जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
निगडी बुद्रुक येथील ट्रान्सफार्मरमधून ठिणगी पडून शेतात ऊस जळून खाक झाला आहे.
यामुळे शेतकर्यांचे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान
झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळावी, अशी
मागणी संबंधित शेतकर्याने केली आहे.
भीमराया आणाप्पा बिरादार हे उटगी येथील रहिवाशी असून
निगडी बु येथील सौ. सरस्वती सिद्धप्पा बिराजदार यांची
शेती कसायला घेतली आहे. या साडेचार एकर शेतात त्यांनी ऊस शेती
केली आहे. सदर शेतात अॅडीशनल टान्सफार्मर
(टीसी) आहे. सदर टीसी मधून
विजेची ठिणगी पडून ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात
आला आहे.
No comments:
Post a Comment