जत,(प्रतिनिधी)-
नववर्षाच्या कॅलेंडरचं महत्त्व आता सुट्यांपुरतंच
उरलं की काय, अशी शंका येते आहे. नवीन
वर्ष जवळ आले की, अनेक सोशल मीडियावर अलिकडे सुट्यांची यादी पडताना
दिसून येत आहे. यावर्षी बहुतेक सण, उत्सव,
जयंतींच्या सार्वजनिक सुट्या शनिवार, रविवारी आल्याने
नोकरशाहीच्या सुट्या कमी झाल्या आहेत. बँका, सरकारी-निमसरकारी कार्यालयात काम करणार्या नोकरशाहीला आधीच काम नको असते. यातच शासनाने सुट्यांचा
सुकाळ केला आहे.
2018 मध्ये
दिवाळीची सुटी आठवडाभर होती. तरीही दिवाळी संपेना म्हणून त्यानंतरही
दोनतीन दिवस कर्मचारी कामावर नव्हते, इतकी सुटी उपभोगली.
आता 2018 च वर्ष संपत आलंय, तेही संपायला अवघे बारा दिवस उरलेत. तोपर्यंत सर्व नोकरदारांच्या
सोशल मीडियावर 2019 चं कॅलेंडर येऊन पडले आहे. त्यामुळे नोकरशाहांचे सुट्यांचे नियोजन सुरू झाले आहे. हे नियोजन सर्वसामान्यांचे काम कसे पूर्ण होईल, यासाठी
असते तर बरे झाले असते. 2018 साल संपून 2019 साल उजाडणार आहे. नववर्षात फिरायला जायचे कुठे?
विवाह कार्याचं नियोजनही सुरू झाले आहे. मात्र
यावर्षी रविवारीच सार्वजनिक सुट्या आल्याने नोकरशाही नाराज आहे. तरीही दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार धरून 90 पेक्षा
अधिक सुट्या मिळणारच आहेत.
हक्काच्या
असणार्या शनिवार, रविवारच्या सुट्यांदिवशीच
सार्वजनिक सुट्या आल्याने सरकारी कर्मचार्यांना फटका बसणार आहे.
त्यामुळे सरकारी कर्मचार्यांच्या आठहून अधिक सुट्या
वाया गेल्या आहेत. रविवार जोडून सोमवारी चार सुट्या मिळणार आहेत.
जानेवारीत दोन शनिवार, रविवारच्या चार सुट्यांसह
26 जानेवारीसह आणखी चार सुट्या मिळणार आहेत. फेब्रुवारीत
दोन शनिवार, चार रविवारसह 19 तारखेच्या
शिवजयंतीसह सात सुट्या मिळतील. मार्चमध्ये दोन शनिवार,
पाच रविवारसह महाशिवरात्र, धूलिवंदनासह नऊ सुट्या
आहेत. एप्रिलमध्ये चार रविवारसह महाराष्ट्र दिन, गुडफ्रायडे, गुढीपाडवा यांसह नऊ सुट्या येतात.
या महिन्यात एका शनिवारी 6 तारखेला गुढी पाडवा,
13 ला श्रीराम जयंती आल्याने दोन शनिवारच्या सुट्या बुडाल्या.
बुध्दपौर्णिमा आल्यामुळे सुटी बुडाली. मे मध्ये
चार रविवारसह आठ सुट्या आहेत.
या महिन्यात शनिवारीच बुध्दपौर्णिमा आल्याने नोकरशाहीची
एक सुटी बुडाली. जून मध्ये चार रविवार,दोन
शनिवार सोडून रमजान ईदसह आठ सुट्या आहेत. जुलैमध्ये चार रविवार
आणि दोन शनिवार धरून सहा सुट्या आहेत. ऑगस्टमध्ये चार रविवार,
दोन शनिवारसह बकरी ईद, स्वातंत्र्यदिन,
पारसी दिनसह दहा सुट्या मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये
चार रविवार, दोन शनिवारसह गणेशचतुर्थी, अनंत चतुर्दशी, मोहरमसह दहा सुट्या येतात. ऑक्टोबरमध्ये चार रविवार, दोन शनिवारसह दिवाळी पाडवा,
भाऊबीज, दसरा, गांधी जयंतीसह
दहा सुट्या येतात. नोव्हेंबर मध्ये चार रविवार, दोन शनिवारसह गुरुनानक जयंतीसह सात सुट्या येतात. डिसेंबरमध्ये
पाच रविवार, दोन शनिवार ख्रिसमससह आठ सुट्या येतात.
...या सुट्या बुडाल्या
14 एप्रिल, रविवार-डॉ. आंबेडकर जयंती, 6 एप्रिल,
शनिवार-गुढी पाडवा, 18 मे,
शनिवार-बुध्दपौर्णिमा, ऑगस्टमध्ये
शनिवारी पारसी दिन, सप्टेंबरमध्ये एक रोजी रविवारी-हरितालिका, 29 रोजी रविवारी घटस्थापना, ऑक्टोबरमध्ये 13 रोजी रविवारी कोजागिरी पौर्णिमा या सुट्या
बुडाल्या.
No comments:
Post a Comment