जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उंटवाडी
या छोट्याशा गावातील सतीश जाधव या तरुणाने गावासोबत तालुक्याची मान उंचावली आहे. राज्य लोकसेवा
आयोगातर्फे (MPSC)
घेण्यात येणार्या विक्रीकर निरीक्षक (STI)
व मंत्रालयीन सहाय्यक (ASO) या दोन्ही परीक्षा
सतीश जाधव उत्तीर्ण झाले
होते. सद्या ते मंत्रालयीन सहाय्यक पदी (MPSC ऑफिस, मुंबई) येथे कार्यरत आहेत.
सोबतच आज त्यांची विक्रीकर निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
उंटवाडीसारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागात शिक्षण घेऊन, स्वतःच्या हिंमतीवर MPSC या पदावर नियुक्ती होत आहे.
त्यांचे शालेय प्राथमिक शिक्षण गावातच झाले तर माध्यमिक शिक्षण रावळगुंडवाडी
येथील महादेव विद्यालयात झाले आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी
त्यांचे यश प्रेरणादायी आहे.

No comments:
Post a Comment