जत,(प्रतिनिधी)-
कासलिंगवाडी
(ता .जत) येथील
40 शेतकर्यावर प्रशासनाने म्हैसाळ योजनेतील पाणी
पळवल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
याकडे आमदार व खासदार दुर्लक्ष करीत आहेत, अशी
माहिती जत तालुका कॉग्रेस तालुका अध्यक्ष आप्पाराया बिरादार यानी निवेदनादवारे दिली.
बिरादार यांनी निवेदनात पुढे म्हटल आहे की, मिरज, कवठे महांकाळ, जत तालुक्यासाठी
मंजूर असताना खासकरून जत तालुक्याला वगळून सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यातील गावांना
पाणी सोडण्याचे षड्यंत्र सध्याचे शासन करत आहे. जत तालुक्यातील
योजनेत समाविष्ट असणार्या गावांना मुबलक पाणी उपलब्ध करून देणे
गरजेचे असताना, जत तालुक्याच्या वाटणीचे पाणी सांगोला तालुक्यातील
गावांना पाणी सोडणे कितपत योग्य आहे? याबाबत सत्ताधारी भाजपचे
आमदार व पदाधिकारी मूग गिळून का गप्प आहेत? पाणी आमच्या हक्काचे
असताना शेजारील तालुक्यातील गावांना पाणी सोडले जाते व ते आडवले म्हणून गुन्हे दाखल
केले जातात, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. म्हैसाळ योजनेतून वंचित
असणार्या गावांना पाणी देतो, अशी खोटी
आश्वासने देत सध्या भाजपचे काही पदाधिकारी फिरत आहेत.
तसेच जि. प. व प.
सं. निवडणुकीवेळी कर्नाटकातून पाणी आणण्याचे काँग्रेस
गाजर दाखवत आहे, असे म्हणणार्यांनी सध्या
जत तालुक्यातील सीमेवर कर्नाटकात आलेले पाणी बघून फोटो सेशन करून ते जनतेची दिशाभूल
करत आहेत.
येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून
हे भाजपवाले नाटक करत आहेत. पण आता जत तालुक्यतील सुज्ञ जनता
यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. हेच प्रयत्न गेल्या
4 वर्षात विधानसभेत कर्नाटक व महाराष्ट्र संयुक्त करार करून सीमाभागातील
गावांना द्या, असा प्रश्न मांडला असता
व पाठपुरावा केला असता तर आज जत तालुक्यातील पूर्व भागातील 42 गावांना तुरची-बबलेश्वर योजनेचे
पाणी मिळाले असते. जत तालुक्यातील पूर्व भागातील 42 गावांना तुरची- बबलेश्वर योजनेतून
पाणी मिळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत यांनी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील
मंत्र्यांची संयुक्त पाणी परिषद घेऊन प्रथम संकल्पना मांडली आहे, हे जतच्या जनतेला चांगले माहीत आहे.
No comments:
Post a Comment