जत,(प्रतिनिधी)-
सरकारने
जत तालुक्यात गंभीर स्वरूपात दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु अजून
तशा सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर जत पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना पाण्याचे मोफत टँकर आणि जनावरांसाठी
चारा छावणी सुरू करणार असल्याची माहिती संत बागडेबाबा यांचे शिष्य तुकाराम महाराज यांनी
दिली.
तुकाराम
महाराज म्हणाले की, जत तालुक्यात निसर्ग सातत्याने कोपतो आहे.
दर एक दोन वर्षांनी दुष्काळाचे महाभयंकर सावट तालुक्यावर ओढवत आहे.
यंदाही भीषणता खूप तीव्र स्वरूपाची आहे. रब्बी
व खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. अशा स्थितीत लोक पाण्यासाठी
आणि जनावरांच्या चार्यासाठी टोहो फोडत आहेत. लढा दुष्काळासाठी अशा स्थितीत आता आपणच आपल्या मातीतल्या माणसांना आधार देण्याची
गरज आहे. यासाठी आम्ही दुष्काळ संघर्षाचा हा लढा हाती घेतला आहे.
158 दिवस दुष्काळग्रस्त सोबत काम करण्याचा संकल्प केला आहे. गोंधळेवाडी येथील बागडेबाबा च्या मठाच्या परिसरात पन्नास हजार जनावरे वास्तव
करतील, असे नियोजन केले जाणार आहे. महाराजांनी
अनेक सामाजिक कामे साकारली आहेत. लोकांनी त्यांच्या संकल्पनेला
साथ देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे
जनावरांची छावणी, पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्याचा निर्णय
त्यांनी घेतला आहे.

No comments:
Post a Comment