Wednesday, October 31, 2018

दिनकर पतंगे जत विधानसभा लढविणार


जत,(प्रतिनिधी)-
शिवसेनेचे नेते आणि लायन्स क्लबचे तालुकाध्यक्ष दिनकर पंतगे यांनी जत विधान सभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची का अपक्ष निवडणूक लढवायची, हा निर्णय अद्याप झाला नाही.
जत तालुक्यातील येळवी गावचे सुपुत्र, शेती विषयातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व दिनकर श्रीधर पतंगे हे आगामी 2019 ची विधानसभा निवडणूक जत मतदारसंघातून लढविण्यास इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी नियोजनही सुरू केले आहे. दिनकर पतंगे यांचे वडील श्रीधर पतंगे हे शिक्षक होते व येळवी गावचे सरपंच म्हणून त्यांनी 10 वर्षे काम पाहिले होते. दिनकर पतंगे हे कृषी विभागात सरकारी नोकरीत होते. नोकरी करीत असताना त्यांनी जत तालुक्यात शेतीविषयक विविध उपक्रम राबविले आहेत. शेतकर्यांना अनुदान व मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. 2013 साली त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी जत शेतकरी सेने व शिवसेना कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या दिनकर पतंगे हे जत तालुका लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष असून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment