जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे जत तालुक्यात विसर्ग सुरू असून सध्या 250 क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मात्र पाणी पुढे सांगोल्याला जात असल्याने पहिल्यासारखीच स्थिती आहे.जत शहराला पाणी पुरवठा करणार्या बिरनाळ तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
आतापर्यंत जत तालुक्यातून 20 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. जत तालुक्यातील लाभक्षेत्राला दुष्काळी झळा सर्वाधिक बसतात.पण वितरण व्यवस्था अपुरी आहे. येथील उभ्या पिकांची स्थिती, उपलब्ध वितरण व्यवस्थेची स्थिती, पाण्याची शेतीसाठी मागणी आणि वसुली यांचा विचार करता विसर्ग ठेवला जातो.यातून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काही तलावात पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले पाणी याचेही गणित घालण्यात आले आहे. यावर्षी आमदार विलासराव जगताप यांनी जतला विसर्ग वाढवून देण्याची जोरदार मागणी केली होती.त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत 100 क्युसेकने विसर्ग वाढवून देण्यात आला आहे.
गतवर्षी सुरुवातीला 100 तर नंतर 150क्युसेकपर्यंत विसर्ग आणला होता. यंदा 150वरून 250 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र या तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा वेग हा पहिल्यासारखाच आहे. अजून जत तालुक्यातून अनेक तलाव भरायचे आहेत. जत शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार्या बिरनाळ तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. गतवर्षी याच तलावातून संपूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. उन्हाळा अद्याप असला तरी आताच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे या तलावात पाण्याचा साठपा करण्याची गरज आहे. त्यामुळे या तलावात पानी सोडण्याची मागणी होत आहे.
Pani
ReplyDelete