Tuesday, December 18, 2018

42 गावांना पाणी देण्यास शासन कटिबद्ध:नितीन बानुगडे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्यासाठी शिवसेना कटीबदध आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री  विजय शिवतारे व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडेपाटील   यानी जत तालुक्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

          जत तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई येथे जलसंपदामंत्री  विजय शिवतारे व कृष्णाखोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडेपाटील यांचीभेट घेऊन निवेदन दिले, त्यावेळी त्यांनी ग्वाही दिली आहे. या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमूख आनंदराव पवार , जिल्हा संघटक बजरंग पाटील ,संजय विभूते जत तालुका प्रमुख अंकूश हुवाळे , जत तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव ,महिलाआघाडी प्रमुख रेणुका देवकते , जिल्हा उपप्रमूख तम्मा कुलाळ , युवासेना जिल्हा उपप्रमूख अमित दुधाळ , श्रीमंत कर्पे सिध्दू गायकवाड , हरीचंद्र कांबळे  , भारत टेंगले ,योगेश गायकवाड , नवनाथ दुधाळ , आदी जणांचा समावेश  होता.
      भौगोलिक असमतोल असल्यामुळे जत तालुक्याच्या  पूर्व भागातील ४२ गावे  म्हैसाळ  योजनेपासून वंचित राहीली आहेत .या वंचित गावाला पाणी देण्यासाठी  मागील पंधरा दिवसांपासून  शासनाकडून येथे सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे . सदरचे काम अंतिम टप्प्यात  आले आहे.  सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर  या कामासाठी शासनाने  आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला तर कायम  दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला पाणी  मिळणार  आहे. त्यामुळे निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदन देवून केली आहे.

No comments:

Post a Comment