जत,(प्रतिनिधी)-
बोगीँ फाटा येथे ऊसाची ट्राँली पलटी होऊन 2 वर्षे वयाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात आणखी एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना जात
तालुक्यातील बोर्गी येथे घडली. बोर्गी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे या
चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी
केला आहे.
सद्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. विजयपुर -पंढरपूर
महामार्गावर बोगीँ फाटा येथे 1 कि . मी. अंतर हे अतिशय उतार चढावाचे
आहे. येथे गाडी चढत नाही म्हणून वाहने भरधाव येतात. या चौकात बेकायदेशीर बसवेश्वर
झेंडा उभारला आहे. आज सायंकाळी हा झेंडा चुकवण्यासाठी लांबून वळण घेताना ट्रॅक्टर
ची मागची ट्राँली पलटी झाली ( गाडी नं के. ऐ.28 टी सी 4751) यात
परगावी गेलेल्या कर्नाटक हून आलेल्या बसमधून उतरून हळळी या गावी जाण्यासाठी रस्ता
सोडून 20 फूट लांब थांबलेल्या बहीण
व भाऊ या चिमुकल्या ऊसाची डबा पलटी झाला यामध्ये
श्रेयश स्ंतोष खवेकर उपचारासाठी घेउन जाताना मृत झाला त्याची मोठी बहीण गंभीर जखमी
झाली असून तीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर
वाहने मोठ्या संख्येने ये -जा करतात. काही लोकांनी अशा ठिकाणी 2 वर्षेपुवीँ बेकादेशिरपणे झेंडा लावला आहे. ग्रामस्थांनी
कित्येक वेळा ग्रामपंचायतीला व पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही हा
झेंडा मृत्यूचे ठिकाण झाले आहे, असा आरोप होत आहे.

No comments:
Post a Comment