Tuesday, December 18, 2018

घरकुल योजनेच्या कामात जत तालुका प्रथम


जत,(प्रतिनिधी)-
प्रधानमंत्री आवास घरकुल  योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामात मागील चार महिन्यात जत तालुका  पुणे विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे . उप आयुक्त (विकास) पुणे विभाग पुणे यांनी यासंदर्भात  ११ डिसेंबर २०१८  च्या आढावा सभेत जाहीर केले आहे .असे निवेदन जत पंचायत  समिती सभापती सुशिला तावंशी व गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी प्रसिध्दीसाठी दिले आहे.

    या  कामात नोडल अधिकारीग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी , संबंधीत लाभार्थी यांचे  मोलाचे योगदान आहे. यापुढे  असेच  काम करत राहील्यास एकुण क्रमवारीत जत  तालुका पुणे विभागात प्रथम येणार आहे.  प्रधानमंत्री आवास योजना हि भारत सरकारची  महत्वकांक्षी योजना आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबाना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. सन २०११-१२  मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थीक व जातनिहाय सर्वेक्षणाचा आधार यासाठी घेण्यात आला आहे. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
  घरकुल मंजूर असलेल्या ज्या लाभार्थानी काम सुरु केले नाही त्यांनी माहे डिसेंबर २०१८  अखेर काम  सुरु करुन घरकुल पुर्ण करुन घ्यावे .अन्यथा सदर लाभार्थाचे मंजूर केलेले अनुदान परत  वसुल करण्याची कारवाई सुरु केली जाणार  आहे. ज्याचे बांधकाम अपुर्ण  आहे ते पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी  ग्रामसेवकांची आहे. त्यांनी प्राधान्याने सदरची घरकुले पुर्ण करुन घ्यावित असे  आवाहन प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले आहे.
३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत तालुक्यासाठी मोठया प्रमाणात घरकुलाचे उदिष्ट  येणार आहे.  लाभार्थाचे नांव प्रपत्र ' ' मध्ये नोंद असून  ते पात्र असेल तर त्यांनी  घरकुल मंजूर होवून  मिळणेबाबत जागेचा उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड झेरॉक्स  इत्यादी कागदपत्र संबंधीत ग्रामपंचायतीकडे तात्काळ जमा करावे आवाहन सभापती व गट विकास अधिकारी यानी केले आहे.

No comments:

Post a Comment