बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त
जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील इंदिरा हॉस्पिटल समोरील संदीप पाथरूट यांच्या पानपट्टीसमोर व बिज्जरगी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अवैधरित्या चालू असलेल्या मटका अड्डयांवर गुरूवारी दुपारी सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. या झालेल्या कारवाईत एका ठिकाणी चिठ्ठ्या, रोख नऊ हजार आणि मोबाईलसह एकोणवीस हजार पंचवीस रुपयांचा तर दुसरीकडे तीन हजार ९३० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दोघांना अटक करून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. संदिप पाथरूट व इकबाल रसूल फरास अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस विजय वीर करत आहेत.
No comments:
Post a Comment