Sunday, June 30, 2019

यू ट्यूबवर व्हिडीओ पाहून तिचा गेला जीव


मोबाईलवरून चांगल्या गोष्टी शिकता येतात. ज्ञानात प्रचंड भर पडते. मात्र, चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टी पाहण्याकडेच जास्त कल असतो. मनावर वाईट परिणाम होतील, अशाच व्हिडीओला पसंती दिली जात असल्याने तरुणांसोबत अल्पवयीनांमध्ये नकारात्मकतेचा भाव वाढत चालला आहे. मानसिकता वाईट होत असल्याने चोरी, लुटमार, दरोडा, खून, बलात्कार आणि आत्महत्यासारखे पाऊल उचलले जात आहेत. अशीच काहीशी घटना शनिवारी दुपारच्या सुमारास तहसील ठाण्याच्या हद्दीतील हंसापुरी येथे उघडकीस आली. दोन मुलींनी गळफास घेतल्याचा व्हिडीओ यू ्ट्यूबवर पाहिल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक करीत असताना एका १२ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. शिखा विनोद राठोड (१२) असे मृत मुलीचे नाव आहे. जिवाचा थरकाप उडविणार्‍या या घटनेमुळे पालकांना विचार करण्यास बाध्य केले आहे.

भारतात घटतेय पारंपरिक विवाहपद्धती!

भारतात, मुख्यत्वे शहरी भागात पारंपरिक विवाहांचे प्रमाण कमी होत आहेत. त्यांची जागा प्रेमाला संमती मिळून होणारे विवाह घेत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका महिलाविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वैवाहिक हिंसा कमी होत असून, अर्थ किंवा कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांत महिलांना महत्त्व देण्यात येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

प्रेमाने बोलल्याने जगात शांतता निर्माण होईल-अविनाश जाधव

जत,(प्रतिनिधी)-
मानवी  जीवन मिळाले आहे ते सत्याने जगण्यासाठी, प्रेमाने बोलण्यासाठी. पण जगात  हिंसाचार,व्याभीचार, धर्म अंधपणा आणि त्याच बरोबर नाना प्रकारच्या अनेक समाज विघातक घटना घडत आहे. एकमेकांमध्ये आदरभाव नसल्यानं माणूस माणसापासून दूर चालला आहे. त्यामुळे जगामध्ये सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन  संत निरंकारी मिशनचे युवा प्रचारक अविनाश जाधव (वाई) यांनी जत येथे बोलताना केले.

Saturday, June 29, 2019

देशात पाच वर्षांत हत्तींमुळे दोन हजार बळी

मागील पाच वर्षांत हत्तींमुळे देशभरात २३९८ जणांचा बळी गेला असून वाघांमुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी लोकसभेत दिली.गेल्या पाच वर्षांत हत्ती आणि वाघांमुळे किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न केरळचे खासदार अँटो अँटेनिओ यांनी विचारला होता. या प्रश्नाला केंद्रीय पर्यावरण राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी लेखी उत्तर दिले यात ही माहिती देण्यात आली आहे.

बांधकाममंत्री पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावरील खड्डयांभोवती रांगोळी घालणार : विक्रम ढोणे

जत,(प्रतिनिधी)-
राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जतमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी जत शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डयांभोवती रांगोळी घालून गांधीगिरी मार्गाने त्यांचे स्वागत करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी तहसीलदारांना  दिले आहे.

निरंकारी मंडळाच्या शिबिरात 112 जणांचे रक्तदान

जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी चँरिटेबल फौडेशनच्या जत शाखेच्या वतीने साई प्रकाश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 112  रक्तदात्यानी सहभाग घेतला.
      या शिबिराचे उद्घाटन सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे व पंचायत समिती जतच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Friday, June 28, 2019

शनिवार, रविवारी बायको जाणार कामावर; नवरा सांभाळणार घर

येणाऱ्या काळात काय घडेल सांगता येत नाही. उद्या कदाचित बायको ऑफिस सांभाळेल आणि नवरा घर. त्याची सुरुवात आताच दिसत आहे ते एका घटनेवरून.  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक वेगळेच प्रकरण जिल्हा विधी प्राधिकरणासमोर आले आहे. घरातील कामाच्या वाटणीवरून होणार्‍या भांडणावर तोडगा काढण्यासाठी पती-पत्नींनी परस्परांमध्ये करार केला. त्या कराराला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी ते प्राधिकरणाकडे आले होते. १00 रुपयांच्या स्टँप पेपरवर त्यांनी हा करार केला आहे. त्यात शनिवार, रविवारी पती घरातील सर्व काम करेल आणि मुलांना सांभाळेल. पत्नी या दोन दिवसांत कामावर जाईल आणि बाहेरची इतर कामे करेल, असे करारात नमूद करण्यात आले आहे.

अकार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱयांना घरचा रस्ता दाखवणार?

जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारमध्ये प्रशासन कार्यक्षमरित्या चालवण्यासाठी तंदुरुस्त आणि पूर्ण क्षमतेने कर्मचारी असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात कमी वयातच विविध व्याधी जडू लागल्या आहेत, त्यातच कामाच्या ताणामुळे अशा आजारात आणखी भर पडत आहे. अशा लोकांकडून चांगल्या आणि कार्यक्षम कामाची अपेक्षा करणं अवघड आहे. त्यामुळे शासन अशा लोकांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तवीक , गेल्या पंधरा वर्षात नोकर भरती नसल्याने अतिरिक्त कामाचे ओझे वाढत आहे. खरे तर नोकर भरती आवश्यक आहे,मात्र सरकार अकार्यक्षमच्या नावाखाली आणखी नोकर वर्ग कमी करण्याचा विचार करत आहे.

विश्वासघात म्हणजे आत्मघात

गुरू हरगोविंदसिंहजी यांच्या अत्यंत निकटवर्तिवांपैकी एक म्हणजे पाइंदे खॉ. गुरुंना त्याच्यावर स्वतः:पेक्षा जास्त विश्वास होता. त्याचे कतृत्वं, त्याचे शौर्य या सा-यांवर गुरुजींचा अत्यंत विश्वास होता. परंतु पाइंदे खाँने याचा वेगळा अर्थ काढला आणि तो शिष्यांमध्ये गुरुजींचीच बदनामी करू लागला. शिष्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो कोणाचेच ऐकत नव्हता. त्यांना कळतच नव्हते, की गुरुजींना अचानक काय झाले, पाइंदे खो गुरुजींच्या इतक्या जवळचा आणि तोच त्यांची बदनामी करतोय?

स्वातंत्र्यसैनिक बुकटे यांच्या स्मारकाचे 30 रोजी लोकार्पण


जत,(प्रतिनिधी)-
कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील स्वातंत्र्य सेनानी कै. बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण व स्म्रुती दिनानिमित्त स्मारक उभारण्यात आले असून या स्मारकाचे लोकार्पण रविवार दि.30 जून रोजी होणार असल्याची माहिती बुकटे परिवार यांच्यावतीने देण्यात आली आहे.

उमदीत पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जत,(प्रतिनिधी)-
उमदी (ता. जत) येथील उमदी ग्रामीण बिगरशेती सहकारी या पतसंस्थेकडून महात्मा विद्यामंदिर व ज्यु. कॉलेजच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
महात्मा विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज उमदी येथे उमदी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित उमदी यांच्यावतीने वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पाचवी ते दहावी वर्गात सर्वप्रथम येणा-या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी बारा वह्या वाटप करण्यात आल्या. महात्मा विद्यामंदिर येथे पाचवी ते दहावी असे एकूण २५ वर्ग आहेत. प्रत्येक वर्गातील तीन प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक व तीसरा क्रमांक घेणा-या प्रत्येकी एका विद्याथ्र्याला १२ वह्या वाटप केल्या.

Thursday, June 27, 2019

सुपरफास्ट विराट


विराट कोहली म्हणजे क्रिकेट विश्वातलं अजब रसायन आहे. त्याने आजच्या क्रिकेट वेड्यांना सचिन, ब्रायन लारा यांचे खेळ विस्मृतीत न्यायला भाग पाडले. आक्रमक, आक्रस्ताळेपणा असलेल्या विराटच्या अंगी मात्र कमालीची चपळता आहे. क्रिकेटला प्रथम प्राधान्य देणारा विराट आपल्या प्रेमालाही तितकंच महत्त्व देत आपल्या चाहत्यांच्याही इच्छा पूर्ण करतो. आताचा त्याचा खेळ पाहिला तर अजून बरेच विक्रम त्याच्या नावावर होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

म्हैसाळ पाणीप्रश्नावर आ. जगताप यांचा विधानसभेत आवाज

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील म्हैशाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या 48 गावांचा समावेश तत्काळ म्हैशाळ योजनेत करावा, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी विधानसभेत  केली. आमदार जगताप यांनी विधानसभेत म्हैसाळच्या पाणी प्रश्नावर जोरदार आवाज उठविला. दुष्काळी भाग असल्याने प्राधान्य  देण्याची गरज असल्याचे सांगितले.

भारतात वर्षाला 90 हजार कोटींची अन्नाची नासाडी

'वर्ल्ड सस्टेनेबल गॅस्ट्रोनोमी डे' म्हणजे जगभरात वाया जाणारे अन्न वाचवण्याचा दिवस. 18 जूनला हा दिवस पाळला जातो. या दिवशी शेतकरी, गोदाम, फुड प्रोसेसिंग करणारे युनिट आणि विक्रेते यापैकी कोणाकडूनही अन्न वाया जाऊ नये, यावर लक्ष ठेवले जाते. संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी
संघटनेनुसार संपूर्ण जगभरात दरवर्षी तब्बल 1.30 लाख कोटी किलो खाद्यपदार्थ वाया जातात. भारतात वर्षाला 6,700 कोटी किलो खाद्यपदार्थ वाया जातात. किमतीत हे अन्नपदार्थ 90 हजार कोटींचे आहेत.

Wednesday, June 26, 2019

तरुणींचे पलायन, पालकांसाठी डोकेदुखी

जत,(प्रतिनिधी)-
मोबाईल, व्हॉटस अप, फेसबुक यांच्या अति वापराचा परिणाम समाजात प्रकर्षाने दिसू लागला असून तरुण मुली याला अधिक बळी पडताना दिसत आहेत. प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या मुली आता बंडखोर होत असून ज्यांनी जन्म दिला, वाढवलं, शिकवलं त्यांच्यावरच डारडूर करून या मुली घरातून पलायन करत आहेत. समाजातील इज्जत घालवायला नको म्हणून मुलीचे पालक फार दोन पावले मागे सरत आहेत. सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काही महिन्यात पन्नासहून अधिक घटना घडल्या आहेत. पोलीस दप्तरी नोंद नसलेली आकडेवारी मोठी असल्याचे सांगण्यात येते.

कर्नाटक सीमेवरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली असून वर्षानुवर्षे हे रस्ते सुधारलेले नाहीत. कर्नाटकने मात्र सीमेपर्यंत रस्ते सुधारले आहेत.राज्यातील रस्ते कधी सुधारणार असा सवाल करत राज्याचे ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडे रस्ते सुधारणेबाबतच्या मागणीचे निवेदन जत तालुका विकास मंचच्यावतीने  देण्यात आले आहे.

जत मध्ये २९ रोजी रक्तदान शिबिर व सत्संग कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी चँरिटेबल फौडेशन  (दिल्ली)  शाखा जतच्यावतीने साई प्रकाश मंगल जत येथील  कार्यालय येथे सकाळी 10 ते 3 या वेळेमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी विद्युतनगर  येथे सत्संग मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पापा कुंभार यांनी दिली.

पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

जत,( प्रतिनिधी )-
सोन्याळ (ता. जत) येथे सोमणा तमणा पुजारी (वय ५०) यांचा पत्नीच्या मारहाणीत संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी घडली. सोमणा पुजारी हा दररोज दारु पिऊन घरी येवून पत्नीशी भांडत होता. आज सकाळी १० च्या सुमारास दारु पिऊन घरी आला असता पत्नी नागवा सोमणा पुजारी यांच्या दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. वादावादी सुरु असताना पत्नी नागवा हिने शेजारी असलेली काठी घेवून पती सोमणा यास मारले व ती तेथून शेजारील आपल्याच भावकीतील घरी निघून गेली.

जबाबदारी स्वीकारा,पुढे चला

'ऍपल' कंपनीचे सीईओ टीम कुक सांगतात आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी. अतिशय प्रेरणादायी अशा या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगाच्या आहेत. तर जाणून घेऊ या, नऊ महत्त्वाच्या गोष्टी!

डिजिटल शिक्षणात हरवतेय सुलेखनाची कला !


जत,(प्रतिनिधी)-
सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला ज्याला प्राप्त असते, त्याचे सर्वजण कौतुक करत असतात. या उलट ज्याचे हस्ताक्षर खराब असेल त्याची प्रतारणाही जास्त प्रमाणात केली जाते. आताच्या काळात सुंदर हस्ताक्षराची कला ही नाहीशी होऊ लागली आहे. खासगी व प्राथमिक शाळांमधून देण्यात येणार्या डिजीटल शिक्षणामुळे सुलेखनाचे प्रमाण कमी झाले आहे.

वाघाच्या मावशीवर संक्रांत!

जत,(प्रतिनिधी)-
वाघाची मावशी म्हणून संबोधल्या जाणार्या मांजरांची जत  तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात शिकार होत असून त्यामुळे मांजरांची संख्या कमी होऊ लागली आहे. परिणामी घराघरांत उंदीर,पाळी यांनी उच्छाद मांडला आहेशहराच्या आसपासच्या गावांत अनेक शिकारी हे रिक्षा व मोटारसायकलीवर कुत्रे व लोखंडी जाळीचा पिंजरा घेऊन फिरताना दिसून येतात. खेडेगावात पडक्या वाडे, घरांच्या आडवळणी जवळ लोखंडी पिंजरा लावला जातो. त्या पिंजर्यात बोंबिल अथवा उंदीर ठेवलेला असतो. मांजराचे बोंबिल हे आवडते खाद्य असल्याने वासाच्या आधारे ते पिंजर्यात अलगद अडकते. खेडे गावात दाटीवाटीच्या झाडा झुडपात कुत्र्यांच्या सहाय्याने मांजरांची शिकार केली जाते.

एकुंडी येथे नेत्र तपासणी शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी येथे ग्रामपंचायत व लायन्स नॕब नेत्र रूग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबीर पार पडले.

उमराणीत पावसासाठी गाढवाचे लग्न

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमराणी येथे पावसाने ओढ दिल्याने श्रद्धा म्हणून ग्रामस्थांनी गाढवाचे रीती रिवाजाने लग्न लावून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

Tuesday, June 25, 2019

भिमा नदीतून आरळी लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाद्वारा जतला पाणी देण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातून कृष्णा -कोयना या उपसा सिंचन असलेल्या  म्हैसाळ आणि टेंभू योजनांद्वारा जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भाग वगळता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढ्यातील काही भागांना पाणी देण्यात आले आहे. मात्र जत तालुक्यातील पूर्व भागातील गावे वंचित राहिली आहेत. या गावांना भीमा नदीतून आरळी पाणी उपसा सिंचन योजना राबवून पाणी देण्याची मागणी जत तालुक्यातून होत आहे.

एसटीत आठ हजार जागा भरणार: परिवहन मंत्री


सामाजिक बांधिलकीच्यादृष्टीने दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यातील ४४१६ तसेच कोकण प्रदेशातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यांत ३६0६ अशा एकूण ८0२२ चालक व वाहकांच्या रिक्त जागा राज्य परिवहन महामंडळामध्ये भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात आली असून भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

Monday, June 24, 2019

लिंगायत समाजाचा आम. जगतापांना पाठींबा- बसवराज पाटील

जत,(प्रतिनिधी)-
आमदार विलासराव जगताप यांनी राजकारणामध्ये महाराजांच काय काम असे विधान एका सभेत केले होते त्यावरून लिंगायत समाजाची बदनामी केली म्हणून अनेक वृत्तपत्रामधून व चैनल वरून बातम्या आले. परंतु आमदार जगताप हे महाराज व साधू यांच्याबद्दल बोलले आहेत त्यांनी लिंगायत समाजाबद्दल ब्र शब्द काढले नाहीत. असे विधान सरपंच परीषेदेचे जत तालुका अध्यक्ष व बसवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.   

जतला नवीन बसस्थानक मंजूर करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत येथे सध्या अस्तित्वात असलेले बसस्थानक लहान व जुने असून प्रवाशांच्या गैरसोयीचे आहे. त्यामुळे सोलनकार चौकाशेजारी असलेल्या महामंडळाच्या जागेत नव्याने अद्ययावत बसस्थानक मंजूर करून बांधावे, अशी आमदार विलासराव जगताप यांनी परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.

देशातील काळा पैसा ३४ लाख कोटींवर

१९८0 सालापासून २0१0 पयर्ंतच्या ३0 वर्षांच्या कालावधीत २४६.४८ अब्ज डॉलर (१७,२५,३00 कोटी रुपये) ते ४९0 अब्ज डॉलर (३४,३0,000 कोटी रुपये) एवढा काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन बड्या संस्थांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या अहवालात सदर माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील ५३ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला अविवाहित

राज्यातील ५३.५ टक्के पुरुष तर ४२.५ टक्के महिला अविवाहित असल्याचे आर्थिक सर्वेक्षण २0१८च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्यातील अविवाहित पुरुषांचे आणि महिलांचे प्रमाण कमी आहे. स्थलांतर, बेरोजगारी, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे अविवाहितांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पावसाळा आला... सर्पदंशापासून सावधानता बाळगा

जत,(प्रतिनिधी)-
पावसाळा आला की दोन प्रकारच्या दुर्घटना नेहमी घडत असतात. एक म्हणजे सर्पदंश आणि दुसरा म्हणजे विजेचा शॉक. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात सर्पदंशाच्या घटना वाढू लागल्या आहेत.  आरोग्य व कुटुंब खात्याकडीला आकडेवारीनुसार 2017 मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. 24437 सर्पदंशाच्या घटना घडल्या. यात सर्वाधिक 19012 घटना घडल्या आहेत.  वेळेत उपचार न मिळाल्याने माणूस दगावण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाळा आला की, सर्पदंशापासून सावधान राहणं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारनेही वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पावसाळा आला... विजेपासून स्वतः ला सांभाळा


जत,(प्रतिनिधी)-
पावसाळ्यात दोन प्रकारे विजेचा झटका आपल्याला मिळत असतो. एक आहे ती नैसर्गिक वीज. जी ढगांच्या संघर्षातून निर्माण होते. आणि दुसरी वीज आहे,ती विद्युत वाहिनीतून घरोघरी पोहचलेली महावितरणची वीज.  मानवनिर्मित वीज सोयीसुविधांसाठी असली तरी अनेकदा विद्युत वाहिनीतील उच्चदाब काळ बनून आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी अशा काही घटना या काही दिवसांत घडल्या आहेत. वीजमंडळाचा बेफिकिरपणा आणि नागरिकांना निष्काळजीपणा त्यांच्यासाठीच जीवघेणा ठरत आहे.

Sunday, June 23, 2019

जमिनीच्या वादातून सुसलाद येथे खून

जत,(प्रतिनिधी)-
सुसलाद (ता. जत) येथे  शेत जमिनीतील घराचे बांधकाम  अडविल्याच्या कारणावरून  भावकीतील पाचजणांनी कुर्‍हाड, काठ्या, धारधार हत्याराने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. बसंवतराय ऊर्फ निंगाप्पा बन्नी (वय 56) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रात्री उशिरा उमदी पोलिसात  पाचजणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुसलाद येथील सावंत वस्तीजवळ  बन्नी कुटुंबीयांची वस्ती आहे. येथील भावकीतीलच लोकांशी मृत निंगाप्पा यांचे शेतजमीन व घर बांधण्यावरून वाद
सुरू होता. हा वाद तहसील, प्रांत व पोलिस ठाण्यापर्यंत ही गेला होता. निंगाप्पा यांच्या जमिनीत संशयित बांधकाम करीत होते. याबाबत  शनिवारी बसवंतराय यांनी उमदी पोलिसात  तक्रार  दिली होती.

लाभार्थी आता कधीही धान्य उचलू शकणार

जत,(प्रतिनिधी)-
महिना सुरू होताच रेशन दुकानांमध्ये धान्यासाठी रांगा लावण्याच्या त्रासातून लाभार्थ्याची आता सुटका होणार आहे. कारण सरकारने महिनाभर लाभार्थ्यांना  धान्य देणे बंधनकारक केले आहे. धान्य नाकारणाच्या दुकानांवर थेट कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी हवे त्यादिवशी दुकानात जाऊन धान्यबउचल करू शकतील.

ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजना:मुख्यमंत्री

पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या महिन्यापयर्ंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल, अशी ग्वाही देतानाच म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील पुणे र्शमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या सन १९४0 ते २0१९ या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणार्‍या स्मृतिचित्रे या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

Saturday, June 22, 2019

बीडीओ वाघमळे चौकशी अहवाल सादर


जत,(प्रतिनिधी)-
 जत पंचायत समितीकडील कर्मचारी दीपक बर्गे याच्या आत्महत्येप्रकरणी बीडीओ अर्चना वाघमळे यांच्या चौकशीचा अहवाल चौकशी समितीने सीईओ अभिजित राऊत यांच्याकडे सादर करण्यात आला. अहवालाची माहीती घेऊन हा अहवाल दोन दिवसात शासनास पाठविला जाईल असे सीईओ श्री राऊत यांनी स्पष्ट केले.

आरोग्यवर्धिनी योजनेतून सुधारणार जतचे ‘आरोग्य’


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्याचा समावेश सरकारच्या आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यकमात समावेश करण्यात आला असून याचा सर्वाधिक फायदा जत तालुक्याला होणार असून जतमधील जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सेवा व शासनाच्या आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी व्यक्त केला. सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समाधान असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

बदली प्रकरणात अन्याय झालेल्या शिक्षकांना न्यायाची प्रतीक्षा


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हांअतर्गत बदली प्रक्रीयेत निर्माण झालेले प्रश्, शिक्षकांच्या तक्रारी यावर मुख्यकार्यकारी अधिकार्यांच्या अधिकारात समिती नेमून निकारण करण्यात येणार असून त्यानंतरही तक्रारी राहील्यास संबंधितांना आयुक्तांकडे जाण्याचा मार्ग मोकळा असेल. त्यामुळे तक्रार असणार्या शिक्षकांना आता सीईओंच्या निर्णयाकडे नजरा लागल्या आहेत.

राज्यातील सहकारी संस्था डबघाईला


जत,(प्रतिनिधी)-
 सहकारी संस्थांचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील सहकाराची चक्रे उलट्या दिशेने फिरू लागली आहेत. कधी एकेकाळी राज्याची ओळख साखर कारखान्याचे राज्य अशी होती, ती आता बंद पडलेल्या कारखान्याचे राज्य अशी होताना पाहावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

सोन्याळमध्ये मोफत चारा वाटप


जत,(प्रतिनिधी)-
 विश्व हिंदू परिषदेमार्फत सोन्याळ (ता. जत) येथे मोफत चारा वाटप करण्यात आला. यावेळी आरएसएस सांगली जिल्हाप्रमुख विलास चौथाई, राजाभाऊ पडसलगीकर, क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र आरळी, भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर


 जत,(प्रतिनिधी)-
राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सांगली जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सांगली येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हाध्यक्ष गणेश मडावी होते. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून विजयकुमार सोनवणे यांची, तर बाबासाहेब माने यांची सचिव म्हणून निवड झाली आहे.

जतमध्ये सरपंच परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव


जत,(प्रतिनिधी)-
 जत येथे अखिल भारतीय सरपंच परिषद आयोजित सरपंच, उपसरपंच, सदस्यांची तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

उकाडा सोसवेना; जतकरांना पावसाची प्रतीक्षा

जत,(प्रतिनिधी)-
शहरासह परिसरात सध्या वाढत्या तापमानाचा कहर असून उकाडा सोसवेनासा झाला आहे. दमदार पाऊस झाला तर दिलासा मिळेल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दमदार पाऊस झाल्यास पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी का लागत नाहीत?


सांगली जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. काही प्रश्न तीन चार वर्षांपासून लटकलेले आहेत. शिक्षकांच्या विविध संघटना आहेत. या संघटनांचे शिष्टमंडळ वारंवार संबंधित अधिकाऱ्याच्या भेटी घेऊन प्रलंबित प्रश्नांचे स्मरण करून देतात. संबंधित संघटना याचीच स्वतः बातमी बनवून प्रसार माध्यमांकडे देतात आणि बातमी छापून आणतात. काही दिवस जातात. प्रश्न तर जिथल्या तिथेच असतात. संघटना मात्र त्याचे भांडवल करून  प्रसिद्धी मिळवतात. आपल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करत राहतात. प्रसार माध्यमांमध्ये रोज एका संघटनेची एकादी तरी बातमी असतेच. बातम्या येतात,पण प्रश्न काही सुटत नाहीत.
काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मात्र शिक्षकांच्या प्रश्नाच्या नावाखाली शाळांना दांडी मारतात आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आवारात वावरत असतात. तिकडे विद्यार्थ्यांचे नुकसान होतेच,पण इकडे शिक्षकांची कामेही होत नाहीत. मग या संघटना आणि त्यांचे पदाधिकारी नेमके काय करतात. 

Friday, June 21, 2019

गत चार वर्षांत १२ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

शेतकरी आत्महत्या हा राज्यासमोर गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न बनलेला आहे. २0१५ ते २0१८ या चार वर्षात राज्यात १२ हजार २१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ६८८८ आत्महत्येची प्रकरणे मदतीच्या निकषात बसत असल्यामुळे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली असून या पात्र प्रकरणांपैकी ६ हजार ८४५ प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना १ लाखाची मदत देण्यात आली आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

देशी कलाकारांचे विदेशी जोडीदार

बॉलिवूडमधील प्रख्यात कलाकारांचे खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहे. त्यातून या कलाकारांचे प्रेमजीवन आणि विवाह या बद्दल कायमच सर्वच चाहत्यांना कुतूहल वाटत आले आहे. म्हणूनच काही अभिनेत्रींनी आयुष्याचे जोडीदार म्हणून विदेशी नागरिकांची निवड केली, तेव्हा त्यांच्या या निवडीबद्दलही पुष्कळ चर्चा ऐकावयास मिळाली. यामध्ये प्रामुख्याने नाव येते ते म्हणजे अभिनेत्री प्रीती झिंटा हिचे. उद्योजक नेस वाडिया यांच्याशी प्रीतीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा अनेक वर्षे गाजत असतानाच हे संबंध संपुष्टात आले, आणि त्यानंतर २0१६ साली प्रीतीने तिचा अमेरिकन जोडीदार जीन गुडइनफ याच्याशी लॉस एंजिल्स येथे एका खासगी समारंभामध्ये विवाह केला. प्रीतीप्रमाणे अभिनेत्री सेलिना जेटली हिनेही आयुष्याचा जोडीदार म्हणून पीटर हॉगची निवड केली. पीटर व्यवसायाने एक यशस्वी हॉटेलियर असून, ऑस्ट्रिया या देशाचा नागरिक आहे. २0११ साली या दाम्पत्याने ऑस्ट्रिया येथे विवाह केला असून, आता या दाम्पत्याला जुळी मुले आहेत.

आता भ्रष्ट सरपंचांवरसुद्धा होणार फौजदारी

जत,(प्रतिनिधी)-
 ग्रामपंचायतीच्या आर्थिक-व्यवहारात अनियमितता करणे, मालमता अथवा निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोटया, बनावट कागदपत्रांचा समावेश करणे असे उपद्व्याप करणा-या सरपंचांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
भ्रष्ट सरपंचांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास खाल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीला दिला आहे.

पत्रकारांवर होणारे हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत: यासीन पटेल

जत,(प्रतिनिधी)-
' ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ' राष्ट्रीय पत्रकार  संघटनेच्या  राज्य व केंद्रीय पदाधिकारी आणि पत्रकार सदस्यांची संयुक्त बैठक नुकतीच  कोल्हापूर शहरातील ज्योतिबा हॉटेल च्या सभागृहात पार पडली. १५ वे वार्षिक पत्रकार संमेलन भरवणे संदर्भात शहर, ठिकाण व वेळ निश्चित करण्या साठी  बोलावण्यात अली होती. सभेला रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर येथील पत्रकारानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या सभेच्या अध्यक्षस्थानी  एजेएफसीचे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल होते. यावेळी  संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश कदम,राज्य संपर्क प्रमुख  मकरंद भागवत,केंद्रीय सचिव गणेश गोडसे, खजिनदार नितीन भगवान यांनी यावेळी सभेस  मार्गदर्शन केले.

पुणे रेल्वे बोर्डाकडे सांगली भागातील विविध मागण्या सादर

जत,(प्रतिनिधी)-
 पुणे येथील विभागीय व्यवस्थापक मध्य रेल्वेच्या कार्यालयात  रेल्वे बोर्डाची बैठक पार पडली.या बैठकीत सांगली जिल्ह्यातल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. जत येथील बोर्डाचे  संचालक प्रकाश जमदाडे,शिवनाथ बियाणी(कोल्हापूर),बशीर सुतार (पुणे),नारायण मोटे (हातकणंगले) रमेश पाटील (पलूस),महेंद्र जगताप (बारामती) मध्य रेल्वे पुण्याचे अध्यक्ष मिलींद देउस्कर, मध्य रेल्वेचे सचिव सुनील मिश्रा,जे. एन .गुप्ता (ए .डी. एम.) तसेच  रेल्वे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सांगलीच्या प्राध्यापकाने मिळवले 75 पेटंट

जत,(प्रतिनिधी)-
फार्मसीचे शिक्षण घेत असतानाच लागलेली संशोधनाची आवड. तेव्हाच पॉकेट मनीतून मिळविलेले पेटंट आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना मेक इन इंडिया उपकरणांच्या संशोधनासाठी आतापर्यंत मिळविलेले ७५ पेटंट ही आगळीवेगळी किमया साधली आहे सांगलीचे प्रा. सचिन लोकापुरे यांनी. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून. लोकापुरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे सांगलीच्या नावलौकिकात भर पडली आहे.

Thursday, June 20, 2019

माडग्याळ गाव कडकडीत बंद

संख ते मुंबई म्हैसाळ योजनातून पाणी द्यावे निघालेल्या पायी दिंडीस पाठिंबा 
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका दुसकाळी होरपळत असताना शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे . अखेर पूर्ण न झालेल्या वंचित गावाना पाणी मिळावे यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पर्यंत पायी दिंडी काढून मुंबई ला चालेल्या पायी दिडींचे पाठिंबा ही मागणी शासन दरबारी पोचवण्यासाठी गुरुवारी एक दिवस बंद ठेवून चिकलगी मठाधिपती तुकाराम महाराज यांना पाठिंबा दिला आहे .

योग करा, आरोग्य सुधारा!

आपल्याकडे एखादे वाहन असेल तर काही ठराविक कालावधीनंतर आपण त्याची दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग करतो. कशासाठी तर ऐनवेळी आपणास धोका होऊ नये आणि आपला प्रवास सुखकारक व्हावा म्हणून वाहनांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी काळजी आपल्या सजीव शरीराची खरोखरच आपण घेत असतो का ? नाही. म्हणूनच अचानक मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग आणि आपण याचा काही तरी संबंध आह,े हे सर्वप्रथम जाणून घेऊ या.

बळीराजाची खरिप हंगामासाठी लगबग सुरू

जत,(प्रतिनिधी)- 
यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने आणि मान्सूनपूर्व पावसानेही दडी मारल्यामुळे  पुन्हा एकदा खरिपाचे पीक हातातून जाते की काय याचेच मोठे संकट उभे ठाकलेले असताना मान्सून कोकणात दाखल झाल्याची खुशखबर हवामान विभागाने दिल्याने बळीराजाची खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे.

सोन्याच्या भावाने गाठला पाच वर्षांतील उच्चांक

आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याच्या भावानं पाच वर्षांमधला उच्चांक गाठला आहे. येत्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात होण्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिल्याचे दिसत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारले असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसणार आहे.

Wednesday, June 19, 2019

कु.प्रांजली चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात येणारी 'पूर्व उच्च प्राथमिक(इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक(इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०१८-२०१९' गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये डफळापूर (ता.जत) येथील जि. प. मुलींची शाळा नं.2 ची  विद्यार्थिनी  कु. प्रांजली अभिजित चव्हाण ही जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवत गुणवंत शाळेच्या शिरपेचात आणखी एक उज्वल यशाचा मनाचा तुरा रोवत सलग चौथ्या वर्षी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद काकडे

कार्याध्यक्षपदी लखन होनमोरे
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हाध्यपदी प्रमोद काकडे यांची फेरनिवड झाली असून जिल्हा कार्याध्यक्षपदी लखन होनमोरे यांची निवड  जाहीर करण्यात आली आहे.निवडी नंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार केला.

तुबची-बबलेश्‍वर योजनेच्या पाण्याशिवाय तालुक्याचा विकास अशक्य


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळी गावांचा दरवर्षी पडणारा दुष्काळ हा कायमस्वरुपी हटवायचा असेल तर कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी आल्याशिवाय पर्याय नाही. जत तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ  कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी व पाणीपुरवठा मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. मात्र यातून अद्याप काहीच स्पष्ट झाले नसल्याने गंभीर बाब निर्माण झाली आहे. एक तर संपूर्ण तालुक्यात म्हैसळ योजनेचे पाणी खेळवावे लागेल किंवा तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणावे लागेल. पण कर्नाटकातून पाणी मिळण्याची आशा धुसर झाली आहे.कर्नाटकने कोयनेचे पाणी मागितले तेव्हा राज्य सरकारने जत आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना कर्नाटकने पाणी द्यावे, अशी मागणी केल्याने कर्नाटक सरकार कोंडीत सापडले आहे.

शासनाचे ई-गव्हर्नन्सकडे दुर्लक्ष!


जत,(प्रतिनिधी)-
 शासनाने सर्वत्र ऑनलाईन प्रणाली सेवा सुरू केली आहे. प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी ई गव्हर्नन्स सेवा सुरू केली. परंतु, प्रत्यक्षात अनेक सेवा बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय माहिती विज्ञान सेवा (एनआयसी) या कंपनीसोबत कोट्यवधींचा करार केला असतानाही अनेक संकेतस्थळे अद्ययावत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही जनतेला गैरसोईचा सामना करावा लागत आहे. यावरून शासनाचे ई-गव्हर्नन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

जत तालुक्याच्या वाट्याचे म्हैसाळ योजनेचे पाणी दरवर्षी मिळावे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळ असला तरी पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, मात्र अद्याप पूर्व भागात पाणी आलेले नाही. योजनांची कामे झाली नसल्याने तालुक्याच्या वाट्याचे पाणी तालुक्याला मिळत नाही. त्यामुळे तालुक्याच्या पीक पाण्याची अवस्था एकदम गंभीर आहे. तालुक्यात सर्वत्र योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, आणि तालुक्याच्या वाट्याचे पाणी दरवर्षी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

दुष्काळी तालुक्यातील शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. गेली वर्षभर तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करत येथील जनता, शेतकरी मेटाकुटीला आला असून बँका व सोसायटीच्या कर्जामुळे त्यांचे जीवनमानच संपून जात असून शासनाने जत तालुक्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन बँक व सोसायटीची कर्जेे माफ करावीत, अशी मागणी जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी केली आहे.

जत तालुक्यातील गायब ग्राम सेवकाचे निलंबन


जत,(प्रतिनिधी)-
 गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता, कामावर गैरहजर असणार्या साळमळगेवाडी (ता. जत) येथील ग्रामसेवक श्रीहरी माने यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

जत तालुक्यात 116 गावांच्या दप्तरांची चौकशी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील 52 गावांमध्ये एलईडी घोटाळा झाला असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले होते. त्यानुसार  जत तालुक्यातील 116 गावांच्या दप्तराची चौकशी एलईडी खरेदी संबंधात केली आहे. याबाबतचा अहवाल दोन दिवसांत जिल्हा परिषदेला सादर होणार आहे

शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांना परवानगीशिवाय झेडपी,पंचायत समितीकडे न फिरकण्याचा आदेश


जत,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक शिक्षक अथवा शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी, नेत्यांनी गटशिक्षण अधिकार्यांच्या परवानगीशिवाय पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेत येऊ नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.यामुळे शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

खिल्लारी बैलांची जोडी हरवत चालली

जत,(प्रतिनिधी)-
माझ्या मामाची रंगीत गाडी हो, 
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत जाई हो... 
    आज स्पर्धेच्या युगात मामाबरोबरच मामाचा गावही हरवला आहे, मामाच्या गावाबरोबरच मामाची रंगीत गाडीही हरवली आहे, मामाच्या रंगीत गाडीबरोबर ही गाडी ओढणारी खिल्लार्‍या बैलांची जोडीही हरवत चालली आहे!

Tuesday, June 18, 2019

म्हैसाळ योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्या

जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या जत तालुक्यातील कालवा व त्याखालील पोट कॅनॉल मध्ये शेतक-यांच्या गेलेल्या जमीनीचा मोबदला गेल्या आठ दहा वर्षांपासून अद्याप मिळालेला नाही, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक हाल होत असून शासनाने तात्काळ मोबादला द्यावा,अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना दिले आहे.

शासनाची सव्वीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघे निलंबित

जत,(प्रतिनिधी)-
बोगस चलन करून त्यावर स्टेट बँक जत शहर शाखेचा शिक्का मारून शासनाची सुमारे सव्वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून जत प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक बिपिन मुगळीकर व तहसील कार्यालयातील लिपिक लक्ष्मण भवर यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली असून महसूल विभागाचे पितळ पुढील सखोल चौकशीत उघडे पडणार आहे असे येथे बोलले जात आहे.   

Monday, June 17, 2019

अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी शिक्षकाची नोकरी मिळणार


जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा मागील 15 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी तसेच अशा अशंकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून  कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नुकतेच तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अंशकालीन पदवीधर उमेदवारांना नोकरीची दारे किलकिली झाली आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा,72 हजारांचा मुद्देमाल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
    अंकलगी ता.जत येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 6 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.72 हजार 340 रूपयाचा मुद्दे माल जप्त केला.कृष्णा आजमाने ,दिलीप कृष्णा कांबळे ,सलीम अब्दुल अपराध ,रवि झेनाप्पा मांग ,भुतन्ना यासप्पा आजमाने ,बिरगीसाहेब हाजीलाल मुल्ला सर्व रा.अंकलगी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सुमारे दहा वर्षांपासून पोलीसांना चकवा देणारा आरोपी जेरबंद

जत,(प्रतिनिधी)-
सुमारे दहा वर्षांपासून पोलीसांना चकवा देणाऱ्या आरोपीस जत पोलीसांनी आज शिताफीने पकडले.  2009 मध्ये दाखल बलात्काराच्या गुन्हयांत अटक केलेला आरोपी  विलास हणमंत हजारे (रा. हजारवाडी, सिंगणापुर ता.जत) हा  न्यायालयात सुमारे १० वर्षापासुन सुनावणी कामी हजर राहत नव्हता.

जत शहरातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

जत,( प्रतिनिधी)-
 कोलकात्यामध्ये दोन दिवसांपूर्वी रूग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद आता सर्वदुर उमटू लागले असून,देशभरातील डॉक्टरांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी जत येथील 'इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने आज सोमवार 17 जून रोजी काम  बंद आंदोलन पुकारुन मोर्चाने जत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

गणवेशविनाच शाळेचा पहिला दिवस

जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आज
सोमवारपासून सुरू झाल्या असून पाहिली ते आठवीच्या  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी उपलब्ध झाली असली तरी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश मात्र पहिल्या दिवशी मिळाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशाविनाच गेला. गणवेश कधी मिळणार याची निश्चितता नसल्याने पालक,शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.