|
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे डॉ. प्रा. श्रीकांत कोकरे यांची सोलापूर
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे जतच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु
डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठीत
करण्यात आलेल्या निवड समितीने विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार डॉ. कोकरे यांची परीक्षा संचालकपदी निवड केल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे
यांनी दिली. बी. पी. पाटील यांच्या सेवा समाप्तीनंतर परीक्षा संचालक पद हे रिक्त होते. सध्या या पदाचा पदभार कुलगुरु डॉ. फडणवीस
यांच्याकडे आहे. विद्यापीठातील हे महत्त्वाचे पद असून
यासाठी मंगळवारी एकूण 9 जणांनी मुलाखत दिली होती. त्यातून डॉ. कोकरे यांची निवड झाली आहे. बुधवारी त्यांना निवडीचे पत्र देण्यात
आले.
पुढील आठवड्यात त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे दैनिक लोकमतशी बोलताना सांगितले. डॉ. कोकरे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या
सोलापूर उपकेंद्रातून एम.एस्सी. फिजिक्स पूर्ण केले आहे. पी.एचडी. देखील सोलापूर विद्यापीठातून प्राप्त
केली आहे. 1993 पासून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण
संस्था कोल्हापूरच्या तासगाव, जत, इचलकरंजी आणि उस्मानाबाद येथील महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य
करीत आहेत.सध्या ते जत येथील राजे रामराव महाविद्यालयात सहयोगी
प्राध्यापक म्हणून काम करीत होते. विद्यापीठाच्या या
पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
|
कोकरे सर आपले अभिनंदन
ReplyDeleteआपल्या निवडीचा आनंद आणि अभिमानही आहे.परीक्षा आणि निकाल या बाबतीत आपले विचार मी जाणून आहे त्यामुळे आपल्या अनुभवाचा या नव्या जबाबदारीच्या ठिकाणास नक्कीच लाभ होईल, काटकर परिवारातर्फे शुभेच्छा
कोकरे सर आपले हार्दिक अभिनंदन.- Mali A S Rampur
ReplyDelete