Thursday, December 27, 2018

नव्या वर्षातील पाच ग्रहणांपैकी भारतीयांना दिसणार फक्त दोन

 सांगली,(प्रतिनिधी)-
 नवे वर्ष हे अवकाश क्षेत्रासाठी खास वर्ष असेल, याचे कारण म्हणजे 2019 मध्ये वर्षभरात तीन सूर्यग्रहणे आणि 2 चंद्रग्रहणे होणार आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, यातील 2 ग्रहणे ही भारतातून दिसू शकणार आहेत.

उज्जैनमधील नामांकित वेधशाळेचे अधीक्षक असलेल्या डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हा ग्रहणांचा खेळ सुरु होणार आहे. 6 जानेवारी रोजी अंशिक सूर्यग्रहण दिसणार असून ते भारतात दिसणार नाही. यापुढील ग्रहण 21 जानेवारी रोजी असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असून यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे ग्रहणही भारतात दिसणार नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी भारतात दिवस असल्याने प्रकाश असेल.
2 आणि 3 जुलैदरम्यान पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. मात्र यावेळी भारतात रात्र असल्याने हे सूर्यग्रहणही भारतीयांना दिसणार नाही. तर याच महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला अंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे.

No comments:

Post a Comment