्यात अशी मागणी  एकुंडीचे सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

आठ वाहन चालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई

जत,(प्रतिनिधी)-
 नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यासाठी ई – चलन प्रणाली अस्तित्वात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत  मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण सात वाहनावर ई – चलनाद्वारे दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालवीत असणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.

दुष्काळ योजना न राबविल्यास 14 रोजी रास्ता रोको

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डफळापूरला पाच रुपयाला एक घागर पाण्याची घागर मिळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा  टँकर व चारा छावण्या सुरु करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा 14 मे रोजी डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड हणमंत दत्तात्रय कोळी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सातव्या वेतनानुसार पगार लवकरच:शिक्षणाधिकारी सौ. वाघमोडे

जत,(प्रतिनिधी)-
    सातव्या वेतनानुसार तालुका स्तरावरून बिले आल्यास तातडीने पगार दिला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश घुले आणि  प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. निशादेवी वाघमोडे- बंडगर यांनी दिली. या शिवाय अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.