धान्य व केरोसीन वितरण व्यवस्थेत सुधारणा
जत,(प्रतिनिधी)-
पुरवठा विभागाच्या कामकाजात आलेल्या
आधुनिकतेमुळे शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राद्वारे धान्य तसेच रॉकेलचे वाटप करण्याची
कार्यपध्दत अंमलात आली आहे. यंदा दिवाळीत धान्याबरोबर
साखर, हरभरा डाळही मिळणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात
आले.
प्रशासनाच्या कारभारात गतिमानतेबरोबर अधिक पारदर्शकता आणि शिस्त लागावी यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून 1 ऑगस्ट 2018 पासून पॉस मशीनवर पात्र शिधापत्रिका धारकांना रॉकेलचे वाटप करुन त्यांच्याकडून गॅसजोडणी नसल्याचे हमीपत्र घेण्यात येत आहे. हमीपत्रात खोटी माहिती दिल्यावर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व शिधापत्रिका धारकांची तपासणीसाठी
तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत करून तपासणी केली जात आहे. समितीचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्षात
घरभेटी देऊन तपासणी करणार असून शिधापत्रिकाधारकानी हमीपत्रात खरी माहिती दिली किंवा
नाही याची तपासणी समिती करणार आहे. गॅस असताना देखील खोटी माहिती
देऊन केरोसीन घेतल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकावर जीवनवश्यक वस्तू अधिनियम
1955 तसेच भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार फौजदारी स्वरूपाची कारवाई
करण्यात येणार आहे.
तालुका स्तरावरील समितीद्वारे केलेली तपासणी पुन्हा दुसर्या तालुक्यातील पथकामार्फत त्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यात दोष आढळून आल्यास संबंधित समितीच्या अधिकारी-कर्मचार्यांवर देखील कारवाई होणार आहे.

No comments:
Post a Comment