Monday, December 17, 2018

स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल गणेश टेंगले यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
 कुलाळवाडी (ता. जत) येथील गणेश टेंगले यू. पी. एस. सी. परीक्षेत यशस्वी झाले आणि देशात सहाशे दहावा क्रमांक मिळाल्यानंतर त्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, बाबरवस्ती शाळेत सत्कार करण्यात आला.

 गणेश टेंगले म्हणाले, जतसारख्या दुष्काळी भागातून आल्याने आजूबाजूची परिस्थिती माहिती होती. त्याचा फायदा झाला. घरची परिस्थिती बरी होती. वडील ऊस तोडणी मुकादम आहेत. त्यांच्यासह आई, भाऊ, कुटुबांचे प्रोत्साहन मिळाले. जिद्दीने अभ्यास केला, मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.आज कितीही वेगवेगळ्या शाळा निघाल्या तरी मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण जर गोरगरिबांच्या मुलांना मिळायचे असेल तर सरकारी शाळा हाय एकमेव उपाय आहे. जीवनात अपयश आले म्हणून आपण खचून जाऊ नये. प्रामाणिक प्रयत्न करावेत ध्येय मोठे ठेवल्यास कमीत कमी ध्येयापर्यंत पोहोचू. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मोटे, केरुबा गडदे, नेताजी टेंगले, रियाज जमादार, मुख्याध्यापक दिलीप वाघमारे शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment