सोनू के टिटू की स्वीटीमुळे हिट झालेल्या कार्तिक आर्यन आणि चंकी पांडेची
मुलगी अनन्या पांडे यांच्यात हल्ली खूप जवळीक वाढायला लागली असल्याचे दिसते आहे.
या दोघांना अनेक वेळेस एकत्र बघितले गेले आहे. अलीकडेच एका रेस्टॉरंटमधून हे दोघे एकत्र बाहेर पडताना त्यांचे फोटो व्हायरल
झाले आहेत. त्यामुळे या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात
केली की काय, अशी शंका आहे. अनन्याने अद्याप
बॉलिवूड करिअरला सुरुवात केली नाही. ‘स्टुडंट ऑफ द इयर
2’मधून ती पदार्पण करणार आहे. अलीकडेच
‘कॉफी विथ करण’मध्ये सारा पप्पा सैफ अली खानबरोबर
आली होती. तेव्हा करणच्या प्रश्नाला उत्तर
देताना तिने कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल, असे सांगितले
होते. कार्तिक आर्यननेही त्यावर आपला आनंद व्यक्त केला होता.
आता साराच्या पाठोपाठ अनन्या पांडेच्या फेव्हरेट लिस्टमध्ये तो समाविष्ट
झाला की काय असे वाटायला लागले आहे. अनन्या पांडेबरोबर कार्तिकचे
अफेअर सुरू असल्याच्या बातम्या जशा जशा पसरायला लागल्या, तसे
कार्तिकने लगेच त्यावर खुलासाही देऊन टाकला आहे. अनन्या आणि आपण
केवळ डिनरसाठी एकत्र गेलो होतो. आम्ही चांगले मित्र आहोत.
नेहमीच कुठे तरी बाहेर जात असतो. त्यानुसार आम्ही
जेवायला बाहेर गेलो होतो. त्यामध्ये काहीही वेगळे नाही,
असे स्पष्टीकरण त्याने दिले.
No comments:
Post a Comment