जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातून सन
2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 56 हजार
51 मृद नमुने तपासणीचे उद्दिष्ट निश्चित केले
असून, आजअखेर 20 हजार 895 मृद नमुन्यांचे प्रयोग शाळेमध्ये विश्लेषण करून
33 हजार 534 मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात
आले आहे. उर्वरित सर्व नमुन्यांची तपासणी 15 फेब्रुवारीअखेर पूर्ण करून जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्यात येणार आहे.
रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीची उत्पादकता
हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मृद आरोग्य पत्रिका योजनेतून सांगली जिल्ह्यात सर्व
खातेदार शेतकर्यांना मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात
येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 3 लाख
94 हजार 60 हेक्टर जिरायत क्षेत्र आहे.
या क्षेत्रामधून एकूण 39 हजार 406 मृद नमुने घेतले आहेत. 1 लाख 70 हजार 797 हेक्टर बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रामधून 68 हजार 319 मृद
नमुने घेतले आहेत. एकूण 1 लाख 7
हजार 725 मृद नमुने तपासणीचे प्रत्येक दोन वर्षाच्या
फेरीमध्ये उद्दिष्ट आहे. त्यानुसार पहिल्या फेरीमध्ये सन
2015-16 ते 2016-17 या कालावधीत 1 लाख 7 हजार 761 मृद नमुन्यांचे
प्रयोगशाळेमध्ये विेषण करून 6 लाख 24 हजार
285 जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment