जत,(प्रतिनिधी)-
जालिहाळ
बुद्रुक (ता. जत) येथे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मिरजेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अवधूत कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी उमदी पोलिसांनी दोघांना
अटक केली आहे. याबाबत रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात
खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले.
रेवणसिध्द
महानिंगाप्पा कुंभार (वय 45, रा.
जालिहाळ बुद्रुक) व हणमंत शंकर माने (वय 25, रा. करेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती
अशी, अवधूत कांबळे व संशयित आरोपीशी ऊसातोडीच्या पैशावरून वाद
असल्याचे पोलिसांकडून केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दि. 28 नोव्हेंबर रोजी जालिहाळ गावापासून एक किलोमीटर
अंतरावर वरील आरोपींनी लोखंडी साखळी, काठी मारहाण करून दगड टाकून
पाय मोडण्यात आला होता. यात अवधूत गंभीर जखमी झाला होता.
या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती; तर दि.
5 डिसेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी रेवणसिध्द कुंभार
व हणमंत शंकर माने या दोघांना अटक केली आहे.
दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर
अवधूत कांबळे याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी भारती हॉस्पिटलमध्ये
उपचारासाठी दाखल केले. मात्र, सोमवारी सकाळी
त्याचा मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात
दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले.
No comments:
Post a Comment