Sunday, October 28, 2018

Time please:कमीतकमी 20 झाडे


भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी 20 झाडे लावा. अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते. एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते. एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिगं करते. एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते. एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते. एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2अंशाने कमी करते. एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते. एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते. एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते. एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड फळ, फुल, बिया आपल्यासाठी देते.
 ***** 
डोळे बंद केले म्हणून, संकट जात नाही. आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.
 ***** 
कराडच्या स्टँडवर एकजण ओरडत होता, ‘कोल्हापूरची पळून आली.‘ ‘कोल्हापूरची पळून आली.‘ मी उत्सुकतेने घाई घाईने वळून मागं पाहिलं तर... ‘कोल्हापूर चिपळूण बस आली होती.
‘ *****
गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा... 
बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कोठे जातात?
गुरुजी शाळा सोडून गेले.

No comments:

Post a Comment