सांगली,(प्रतिनिधी)-
परप्रांतीय महिलांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय
करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या
पथकाने शहरातील काळ्या खणीनजीकच्या प्रेमनगरवर छापा घातला. या कारवाईत वेश्याव्यवसायाशी संबंधित महिलांना ताब्यात घेतले असून शनिवारी
रात्री उशिरापर्यंत त्या महिलांकडे चौकशी सुरू होती.
सांगली आणि परिसरातील अनेक वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी
परप्रांतीय महिला, मुलींना आणले जात असल्याच्या घटना
अधून मधून चव्हाट्यावर येतच असता. त्यात अल्पवयीन मुलींचा समावेश
असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. या अनुषंगाने चौकशी करताना त्या
या व्यवसायात कशा आणि कोठून आल्या? त्यांची तस्करी करण्यात आली
का? कोणी फसवणूक करून जबरदस्तीने या व्यवसायात ढकलले आहे का?
आदी पातळ्यांवर चौकशी करण्यासाठी पथकाने महिलांना ताब्यात घेतले आहे.
शनिवारी सायंकाळी अचानक पोलिसांची कारवाई सुरू झाल्याने त्या ठिकाणी
गोंधळ निर्माण झाला. काही घरमालकीण असलेल्या महिलांनी या कारवाईस
विरोध केला. परंतु पथकाने चौकशी करून देण्याची ग्वाही पथकाकडून
देण्यात आल्याने कारवाईत अडथळे आले नाहीत. कारवाईच्यावेळी त्या
परिसरातील सर्वच जण धावत आल्याने मोठी गर्दी झाली होती. सर्व
महिलांना विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत
चौकशी सुरू होती. पण गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
सखोल चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक विद्या जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment