Wednesday, October 31, 2018

5 तालुके गंभीर स्वरुपाचे दुष्काळी जाहीर


उपाययोजना करण्याच्या सूचना
जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळ, पाणी टंचाईने होरपळत असलेल्या राज्यातील 26 जिह्यांमधील 151 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिह्यााrल तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी तसेच जत तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर कण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या सर्व त्या उपाययोजना लागू करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रीत विचार करुन राज्यातील 151 तालुक्यांमध्ये राज्य शासनाने गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये जिह्यातील पाच तालुक्यांचा गंभीर स्वरुपाच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, जत व आटपाडी हे तालुके गंभीर स्वरुपाचे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
सर्व उपायोजना राबविण्याचे आदेश
बुधवार 31 ऑक्टोंबरपासूनच या तालुक्यांमध्ये दुष्काळाचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ते पुढील सहा महिन्यापर्यंल लागू राहणार आहेत. याशिवाय दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक संबधित सर्व त्या उपाययोजना लागू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले आहेत. यामध्ये जमिन महसूलामध्ये सूट, कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात सूट, परीक्षा शुल्क माफ, टँकर, तसेच चाऱयाची सोय व वीज जोडणी खंडीत न करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment