कवठेमहांकाळ-जत तालुक्यातील
बंधारे तुडुंब
जत,(प्रतिनिधी)-
कवठेमहांकाळ तालुक्यातील बसप्पावाडी तलावापासून सुरू
होणारी महांकाली नदी कवठेमहांकाळ -जत तालुक्यातील लोकांची खर्या अर्थाने जीवनवाहिनी निर्माण झाली आहे. महांकाली ही
अग्रणी नदीची महत्त्वाची उपनदी म्हणून लोकमानसांत नावारुपाला आलेली आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्र 38 मधून वाहत जाऊन पुढे जत
आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 20 गावांतील सर्व छोटे-मोठे ओढे, नाले येऊन मिळतात. महांकाली
नदी अग्रणी नदीला अथणी तालुक्यातील नागणूर या गावात जाऊन मिळते. कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील बसप्पावाडी, अंकले, कोकळे, डफळापूर,
कुडन्नूर, करलहट्टी, शिंगणापूर,
अजूर, नागणूर ही गावे आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी जलबिरादरी टीमने महांकाली
नदीची पाहणी केली असता बसप्पावाडीपासून करलहट्टीपर्यंत 10 किलोम ीटरच्या अंतरात एकही पाण्याचा बंधारा नसल्याचे दिसून आले. जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा आणि ‘जलबिरादरी’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुग यांनी
या महांकाली नदीची पाहणी केली आणी त्यांनी भागातील जाणकार लोकांशी चर्चा करून करून
गेल्या 40 वर्षांपूर्वी नदीची काय अवस्था होती, याची माहिती घेऊन लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले. पूर्वी गेल्या 40-45 वर्षांपूर्वी नदी दुथडी भरून वाहणारी
होती. नदी आता संपूर्ण कोरडी पडली आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी लोकसहभागातून नदीवर
बंधारे बांधण्याचा संकल्प केला. तसेच या पाणलोट क्षेत्र
38 मधील 20 गावांत या महांकाली नदी पुनरुज्जीवनासाठी
सी.सी.टी.छोटे बांधरे
बांधून टेंभू, म्हैसाळ योजनेच्या पाण्याने बंधारे तुडुंब भरल्याने
या भागातील शेतकर्यांच्या पाण्याचा प्रश्न सध्या निकालात निघाला आहे.
यासाठी
कोकळे, बसाप्पाचीवाडी या गावातील युवक एकत्र करून काम सुरू केले.
आजपर्यंत महांकाली नदीवर जलबिरादरी आणि लोकसहभागातून 5 बंधारे तयार करण्यात आले, ज्याची रुंदी 75 मीटर आहे. पण या वर्षी प्रखर दुष्काळ पडला. एकही थेंब पाऊस नाही. सर्व बंधारे कोरडे पडलेली नदी आता
दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठचे सर्व शेतकर्यांनी म्हैसाळ योजनेच्या विभागाकडे पैसे जमा करून पाणी बंधार्यात भरून घेतले. आज दुष्काळ असतानाही महांकाली नदी संपूर्ण
जलमय झाली आहे. बसप्पावाडी, अंकले,
कोकळे, डफळापूर, कुडनूर,
करलहट्टी या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा
प्रशन मिटला आहे. या पाणी पूजनासाठी ’जलबिरादरी’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुग, तहसीलदार शिल्पा
ठोकडे, डॉ. रवींद्र व्होरा, विलास चौथाई, अंकुश नारायणकर, कोकळे
सरपंच सुवर्णा भोसले, धनाजी भोसले, धनाजी
पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment