जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदारसंघातील सीएम चषक स्पर्धा सुरू असून काल गायन स्पर्धांचा शुभारंभ जत येथील उमा नर्सिंगच्या सभागृहात घेण्यात आल्या. या गायन स्पर्धेचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. रविंद्र आरळी होते. यावेळी एकूण 185 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी डॉ ममता तेली, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, गुरूशांत माळी आदी उपस्थित होते.स्पर्धक,त्यांचे पालक आणि तालुक्यातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment