जत, (प्रतिनिधी)-
एक लाख पन्नास हजार रुपये मुदलाचे व्याज आणि मुद्दल मिळून तिन लाख पन्नास हजार रुपये परत करुनही आणखी एक लाख पन्नास हजार रुपये दे म्हणून सारखा तगादा लावून लाखडी काठी , पट्टा व हाताने मारहाण आणि शिविगाळ करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून केरबा आप्पा जाधव , खंडू केरबा जाधव , वैभव विलास निकम , गजानन सुनील पोतदार सर्व रा.पाच्छापूर ( ता.जत ) या चार खाजगी सावकाराच्या विरोधात तानाजी सदाशिव जाधव रा.पाच्छापूर यानी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही . ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान गावातील मारुती मंदिराच्या परिसरात घडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की ,तानाजी जाधव यांनी वरील चार संशयित आरोपीकडून दिनांक 30 एप्रिल 2015 रोजी दरमहा तिन टक्के व्याज दराने एक लाख सत्तर हजार रुपये घेतले होते. त्यानंतर दिनांक 20 मार्च 2017 पर्यंत त्यांनी व्याज व मुद्दल मिळून तिन लाख पन्नास हजार रुपये परत केले होते .परंतु आणखी एक लाख पन्नास हजार रुपये राहिले आहेत ते लवकर परत कर असा वरचेवर तगादा त्यांनी त्याच्या पाठीमागे लावला होता .
शनिवारी सकाळी गावातील मारुती मंदिराच्या परिसरात तानाजी जाधव उभे राहिले असता वरील चारजण तेथ आले व व्याजाची रक्कम दे म्हणून शिविगाळ करून काठी व पट्ट्याने त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment