Tuesday, December 18, 2018

रामपूर येथील कामांची विभागीय चौकशी होणार


जत,(प्रतिनिधी)-
 रामपूर (ता. जत) येथील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास योजनेच्या (दलित वस्ती सुधार योजना) निधीतील अनियमितता प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

दलित वस्ती निधीतील अनियमितताप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका, अभियंता, गटविकास अधिकारी, ठेकेदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस सादर झाला आहे. या अहवालानुसार तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य नितीन रामपूर प्रकरणी विभागीय चौकशी होणार शिवशरण यांनी केली आहे. दलित वस्तीच्या कामासाठी संबंधित ठेकेदारास 12 मे 2017 ते 13 जून 2017 या कालावधीत मक्तेदारास 7 लाख रुपये प्रथम दिले आहेत.
तत्कालीन अभियंता यांचा 22 फेब्रुवारी 2018 चा अहवाल, फोटो पाहिले तर रक्कम दिल्यानंतर सहा महिन्यांनीही काम अपूर्ण असल्याचे आढळले. काम पूर्ण करण्यापूर्वीच ठेकेदारास बिल दिले असल्याने त्याला सरपंच व ग्रामसेवक जबाबदार आहेत. कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याने शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेतली, त्यांनी विभागीय चौकशीचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment