जत येथील डॉ. श्रीकांत कोकरे यांची सॊलापूर विद्यापीठाच्या परीक्षा
नियंत्रक व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल
त्यांचा राजे रामराव महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य
डॉ.व्ही.एस ढेकळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलाताना प्राचार्य ढेकळे म्हणाले, प्रशासनात काम करीत असताना संवेदनशीलता व संहिता महत्वाची असते. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ही प्रक्रिया संवेदशील असल्याने ते सावध पध्द्तीने केले पाहिजे. विवेकानंद परिवारातील माणूस हा शेवटपर्यंत विवेकानंद परिवारातच राहावा अशी संस्थेची इच्छा आहे. पण संस्थेच्या एका सदस्याची एका मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळते म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था परिवार त्यांच्या पाठीशी आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकांत कोकरे म्हणाले कि, परीक्षा ही बाब विद्यार्थ्यांच्या मूल्यमापना बरोबरच त्यांच्या संवेदनशील मनाशी निगडित आहे. या विश्वात वस्तूचे एकक मोजण्याचे परिमाण अस्तित्वात आहे. पण मनाचे एकक मोजण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन म्हणून काम करीत असताना विध्यार्थ्यांच्या मनावरील ताण कशा पद्धतीने कमी करता येईल याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल,असेही डॉ. श्रीकांत कोकरे म्हणाले .
प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत डॉ.विजय जाधव यांनी केले. याप्रसंगी प्रा. आर.डी .कारंडे , प्रा. सोमनाथ काळे, प्रा. डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. रामदास बनसोडे, प्रा.संजय लट्ठे, प्रा. सचिन लोखंडे यानी आपल्या भावना व्यक्त करून डॉ. श्रीकांत कोकरे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. वाय. मानेपाटील व आभारप्रदर्शन प्रा. समीर शेख यांनी केले.

Congratulations Dr.Kokare sir.You are pride of not only Jat but all Maharashtra.
ReplyDeleteMadhukar Sonure Achanak halli.
ReplyDelete